६. शिक्षकांची अर्हता-महाराष्ट्रखाजगीशाळाकर्मचारी (सेवेच्याशर्ती) नियमावली, १९८१
शिक्षकांची अर्हता ६ . शिक्षकांची अर्हता - प्राथमिक शाळा , माध्यमिक शाळा , कनिष्ठ महाविद्यालये व कनिष्ठ अध्यापक विद्यालयेयांतील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्या पदांची किंमत अर्हता अनुसूची “ब” मध्ये विनिर्दिष्ट केल्याप्रमाणे असेल: परंतु , असे की , जेव्हा प्रशिक्षित पदवीधर शिक्षक मिळत नसतील अशा अपवादात्मक परिस्थितीत माध्यमिक शाळांमध्ये गणित व विज्ञान विषय शिकविण्यासाठी अप्रशिक्षित असे विज्ञान शाखेचे पदवीधर आणि इतर विषय शिकविण्यासाठी अप्रशिक्षित असे कला व वाणिज्य शापखेचे पदवीधार यांच्य नेमणुका करण्यास शिक्षण अधिकारी व्यवस्थापकवर्गास परवानगी देऊ शकेल. तथापी , त्यांना स्वखर्चाने प्रशिक्षण अर्हता मिळवावी लागेल याची स्पष्ट जाणीव देऊन आणि प्रशिक्षित पदवीधर शिक्षक उपलब्ध झाल्याबरोबर त्यांच्या सेवा समाप्त केल्या जाण्यास पात्र असतील अशी आणखी शर्त घालून अशा नेमणुका वार्षिक मुदतीच्या तत्त्वावर करण्यास परवानगी देण्यात येईल: * आणखी असे की , महाराष्ट्र खाजगी शाळांतील कर्मचारी (सेवेच्या शर्ती) नियम , १९८१ अस्तित्वात येण्यापूर्वी शिक्षण अधिकार्यांची परवानगी मिळवून नियुक्त केलेल्या आणि ज...