Posts

Showing posts from October, 2020

३. मुख्याध्यापकाची अर्हता व नेमणूक - महाराष्ट्र खाजगी शाळा कर्मचारी (सेवेच्या शर्ती) नियमावली, १९८१

  ३. मुख्याध्यापकाची अर्हता व नेमणूक ३. मुख्याध्यापकाची अर्हता व नेमणूक - (१ ) ( अ) (एक) पटावर २००पेक्षा अधिक विद्यार्थी असणार्‍या किंवा एक ते सात इयत्ता असणाऱ्या प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापक म्हणून नेमणूक करावयाची व्यक्ती ही , ज्याची कमीत कमी पाच वर्षा इतका काळ सेवा झाली असेल असा ज्येष्ठतम प्रशिक्षित शिक्षक असेल ; ( दोन) अन्य कोणत्याही प्राथमिक शाळेचा मुख्याध्यापक म्हणून नेमणूक करावयाची व्यक्ती ही , त्या शाळेतील ज्येष्ठतम शिक्षक असेल ; ( ब) रात्र शाळेतसुद्धा कोणत्याही माध्यमिक शाळेचा आणि कनिष्ठ अध्यापक विद्यालयाचा मुख्याध्यापक/प्राचार्य म्हणून नेमणूक करावयाची व्यक्ती ही , सांविधिक ( Statutory) विद्यापीठाची अध्यापनातील किंवा शिक्षणशास्त्रातील स्नातक पदवी किंवा शासनाने ततुल्य म्हणून मान्यता दिलेली अन्य अहर्ता धारण करणारी आणि स्नातक पदवी मिळाल्यानंतर एखाद्या माध्यमिक शाळेत किंवा कनिष्ठ अध्यापक विद्यालयात पूर्णवेळ शिकवण्याचा किंवा एकूण किमान पाच वर्षाचा अनुभव असलेली पदवीधर व्यक्ती असेल ; त्यापैकी किमान दोन वर्षाचा अनुभव हा अध्यापनातील किंवा शिक्षणशास्त्रातील स्नातक पदवी मिळाल्यानंत