ANNEXURE (48) Deleted & ANNEXURE (49) [Vide Rule 77.3] SS CODE
ANNEXURE (48) Deleted ____________________ ANNEXURE (49) [Vide Rule 77.3] माध्यमिक शाळा संहितेच्या नियम ७७.३ (१) प्रमाणे संस्था चालकांनी शिक्षकाबाबत करावयाच्या चौकशीविषयी (१) माध्यमिक शाळा संहितेच्या नियम ७७.३ (१) प्रमाणे संस्था चालकांनी शिक्षकाबाबत अगर मुख्याध्यापकाबाबत करावयाची अंतिम चौकशी कोणत्याही परिस्थितीत चौकशी समिती नेमल्यापासून दोन महिन्यात संपूर्ण करून, कारवाई करावी. त्याप्रमाणे संस्थेने वरील मुदतीत कारवाई न केल्यास याबाबतचा खात्याचा अंतिम निर्णय दोन्ही बाजूंवर बंधनकारक राहील. (२) शिक्षकांनी चौकशी समितीवर निवडलेला प्रतिनिधि, चौकशीचे वेळी हजर ठेवण्याची जबाबदारी संबंधित शिक्षकावर आहे व त्याप्रमाणे ती जबाबदारी त्याने पार न पाडल्यास पुढील चौकशी, चौकशी समितीवरील इतर संभासदांनी पूर्ण करावी व त्यावरील निर्णय शिक्षकांवर बंधनकारक राहील. (शिक्षण संचालक यांचे पत्र क्र. अमाशा.- ४१६९/२५६१६-क, दिनांक ८-१०-१९७०).