३. मुख्याध्यापकाची अर्हता व नेमणूक - महाराष्ट्र खाजगी शाळा कर्मचारी (सेवेच्या शर्ती) नियमावली, १९८१

 ३. मुख्याध्यापकाची अर्हता व नेमणूक

३. मुख्याध्यापकाची अर्हता व नेमणूक - (१) (अ) (एक) पटावर २००पेक्षा अधिक विद्यार्थी असणार्‍या किंवा एक ते सात इयत्ता असणाऱ्या प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापक म्हणून नेमणूक करावयाची व्यक्ती ही, ज्याची कमीत कमी पाच वर्षा इतका काळ सेवा झाली असेल असा ज्येष्ठतम प्रशिक्षित शिक्षक असेल;

(दोन) अन्य कोणत्याही प्राथमिक शाळेचा मुख्याध्यापक म्हणून नेमणूक करावयाची व्यक्ती ही, त्या शाळेतील ज्येष्ठतम शिक्षक असेल;

(ब) रात्र शाळेतसुद्धा कोणत्याही माध्यमिक शाळेचा आणि कनिष्ठ अध्यापक विद्यालयाचा मुख्याध्यापक/प्राचार्य म्हणून नेमणूक करावयाची व्यक्ती ही, सांविधिक (Statutory) विद्यापीठाची अध्यापनातील किंवा शिक्षणशास्त्रातील स्नातक पदवी किंवा शासनाने ततुल्य म्हणून मान्यता दिलेली अन्य अहर्ता धारण करणारी आणि स्नातक पदवी मिळाल्यानंतर एखाद्या माध्यमिक शाळेत किंवा कनिष्ठ अध्यापक विद्यालयात पूर्णवेळ शिकवण्याचा किंवा एकूण किमान पाच वर्षाचा अनुभव असलेली पदवीधर व्यक्ती असेल; त्यापैकी किमान दोन वर्षाचा अनुभव हा अध्यापनातील किंवा शिक्षणशास्त्रातील स्नातक पदवी मिळाल्यानंतर असावा लागेल;

परंतु, रात्रीच्या माध्यमिक शाळेचा मुख्याध्यापक म्हणून नेमणूक करावयाच्या व्यक्तीच्या बाबतीत -

(एक) ती व्यक्ती, दिवसा शाळेच्या मुख्याध्यापकाचे किंवा उप-मुख्याध्यापकाचे पद धारण करणारी व्यक्ती असता कामा नये; आणि

(दोन) पोट-नियम (१) च्या खंड (ब) मध्ये ठरवून दिलेला अनुभव हा अंशकालिक शिक्षक म्हणून असू शकेल.

() रात्र शाळेतसुद्धा माध्यमिक शाळेच्या किंवा कनिष्ठ अध्यापक विद्यालयाच्या प्रमुखाच्या पदावरील नेमणुकीच्या बाबतीत, पोट-नियम (१) च्या खंड (ब) मध्ये नमूद केलेला अध्यापनाचा अनुभव असणारी एकही व्यक्ती शाळेच्या शिक्षक वर्गात उपलब्ध नसेल किंवा अर्हताप्राप्त व्यक्ती उपलब्ध अपाणि पात्र असल्या तरी त्यांनी आपला मुख्याध्यापकाच्या पदावरील हक्क सोडून दिलेला असेल आणि व्यवस्थापक वर्ग ज्या व्यक्तीला पोट-नियम (१), खंड (ब) मध्ये नमूद केलेला आवश्यक तो अध्यापनाचा अनुभव नाही अशा अध्यापक वर्गातील एखाद्या व्यक्तीची नेमणूक करू इच्छित असेल तर, व्यवस्थापकवर्ग त्या संबंधीची आवश्यकता शर्त शिथिल करण्यासाठी उप-संचालकाकडे अर्ज करील. उप-संचालक, कारणे लेखी नमूद करून अशा शिथिलीकरणास मंजूरीचा नकार देऊ शकेल. अशा प्रकारणी उप-संचालकांची पूर्वमान्यता घेतल्याखेरीज नेमणूक करण्यात येणार नाही.

टीप: - माध्यमिक शाळेच्या किंवा शिक्षणशास्त्र अध्यापक विद्यालयाच्या सेवेत दिनांक १ जून १९६३ रोजी पंधरा वर्षाहून अधिक काळ असलेल्या पदवीधर शिक्षकांच्या बाबतीत, मुख्याध्यापक म्हणून नेमणुक करण्यासाठी आवश्यक असलेल्या अर्हता उप-संचालक शिथिल करील.

() रात्र शाळेतसुद्धा एखाद्या शाळेच्या मुख्याध्यापकाचे पद (जर, ती त्या व्यवस्थापनाची ती एकच शाळा असेल तर, ) [जर, त्या व्यवस्थपनातर्फे (रात्रशाळा वगळता) एकाहून अधिक शाळा चालवल्या जात असतील तर,] सेवेत असलेल्या अध्यापक वर्गापैकी जी व्यक्ती, पोट-नियम () मध्ये ठरवून दिलेल्या शर्ती पूर्ण करीत असेल तिचे सेवाविषयक पूर्ववृत्त समाधानकारक असेल अशा अनुसूची "" मध्ये घालून दिलेल्या मार्गदर्शन तत्वानुसार वरिष्ठतम व्यक्तीची नेमणूक करून व्यवस्थापक वर्ग भरली.

*स्पष्टीकरण - या नियमाच्या प्रयोजनार्थ , समाधानकारक सेवाविषयक पूर्ववृत्त असणाऱ्या ज्येष्ठतम अर्हताप्राप्त शिक्षकाला व्यवस्थपक वर्ग, मुख्याध्यापकाची जागा रिक्त झाल्याचे कळवील आणि पत्र मिळाल्याच्या दिनांकापासून पंधरा दिवसांच्या कालावधीत त्या पदावर नेमणूक करिता अनुमती सादर करण्यास सांगेल. समाधानकारक सेवाविषयक पूर्ववृत्त असणाऱ्या ज्येष्ठतम अर्हताप्राप्त शिक्षकाच्या, मुख्याध्यापकाच्या पदावरील नियुक्तीचा हक्क, साज त्याने स्वेच्छेने त्या पदावरील आपला हक्क सोडला असल्याचे लेखी निवेदन शिक्षण अधिकाऱ्याला राजीखुषीने दिले असेल तरच, दुर्लक्षिता येईल. त्यामुळे त्यानंतर जेव्हा केव्हा पदे रिक्त होतील तेव्हा त्याचा त्या पदासाठी विचार होण्यास प्रत्यवाय असणार नाही. वर उल्लेखिल्याप्रमाणे पत्र मिळाल्यापासून पंधरा दिवसांच्या कालावधीत असा शिक्षक आपले निवेदन स्वतःच्या हस्तक्षरात शिक्षक अधिकाऱ्यासमोर लिहून देईल आणि अधिकारी ते निवेदन आपल्या समक्ष नोंदीविल्याचे नमूद करील. अशा शिक्षकाने अधिकाऱ्यासमोर एकदा असलं निवेदन रीतसर केल्यानंतर ते मागे घेऊन दिले जाणार नाही. पंधरा दिवसांच्या कालावधीत अशा शिक्षकाने एकतर त्या पदावरील नेमणुकीला अनुमती कळविली नाही किंवा शिक्षण अधिकाऱ्याला निवेदन दिले नाही तर, त्याने त्या पदावरील आपला हक्क सोडल्याचे गृहीत धरले जाईल:

परंतु, असे की, रीतसर नोटीस देता राजीनामा, मृत्यू, सेवासमाप्त करणे, दर्जा कमी करणे इत्यादींसारख्या कारणामुळे जेव्हा मुख्याध्यापकांचे पद अचानकपणे रिक्त होते अशा परिस्थितीत त्या पदावरील आपले हक्क सोडून देऊ इच्छिणाऱ्या शिक्षक, व्यवस्थापकवर्गाकडून अशी जागा रिक्त झाली असल्याचे पत्र मिळाल्यापासून दिवसात, त्याबाबत व्यवस्थापकवर्गाला कळवील जेणेकरून व्यवस्थापकवर्गाला नेमणुकीबाबत अंतिम निर्णय घेणे शक्य होईल. त्यानंतर शक्य तितक्या लवकर, मात्र कोणत्याही परिस्थितीत वर उल्लेखिलेले पत्र मिळाल्यापासून १५ दिवसांच्या कालावधीत, असा शिक्षक आपले अंतिम निवेदन शिक्षण अधिकाऱ्याकडे नोंदविला; जेणेकरून व्यवस्थापकवर्गाने केलेल्या नेमणुकीला मान्यता देणे किंवा प्रकरणपरत्वे व्यस्थापकवर्गाकडे आपण पाठविलेले लेखी निवेदन व्यवस्थपकवर्गाने आपणाकडून बळजबरीने लिहून घेतले असल्याचा उल्लेख शिक्षकाने शिक्षण अधिकाऱ्याकडे द्यावयाच्या निवेदनात केला असल्यास, ती नेमणूक अमान्य करणे शिक्षण अधिकाऱ्याला शक्य होईल. वर उल्लेखिलेल्या १५ दिवसांच्या कमावधीत त्या शिक्षकाने आपले अंतिम निवेदन नोंदविले नाही तर त्याने त्या पदावरील आपला हक्क सोडल्याचे गृहीत धरले जाईल.


() मुलींच्या माध्यमिक शाळेच्या बाबतीत किंवा महिला अध्यापक विद्यालयाच्या बाबतीत पोट-नियम (), खंड () मध्ये ठरवून दिलेल्या शर्ती पूर्ण करणाऱ्या समाधानकारक सेवा विषयक पूर्ववृत्त असणाऱ्या जेष्ठतम शिक्षिकेस, पुरुष शिक्षकांच्या तुलनेने तिची जेष्ठता लक्षात घेता, त्या शाळची/विद्यालयाची मुख्याध्यापिका/प्राचार्य म्हणून नेमण्यात येईल.

मुख्याध्यापकांचे पद भरण्यासाठी उपलब्ध नसेल तर, व्यवस्थापकवर्ग प्राथमिक शाळेच्या बाबतीत शिक्षण अधिकाऱ्यांचे किंवा इतर शाळांच्या बाबतीत उप-संचालकांची पूर्वपरवानगी घेऊन, त्या पदासाठी जाहिरात देईल आणि आवश्यक ती अर्हता अनुभव असणाऱ्या व्यक्तीची निवड करून नेमणूक करील.

(ब) पदासाठी जाहिरात देण्याची परवानगी किमान दोन महिने आगाऊ अर्ज करावा लागेल. दोन महिन्याची ही मुदत, नवीन शाळांच्या बाबतीत किंवा ज्या बाबतीत पद रिकामे होण्यासंबंधी आगाऊ अंदाज येणे शक्य नसेल अशा आकस्मिक प्रकरणी, शिक्षणाधिकाऱ्यांना किंवा प्रकरणपरत्वे उप-संचालकाला करता येईल, उप-संचालकांची किंवा शिक्षण अधिकाऱ्यांची परवानगी मिळाल्यानंतर जाहिरात देण्यात येईल ती जाहिरात प्राथमिक शाळा किंवा माध्यमिक शाळा किंवा अध्यापक विद्यालय ज्या भागात असेल त्या भागात भरपूर खप *असलेल्या किमान दोन दैनिक वर्तमानपत्रात यापैकी एक मराठी वर्तमानपत्र असेल प्रसिद्ध होईल अशी व्यवस्थापक वर्ग खात्रीलायक तजवीज करील.

(६) या नियमात ठरवून दिलेल्या कार्यपद्धती न अनुसरता करण्यात आलेल्या नेमणुका रद्द करण्यासाठी शिक्षण अधिकारी किंवा उपसंचालक व्यवस्थापक वर्गास निदेश देईल.

स्पष्टीकरण - या नियमांच्या प्रयोजनार्थ संबंधित शिक्षकाचा पूर्वीच्या पाच वर्षाच्या गोपनीय वार्षिक अहवालात जर, प्रतिकूल असा काही शेरा नसेल तर, त्याची सेवा कारकीर्द समाधानकारक असल्याचे मानण्यात येईल. कोणताही प्रतिकूल शेरा संबंधित शिक्षकाला लेखी कळविला नसल्यास, तो या प्रयोजनार्थ दुर्लाक्षिण्यात येईल.

*अधिसूचना क्रमांक खाशान्या १०८३/१९४/माशि ३ कक्ष, दिनांक २० डिसेंबर १९८४ अन्वये सुधारल्याप्रमाणे

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र खाजगी शाळा कर्मचारी (सेवेच्या शर्ती) नियमावली, १९८१- व्याख्या

अनुसूची “ज” - कर्मचार्‍यांची कर्तव्ये - महाराष्ट्र खाजगी शाळा कर्मचारी (सेवेच्या शर्ती) नियमावली, १९८१

१६. रजा - महाराष्ट्र खाजगी शाळा कर्मचारी (सेवेच्या शर्ती) नियमावली, १९८१