१६. रजा - महाराष्ट्र खाजगी शाळा कर्मचारी (सेवेच्या शर्ती) नियमावली, १९८१

१६रजा

१६. रजा - (१) हक्क म्हणून रजा मागता येेणार नाही. नैमित्तिक रजेव्यतिरिक्त रजा मंजूर करणे, ती नाकारणे किंवा रद्द करणे याबाबतचा विवेकाधिकार (एक) (मुख्याध्यापक वगळून अन्य) शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारीवर्गाच्या बाबातीत, शाळा समितीकडू व (दोन) मुख्याध्यापकाच्या बाबतीत, व्यवस्थापकवर्गाकडे राखून ठेवण्यात आला आहे.

() नैमित्तिक रजेव्यतिरिक्त इतर रजेसाठी, रजावाढीसाठी किंवा मोठ्या सुट्टीनंतर रजेवर जाण्यासाठी करावयाचा अर्ज, सामान्यत: रजा किंवा रजावाढ ज्या तारखेपासून पाहिजे असेल त्या तारखेपूर्वी पुरेसा अधी करावा लागेल. कर्मचार्‍याच्या आटोक्याबाहेरील परिस्थितीमुळे आगाऊ अर्ज करणे शक्य नसेल अशा अपवादात्मक बाबतीत देखील, अनुपस्थितीच्या तारखेपासून सात दिवसांच्या आत अर्ज न केल्यास, त्याने सेवा सोडली असल्याचे मानण्यात येईल.

*() ज्या कर्मचार्‍याला अनुपस्थितीच्या तारखेपासून सात दिवसांच्या आत अर्ज न करण्यामागे पुरेसे कारण नसेल अशा स्थायी कर्मचार्‍याच्या बाबतीत, ही गोष्ट शिस्तभंग म्हणून समजण्यात येईल; आणि योग्य चौकशी केल्यावर योग्य त्या शिस्तभंगाच्या कार्यवाहीस तो पात्र ठरेल. जो कर्मचारी तीन वर्षापेक्षा अधिक काळ रजा न मागता सातत्याने अनुपस्थित राहिला असेल अशा स्थायी कर्मचार्‍याने स्वेच्छेने सेवा सोडली असल्याचे मागण्यात येईल.

() मुख्याध्यापकाशिवाय इतर शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारीवर्गास मुख्याध्यापकांकडून व मुख्यध्यापकास मुख्य कार्यकारी अधिकार्‍याकडून व मुख्याध्यापक स्वत:च मुख्य कार्यकारी अधिकारी असेल तर व्यवस्थापकवर्गाकडून एका शैक्षणिक वर्षात जास्तीत जास्त १५ दिवस एवढी नैमित्तिक रजा मंजूर करता येईल; मात्र सामान्यत: एका वेळी सात दिवसांपेक्षा अधिक नैमित्तिक रजा घेता येणार नाही. फक्त अपवादात्मक परिस्थितीतच ही मुदत १० दिवसांपर्यंत वाढविता येईल.

() नैमित्तिक रजेच्या कोणत्याही कालावधीच्या माग आणि/किंवा पुढे किंवा दोन्ही प्रकारे दोनपेक्ष अधिक सुट्ट्या जोडता येणार नाहीत आणि एकाच वेळी नैमित्तिक रजा व सुट्टी सलगपणे उपभोगली जाईल तेव्हा, असा कलावधी सात दिवसांपेक्षा अधिक होता काम नये, फक्त अपवादात्मक परिस्थितीत ही मुदत १० दिवसापर्यंत वाढविता येईल.

() नैमित्तिक रजेच्या मागे आणि/किंवा नंतर किंवा दोन्ही प्रकारे दोनपेक्षा अधिक जोडलेल्या सुट्या नैमित्तिक रजा म्हणून समजण्यात येतील. दोन नैमित्तिक रजा कालावधींच्या दरम्यान येणारा रविवार व सुट्ट्या या नैमित्तिक रजेचा भाग असल्याचे समजण्यात येईल.

() मुख्याध्यापकाच्या पूर्वपरवानगीशिवाय, नैमित्तिक रजा सामान्यत: मोठ्या सुट्टीच्या मागे किंवा पुढे जोडता येणार नाही.

() अनुपस्थितीचा कालावधी जर, कामाच्या दिवसाच्या निम्मा किंवा निम्म्यापेक्षा कमी असेल तर अर्ध्या दिवसाची नैमित्तिक रजा घेता येईल.

() शनिवार हा कामाचा अर्धा दिवस असेल त्यादिवशी होणारी किंवा ती शाळा जो कामाचा अर्धा दिवस मानत असेल अशा इतर कोणत्याही दिवशी होणारी अनुपस्थिती ही अर्ध्या दिवसाची नैमित्तिक रजा न मानता पूर्ण दिवसांची नैमित्तिक रजा असल्याचे मानण्यात येईल.

(१०) पुढील प्रकारच्या विशेष नैमित्तिक रजा अनुज्ञेय राहतील व त्या कर्मचार्‍याला अनुज्ञेय असलेल्या नैमित्तिक रजाखाती खर्ची घालण्यात येणार नाहीत :-

(अ) कुटुंब नियोजन योजनेखालील विशेष नैमित्तिक रजा -

प्रसंग

()

अनुज्ञेय असलेली विशेष नैमित्तिक रजा

()

(एक)    स्त्रियांवरील किंवा प्रकरणपरत्वे पुरूषांवरील नसबंदीची शस्त्रक्रिया.

जास्तीत जास्त सहा कामाचे दिवस.

(दोन)    महिला कर्मचार्‍यांच्या प्रसुतिकालीन निर्बीजीकरण शस्त्रक्रिया

जास्तीत जास्त १४ दिवस.

टीप - वरील दोन प्रसंगी घ्यावयाची विशेष नैमित्तिक रजा ही सर्वसाधारण नैमित्तिक रजेस किंवा नेहमीच्या रजेस जोडून घेता येईल, मात्र अशा अर्जाला वैद्यकीय प्रमाणपत्राचा आधार असला पाहिजे.

* टीप २ - रद्द केली.

(तीन) गर्भाशय वलय (लूप) पद्धती व (आय यु.सी.डी.) बसवून घेणार्‍या महिला कर्मचारी.

वैद्यकीय प्रमाणपत्र सादर करण्याच्या शर्तीवर त्या एका दिवसापुरती

(चार) ज्याच्या पत्नीने निर्वीजीकरण शस्त्रक्रिया (प्रसूतिकालेतर शास्त्रक्रिया) करून घेतली असेल असा कर्मचारी.

वैद्यकीय प्रमाणपत्र सादर करण्याच्या शर्तीवर जास्तीत जास्त सात दिवस.

टीप (१) - रजेच्या कालावधीत स्वत:च्या पत्नीची देखभाल करण्यासाठी तेथे कर्मचार्‍याची उपस्थिती आवश्यक आहे अशा अर्थाच्या प्रत्यक्षात ज्या डॉक्टरने शस्त्रक्रिया केली असेल त्या डॉक्टरने दिलेल्या वैद्यकीय प्रमाणपत्रांचा आधार अर्जाला असेल तर, विशेष नैमित्तिक रजा सर्वसाधारण नैमित्तिक रजेला किंवा नेहमीच्या रजेला जोडून घेता येईल.

टीप (२) - ज्याच्या पत्नीने प्रसूतीनंतर ताबडतोब निर्बीजीकरण शस्त्रक्रिया करून घेतली असेल त्या कर्मचार्‍याला; प्रत्यक्षात ज्या डॉक्टरने शस्त्रक्रिया केली असेल त्या डॉक्टरने दिलेले वैद्यकीय प्रमाणपत्र सादर करण्याच्या शर्तीवर जास्तीत जास्त चार दिवस इतकी विशेष नैमित्तिक रजा मंजूर करण्यात येईल.

(ब) खालील नमूद केलेल्या अन्य प्रयोजनासाठी विशेष नैमित्तिक रजा : -

प्रसंग

()

अनुज्ञेय असलेली विशेष नैमित्तिक रजा

()

(एक) कुत्रा चावल्यावर उपचार

तीन आठवड्यापर्यंत

(दोन) राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय क्रिडा स्पर्धामधील सहभाग

टीपा (२) आणि (४) यांच्या तरतुदीच्या अधीनतेने ३० दिवसापर्यंत.

(तीन) गिर्यारोहण

टीपा (३) आणि (४) यांच्या तरतुदीच्या अधीनतेने ३० दिवसापर्यंत.

(चार) मोफत रक्तदान

एक दिवस (एकतर रक्तदान केल्याच्या दिवशी किंवा त्यानंतरच्या लगेच पुढच्या दिवशी, परंतु त्यानंतरच्या अन्य कोणत्याही दिवशी नाही.

टीप (१) - बाब (एक) अन्वये रजा देण्यात आलेल्या कर्मचार्‍यांच्या जागी जर, बदली व्यक्ती नेमण्यात आलेली असेल तर, अशा बदली व्यक्तीस त्याला अनुज्ञेय असलेले वेतन व भत्ते मिळण्याचा हक्क असेल.

टीप (२) - राष्ट्रीय किंवा अंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धामध्ये सहभागी होण्यासाठी दिली जाणारी विशेष नैमित्तिक रजा ही पुढील प्रयोजनासाठी देण्यात येईल :-

() राष्ट्रीय किंवा अंतरराष्ट्रीय दृष्ट्या महत्त्वाच्या क्रीडा प्रकारांमध्ये भाग घेण्यासाठी,

() अशा रीतीने पुढील क्रिडा प्रकारात भाग घेण्यासाठी कर्मचार्‍यांची निवड करण्यात आली असेल तेव्हा :

(एक) अखिल भारतीय परिषद किंवा मंडळ यांची मान्यता असलेल्या आणि भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयाने मान्यता दिलेल्या राष्ट्रीय क्रिडा महासंघ किंवा संघ यांनी आयोजित केलेल्या आंतरराष्ट्रीय क्रीडा प्रकारच्या बाबतीत, किंवा

(दोन) ज्यामध्ये भाग घेतला असेल तो क्रिडा प्रकार आंतरराज्य, आंतर परिक्षेत्र (Inter Zonal) किंवा आंतर मंडल (Inter Circle) स्तरावर आयोजित केलेला असेल आणि कर्मचार्‍यांने त्या क्रीडा प्रकारात संघामध्ये राज्याचा, परिक्षेत्राचा किंवा मंडलाचा रीतसर निर्दिष्ट प्रतिनिधी म्हणून भाग घेतला असेल आणि जेव्हा त्याने वैयक्तिकरीत्या भाग घेतला असेल अशा राष्ट्रीय महत्त्वाच्या क्रीडा प्रकारच्या बाबतीत;

() कर्मचार्‍याची प्रशिक्षण शिबिरात किंवा अखिल भारतीय खास शिक्षण किंवा प्रशिक्षण योजनामध्ये हजर राहण्यासाठी खास शिक्षण घेण्यासाठी निवड करण्यात आलेली असेल किंवा त्याला पुरस्कृत करण्यात अलेले असेल किंवा अशा क्रिडा प्रकारासाठी पंच म्हणून त्याच्या सेवा उपयोगात आणल्या जात असतील तेव्हा;

टीप (३) - भारतीय गिर्यारोहण प्रतिष्ठानाने मोहिमेला मान्यता दिलेली असेल तेव्हा, गिर्यारोहणासाठी विशेष नैमित्तिक रजा अनुज्ञेय असेल.

टीप (४) - जर कर्मचार्‍याने राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय क्रिडा प्रकारामध्ये तसेच गिर्यारोहण्यामध्ये भाग घेतला असेल तर, एकूण विशेष नैमित्तिक रजा ३० दिवसापेक्षा अधिक होता कामा नये.

* (११) मोठी सुटी अनुज्ञेय असलेल्या कर्मचार्‍यांसहित प्रत्येक कर्मचार्‍याला सेवेच्या पूर्ण केलेल्या प्रत्येक वर्षागणिक २० दिवसांची अर्धंपगारी रजा अनुज्ञेय असेल आणि अशी रजा खाजगी कारणासाठी किंवा वैद्यकिय प्रमाणपत्र सादर केल्यावर देता येईल. सेवेचे वर्ष पूर्ण होते त्यादिवशी कर्मचारी रजेवर असला तरी पुन:सेवेत हजर न होता त्याला त्या वर्षाची अर्धपगारी रजा अनुज्ञेय राहील. ह्या प्रयोजनार्थ निजलंबनाचा काही कालावधी असल्यास जो कालावधी निलंबन म्हणूनच गणला आहे तेवढा कालवधी पूर्ण वर्ष मोजताना वजा केला जाईल.

(१२) (अ) देय असलेल्या अर्धपगारी रजेच्या निम्म्या कालावधीपेक्षा अधिक नसेल इतकी परिवर्तित रजा, नोंदी व वैद्यक व्यवसायीने आजाराचे स्वरूप इतकी संभाव्य कालावधी शक्यतो स्पष्टपणे नमूद करणारे वैद्यकीय प्रमाणपत्र सादर केल्यावर पुढील अटींवर देता येईल :-

(एक) परिवर्तित रजा देण्यात आली असेल तेव्हा, देय असलेल्या अर्धपगारी रजेच्या खात्यावर अशा परिवर्तीत रजेच्या दुप्पटीइतकी रजा खर्ची घालण्यात येईल.

*(दोन) रजा संपल्यानंतर कर्मचारी कामावर परत रजू होण्याची पुरेशी शक्यता आहे रजा मंजूर करण्यास सक्षम असलेल्या प्राधिकार्‍याचे समाधान झाल्याशिवाय या नियमान्वये कोणतीही परिवर्तित रजा देण्यात येणार नाही.

* (तीन) रजा मंजूर करण्यास सक्षम असलेला प्राधिकारी कर्मचार्‍याकडून असे हमीपत्र घेईल की, जर त्याने राजिनामा दिला अगर स्वेच्छानिवृत्ती घेतली तर परिवर्तित रजेच्या कालावधीत घेतलेली रजा वेतन व अर्धपगारी रजेत अनुज्ञेय असलेले रजा वेतन यातील फरकाची रक्कम तो परत फेडील.

(ब) रजा मंजूर करण्यास सक्षम असलेला प्राधिकारी स्वविकेकानुसार, मुंबईतील शासकीय वैद्यकीय रूग्णालयातील अधीक्षक किंवा जिल्हा शल्यचिकित्सक किंवा जिल्हा वैद्यकीय अधिकारी, किंवा जिल्हा परिषद नगरपालिकेचा किंवा महानगरपालिकेचा वैद्यकीय अधिकारी यांस अर्जदारांची वैद्यकीय तपासणी करण्याची विनंती करून, दुसरा वैद्यकीय अभिप्राय मिळवू शकेल. प्राधिकार्‍याने असे करावयाचा निर्णय घेतल्यास, तो ज्या तारखेस पहिला वैद्यकीय अभिप्राय देण्यात आला होता त्या तारखेनंतर शक्य असेल त्या लवकरच्या तारखेस दुसरी वैद्यकीय तपासणी करवून घेण्याची व्यवस्था करवील. अर्जदाराने सादर केलेले मूळ वैद्यकीय प्रमाणपत्र, तो प्राधिकारी ज्या वैद्यकीय अधिकार्‍यांकडून त्याची पुन्हा तपासणी होणार असेल त्या वैद्यकीय अधिकार्‍याकडे पाठवील.

(क) आवश्यक तर पुन्हा तपासणी करवून घेण्याची व्यवस्था व्यवस्थापकवर्ग त्यासाठी काही खर्च करावा लागल्यास स्वत:च्या खर्चाने करील, आणि यामुळे होणार कोणताही खर्च अनुदानासाठी पात्र असणार नाही.

(ड) रजा मंजूर करणार्‍या प्राधिकार्‍याने जो अभ्यासक्रम सार्वजनिक हिताचा असल्याचे प्रामाणित केले आहे अशा मान्य अभ्यासक्रमाकरिता, अर्धपगारी रजेच्या विनियोग करण्यात येत असेल त्याबाबतीत, खंड (अ) चे उपखंड (एक) आणि (दोन) यामध्ये नमूद केलेल्या अटीवर, संपूर्ण सेवाकालात जास्तीत जास्त १८० दिवस इतकी अर्धपगारी रजा परिवर्तित करण्यास परवानगी देण्यात येईल.

*(इ) परिवर्तित रजा मंजूर केलेल्या कर्मचार्‍याने सेवेचा राजिनामा दिला अगर त्याच्या विनंतीनुसार पुन: कामावर हजर न होता स्वेच्छेने सेवानिवृत्त होण्याची परवानगी त्याला दिली तर त्याबाबतीत, परिवर्तित रजा अर्धपगारी रजा गणली जाईल आणि परिवर्तित रजेचे रजावेतन व अर्धपगारी रजेचे रजावेतन यातील फरक वसूल केला जाईल; परंतु असे की, सेवा चालू ठेवण्यासाठी शारीरिक असमर्थता अणणारा आजार हे सेवानिवृत्तीचे कारण असेल अगर कर्मचार्‍याचा मृत्यू ओढचला असेल तर अशी वसुली केली जाणार नाही.

(१३) ज्याबाबतीत नियमानुसार अन्य कोणतीही रजा अनुज्ञेय नसेल अशा विशेष बाबतीत किंवा ज्याबाबातीत अन्य रजा अनुज्ञेय असूनही कर्मचार्‍याने असाधारण रजा देण्यात यावी असा लेखी अर्ज केलेला असेल त्या बाबतीत, कर्मचार्‍याच्या बाबतीत, कोणत्याही एका वेळी असाधारण रजेचा कालवधी तीन महिन्यांपेक्षा अधिक असणार नाही. स्थायी कर्मचार्‍याच्या बाबतीत कोणत्याही एकावेळी असाधारण रजेचा कालावधी तीन वर्षापेक्षा अधिक असणार नाही. रजा मंजूर करण्यास सक्षम असणार्‍या प्राधिकार्‍यास, रजेशिवाय अनुपस्थितीचा कालावधी पूर्वलक्षी प्रस्तावाने असाधारण रजेत परिवर्तित करता येईल.

* (१४) (अ) पोट-नियम (१६) च्या तरतुदीच्या अधीनतेने, ज्या कर्मचारी महिलेची सेवा एक वर्षापेक्षा जास्त झालेली आहे अशा कर्मचारी महिलेला प्रसूती रजा करण्यात येईल. ही रजा ती सूरू झाल्याच्या तारखेपासून जास्तीत जास्त नव्वद दिवसाइतक्या मुदतीपर्यंत देता येईल.

स्पष्टीकरण - मोठी सुटी अनुज्ञेय असलेल्या महिला कर्मचार्‍यांच्या बाबतीत प्रसूतीची तारीख मोठ्या सुटीत पडली तर प्रसूती रजा प्रसुतीच्या तारखेपासून सुरू होईल व ती मोठ्या सुटीच्या बरोबरीनेच गणली जाईल.

(ब) प्रसूतीची संभाव्य तारीख नमूद करणारा वैद्यकीय दाखला व आपण वैद्यकीय प्रमाणपत्राच्या आधारे प्रसूतीची तारीख कळवू असे हमीपत्र, प्रसूती रजेच्या अर्जासोबत न चुकता पाठविले जातील. रीतसर वैद्यकीय प्रमाणपत्राचा आग्रह धरल्यास त्रास होण्याची शक्यता असल्याने निम्नश्रेणी कर्मचार्‍यांच्या बाबतीत रजा मंजूर करणार्‍या प्राधिकार्‍याला पुरेसे वाटेल असे प्रमाणपत्र स्वीकारता येईल.

(१५) ज्या कर्मचारी महिलेची सेवा अशा रजेस सुरूवात होण्यासच्या तारखेपूर्वी एक वर्षापेक्षा अधिक परंतु दोन वर्षापेक्षा कमी झालेली असेल अशा महिलेला पोट-नियम (१४) अन्वये अर्धपगारी प्रसुती रजा देण्यात येईल. अशा रजेस सुरूवात झाल्याच्या तारखेस, ज्या कर्मचारी महिलेची सेवा दोन वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक झालेली असेल अशा महिलेच्या बाबतीत, तिला भरपगारी प्रसूती रजा देण्यात येईल. एक वर्षापेक्षा कमी सेवा झालेल्या कर्मचारी महिलेच्या बाबतीत, तिला तेवढ्याच कालावधीची असाधारण रजा मंजूर करण्यात येईल.

(१६) प्रसूती रजा, रजेच्या हिशेबात खर्ची घालण्यात येणार नाही. वैद्यकीय प्रामणपत्रांच्या आधारे विनंती केलेली असेल तर प्रसूती रजेचा जोडून कोणतीही अन्य प्रकारची रजा मंजूर करता येईल.

(१७) तीन किंवा तीनपेक्षा अधिक अपत्ये ह्यात असलेल्या कर्मचारी महिलेला प्रसूती रजा देण्यात येणार नाही.

टीप - गर्भस्त्राव किंवा गर्भपात किंवा “वैद्यकीय गर्भसंमापन अधिनियम, १९७१” (१९७१ चा ३४) अन्वये केलेले गर्भसंमापन याबाबतीत पुढील अटीच्या अधीनतेने, या नियमाखालील रजा अनुज्ञेय असेल :

() रजा सहा आठवड्यांपेक्षा अधिक असता कामा नये; आणि

() रजेसाठी केलेल्या अर्जासोबत वैद्यकीय प्रमाणपत्र जोडावे लागेल.

* (१८) (अ) जर माध्यमिक शाळेच्या मुख्यध्यापकाव्यतिरिक्त (परंतु उप-मुख्याध्यापकासहित) एखाद्या स्थायी कर्मचारी मोठ्या सुट्यांना हक्कदार असूनही एखाद्या वर्षात पूर्ण मोठ्या सुट्यांचा किंवा त्याच्या एखाद्या भागाचा लाभ घेण्यास प्रतिबंध झालेला असेल तर, त्याबद्दल त्याला पूर्ण सुटीशी त्याने सुटीच्या न उपभोगलेल्या दिवसांच्या संख्येचे जे प्रमाण असेल त्या प्रमाणात वार्षिक ३० दिवसांच्या अर्जित रजेची प्रमाणशीर असलेल्या संख्येएवढी अर्जित रजा अनुज्ञेय होईल.

उदाहरणार्थ - एका वर्षात, एखाद्या कर्मचार्‍याला ६३ दिवसांची पूर्ण सुटी उपभोगण्यास प्रतिबंध झाला तर, त्याबद्दल त्यास ३० दिवसांची अर्जित रजा मिळण्याचा हक्क असेल. त्याचप्रमाणे ज्या कर्मचार्‍याला एकूण सुटीपैकी २१ दिवसांची सुटी उपभोगण्यास प्रतिबंध झाला असेल त्या कर्मचार्‍याला त्याबद्दल १० दिवसांची अर्जित रजा मिळण्याचा हक्क असेल या धर्तीवर अशी अर्जित रजा अनुज्ञेय होईल.

*(ब) मोठ्या सुटीच्या कालावधीत कराव्या लागणार्‍या कामाची भरपाई करण्याच्या प्रयोजनार्थ, माध्यमिक शाळेच्या मुख्याध्यापकाला (परंतु उप-मुख्याध्यापकाला नाही) १एप्रिल १९८१ पासून सेवेच्या प्रत्येक पूर्ण वर्षासाठी १५ दिवसांची अर्जित रजा अनुज्ञेय राहील, मात्र ज्या दिवशी असल्यास, पूर्वीची शिल्लक अर्जित रजा व मिळविलेली अर्जित रजा ही १८० दिवसाएवढी होईल त्या दिवशी मुख्याध्यापकाला अशी अर्जित रजा मिळणे बंद होईल.

*(१९) त्याच्या कर्तव्याच्या स्वरूपामुळे मुख्याध्यापकाला मोठ्या सुटीत सुद्धा शाळेचे काही काम कारवे लागेल. मोठ्या सुट्यांचा हक्कदार असलेल्या उप-मुख्याध्यापकासहित इतर कोणत्याही कर्मचार्‍यांच्या बाबतीत सुटीचा किंवा भागाचा लाभ घेण्यास त्याला प्रतिबंध करण्यासाठी मुख्याध्यापकाला शिक्षण अधिकार्‍याची पूर्वपरवानगी मिळावावी लागेल.

(२०) मोठ्या सुट्या मिळण्याचा हक्क नसलेल्या कर्मचार्‍याला कर्तव्यर्थ व्यतीत केलेल्या कालावधीच्या एक-अकरांश या प्रमाणात अर्जित रजा मिळेल. जेव्हा कर्मचार्‍याच्या खाती १८० दिवस इतकी अर्जित रजा साचेल तेव्हा, त्यापुढे अशी रजा अर्जित होण्याचे बंद होईल.

(२१) ज्याला पोट-नियम (१८)च्या तरतुदी लागू आहेत असा कर्मचारी धरून कोणाही कर्मचार्‍याला पुढील अटींवर, प्रत्यर्पित रजेचे रोख रक्कमेत रूपांतर करण्याचा लाभ मिळण्याचा हक्क असेल :-

(एक) अशी प्रत्यिर्पित रजा मोठ्या सुटीला जोडून घेता येणार नाही.

(दोन) कमीत कमी तीस दिवसांइतकी अर्जित रजा घेणार्‍या कर्मचार्‍यास, त्याच्या विकल्पानुसार रजेच्या प्रारंभाच्या तारखेला त्याच्या खाती जमा असलेली शिल्लक अर्जित रजा (किंवा तिचा कोणाताही भाग), तीस दिसवासांच्या कमाल मर्यादेस अधीन राहून, प्रत्यर्पित करण्याचा मुभा असेल आणि त्यास प्रत्यर्पित केलेल्या रजेच्या कलावधीबद्दल नियमानुसार अनुज्ञेय असलेली रजा, महागाई भत्ता आणि स्थानिक पूरक भत्ता देण्यात येईल.

(तीन) अर्जित रजा मंजूर करण्यास सक्षम असलेला प्राधिकारी अर्जित रजेचे प्रत्यर्पण स्वीकारण्यास सक्षम असेल. अर्जित रजेच्या प्रत्यर्पणांसाठी करावयाचा अर्ज रजा मिळण्यासंबंधात करावयाच्या अर्जासोबत करावा लागेल.

(चार) प्रत्यर्पित केलेल्या अर्जित रजेचे दिवस हे पत्यक्षात घेतलेल्या रजेच्या प्रारंभाच्या तारखेला प्रत्यर्पित केलेली रजा म्हणून गणले जातील आणि तितकी रजा त्या तारखेस कर्मचार्‍याच्या रजा खात्यातून वजा करण्यात येईल.

(पाच) प्रत्यक्ष उपभोगलेली अर्जित रजा आणि प्रत्यर्पित केलेली अर्जित रजा यांची एकूण बेरीज कर्मचार्‍याला कोणत्याही एका वेळी अनुज्ञेय रजेच्या कमाल मर्यादेपेक्षा अधिक होऊ नये.

(सहा) प्रत्यर्पित करण्यात आलेल्या रजेदाखल अनुज्ञेय असणारे रजा-वेतन आणि भत्ते हे अर्जित रजेच्या प्रारंभाच्यावेळी अनुज्ञेय असणार्‍या रजा-वेतनाच्या व भत्यांच्या प्रमाणात असतील. ज्या महिन्यात रजेचा लाभ घेतलेला असेल तो महिना, कोणताही असला तरी, या प्रयोजनार्थ एक महिना हा ३० दिवसांचा म्हणून हिशेबात धरला जाईल.

(सात) प्रत्यर्पित केलेल्या रजेदाखल द्यावयाची रजा-वेतनाची आणि भत्त्यांची रक्कम ही आगाऊ देता येईल; परंतु रजेच्या प्रारंभाच्या सहा दिवसांपेक्षा आधी नाही. कर्मचारी ज्या तारखेस रजेवर जाणार त्या तारखेपूर्वी सक्षम प्राधिकार्‍यास रजा रद्द करावी लागल्यास, प्रत्यर्पित केलेल्या रजेदाखल मिळालेली रजा-वेतनाची व भत्त्यांची रक्कम कर्मचार्‍याला एका हप्त्यात तात्काळ परत करावी लागेल किंवा कर्मचार्‍याच्या पहिल्या मासिक वेतनाच्या किंवा रजा-वेतनाच्या देयकात ती समायोजित करण्यात येईल. अशा आशयाची अट रजा मंजूर करण्यास सक्षम असणारा प्राधिकारी, मंजुरी आदेशातच समाविष्ट करील. प्रत्यर्पित केलेल्या रजेच्या कालावधीच्या रजा वेतनातून, भविष्यनिर्वाह निधीच्या वर्गण्या घरभाडे, कोणत्याही अग्रिमांची परतफेड आणि सरकारी संस्थांना देय असलेल्या कोणत्याही रकमांची परतफेड इत्यादीं दाखल कोणत्याही वजाती केल्या जाणार नाहीत.

(आठ) आपली रजा प्रत्यर्पित करण्याची परवानगी दिलेल्या कर्मचार्‍यास मंजूर करण्यात आलेली तीस दिवसांची रजा संपण्यापूर्वी कामावर पुन्हा रूजू होण्यास सर्वसाधारणत: परवानगी दिली जाणार नाही.

(नऊ) कर्मचार्‍याला सक्तीने कामावर पुन्हा बोलावल्यास त्याबाबतीत कर्मचार्‍याला, तो ज्या तारखेस अर्जित रजेवर गेला असेल त्या तारखेपासून सहा महिन्यांचा कालावधी समाप्त होणे किंवा अर्जित रजा प्रत्यर्पित करण्याचा लाभसह तो पुन्हा अर्जित रजेवर जाणे यापैकी अगोदरची घटना घडण्याच्या आत, त्याची उर्वरित अर्जित रजा उपभोगण्याची परवानगी देण्यात येईल. रजा मंजूर करण्यास सक्षम असलेला प्राधिकारी, उपरोक्त कालावधीत अशा कर्मचार्‍याने रजेसाठी अर्ज केल्यास, त्लया रजा मंजूर करील. संबंधित कर्मचार्‍यान ही रजा उपभोगण्यास परवानगी देण्याविषयी स्व:त विनंती न केल्यास, उर्वरित रजा बाद होईल आणि तो कालावधी जणू काही त्याने रजा उपभोगली आहे असे समजून त्याच्या रजेच्या हिशोबात खर्ची टाकण्यात येईल.

(दहा) प्रत्यर्पित रजेच्या संबंधात रजेच्या हिशोबात खर्ची नोंद करण्याचे राहून जाऊ नये यासाठी खबरदारीची उपाययोजना म्हणून, अशा कर्मचार्‍यांच्या बाबतीत, प्रत्यर्पित रजेचा तपशील, रजा-वेतन काढतेवेळी, त्यांच्या सेवापुस्तकात आणि त्यांच्या रजेच्या हिशेबात नमूद करण्यात येईल. सेवा पुस्तकात आणि रजेच्या हिशेबात आवश्यक त्या नोंदी करण्यात आल्या आहेत अशा अर्थाचे एक प्रमाणपत्र ज्या देयकात प्रत्यर्पित रजेचे रजा-वेतन काढण्यात येईल त्या देयकात शाळेकडून देण्यात येईल.

(अकरा) एक वित्तीय वर्षात किती अर्जित रजा प्रत्यर्पित करता येईल त्याची कमाल मर्यादा म्हणजे, किमान ३० दिवसांच्या अर्जित रजेचा कालवधी सुरू होण्याच्या तारखेस ३० दिवसांइतकी असेल.

(बारा) अर्जित रजा प्रत्यर्पित करण्याचा लाभ कोणत्याही वित्तीय वर्षात एकापेक्षा अधिक वेळा केल्यास परवानगी असणार नाही.

(तेरा) रजेवरून परत आल्यावर, कर्मचार्‍याला प्रत्यर्पित रजेच्या कालवधीइतका किमान काळ शाळेची सेवा करावी लागेल.

(२२) नैमित्तिक रजेव्यतिरिक्त कोणत्याही प्रकारची रजा अन्य कोणत्याही प्रकारच्या रजेच्या जोडीने किंवा तिला सलग जोडून मंजूर करता येईल.

(२३) अस्थायी कर्मचार्‍याला नैमित्तिक व प्रसूती रजेव्यतिरिक्त अन्य कोणत्याही रजा सेवेतून मिळण्याचा हक्क असणार नाही. अस्थायी कर्मचार्‍याची जेव्हा स्थायी पदावर नियुक्ती करण्यात येईल तेव्हा, त्याची पूर्वीची सलग सेवा स्थायी कर्मचारी म्हणून असती तर जी रजा मिळण्यास तो पात्र झाला असता ती रजा मिळण्याचा त्यास हक्क असेल. अस्थायी कर्मचार्‍याला प्रत्येक पूर्ण वर्षाला २० दिवस या प्रमाणात अर्धपगारी रजा मंजूर करण्यात येईल, मात्र संबंधित कर्मचारी ती रजा संपल्यावर कामावर परत येईल, असे, ती रजा मंजूर करणार्‍या सक्षम प्राधिकार्‍यास सकारण वाटले पाहिजे.

(२४) भरपगारी रजेवरील कर्मचार्‍याला रजेवर जाण्यापूर्वी मिळालेल्या वेतनाइतके रजा वेतन मिळण्याचा हक्क असेल.

(२५) अर्धपगारी रजेवरील कर्मचार्‍याला वरील पोट-नियम (२४) मध्ये विनिर्दिष्ट केलेल्या रकमेच्या निम्म्या दराने रजावेतन मिळण्याचा हक्क असेल. त्याशिवाय त्याला, रजा वेतनाच्या प्रमाणात महागाई भत्ता अधिक स्थानिक पूरक भत्ता आणि अनुज्ञेय असल्यास, घरभाडे भत्ता पूर्ण दराने मिळेल.

(२६) परिवर्तित रजेवरील कर्मचार्‍याला पोट-नियम (२५) अन्वये उनज्ञेय वेतनाच रकमेच्या दुप्पटीइतकी रजा वेतन मिळण्याचा हक्क असेल.

(२७) क्षयरोग, कर्करोग किंवा कुष्ठरोग झालेल्या कर्मचार्‍याला या प्रयोजनार्थ शासकीय कर्मचार्‍यांना अनुज्ञेय असते अशी विशेष रजा व भत्ते मिळण्याचा हक्क असेल.

(२८) असाधारण रजेवरील कर्मचार्‍याला कोणतेही रजा वेतन मिळण्याचा हक्क असणारा नाही.

* (२९) ज्याला पोट-नियम (१८)च्या तरतुदी लागू आहेत असा कर्मचारी धरून नियत वयोमानामुळे सेवानिवृत्त होणारा कोणीही कर्मचारी, सेवानिवृत्तीच्या वेळी त्याच्या खाती १८०दिवस इतक्या कमाल मर्यादेपर्यंत जितकी अर्जित रजा शिल्लक असेल तेवढ्या रजेच्या बाबतीतील रजावेतनाइतकी रोख रक्कम मिळण्यास पात्र असेल. तसेच, त्याला रजा वेतनाच्या रोख रकमेबरोबरच पुढील शर्तीच्या अधीनतेने निवृत्ती वेतन व मृत्यू-नि-सेवानिवृती उपदान मिळण्याचाही हक्क असेल :-

(अ) रजा वेतनाइतकी रोख रक्कम जास्तीत जास्त १८० दिवसांच्या अर्जित रजेपुरती मर्यांदित असेल.

(ब) अशा रितीने अनुज्ञेय असलेल्या रजावेतनाइतकी रोख रक्कम सेवानिवृत्तीनंतर प्रदेय होईल आणि एकदाच चुकती करावयाची रक्कम म्हणून ठोक रक्कम देण्यात येईल.

(क) रोख रकमेचे प्रदान हे, अर्जित रजेसाठी अनुज्ञेय असलेले रजावेतन अधिक त्या रजावेतनावर सेवानिवृत्तीच्या तारखेस अंमलात असलेल्या दराने अनुज्ञेय असलेला महागाई भत्ता एवढे असेल कोणताही स्थानिक पूरक भत्ता व घरभाडे भत्ता देय असणार नाही.

(ड) रजा मंजूर करण्यास सक्षम असणारा प्राधिकारी, त्या कर्मचार्‍याच्या निवृत्तीच्या तारखेस त्यांच्या खाती असलेल्या अर्जित रजेच्या सममूल्याइतकी रोख रक्कम मंजूर करण्याचे आदेश स्वत: होऊन काढील.

(३०) कर्मचार्‍याला त्याच्या खाती असलेल्या अर्जित रजेचा काही भाग हा सेवानिवृत्तीपूर्व रजा म्हणून उपभोगता येईल. त्याबाबतीत, त्याला या नियमांनुसार, निवृत्तीच्या तारखेस त्याच्या खाती शिल्लक असलेल्या अर्जित रजेच्या रजा वेतनाइतकी रोख रक्कम मिळण्याची परवानगी राहील.

(३१) भरपगारी किंवा अर्धपगारी किंवा बिनपगारी रजेवर असणार्‍या कर्मचार्‍याला रजेच्या कलावधीत वेतन किंवा परिश्रमिक यासह किंवा त्याविना कोणत्याही पूण वेळ नोकरी स्विकारता येणार नाही. कर्मचार्‍याला मुख्याध्यापकाची, शाळा समितीची किंवा प्रकारणपरत्वे व्यवस्थापकवर्गाची खास परवनगी मिळवून अंशकालीन नोकरी स्वीकारता येईल.

(३२) रजेवरील कर्मचार्‍याला, रजा संपण्यापूर्वी कामावर परत यावयाचे झाल्यास, रजा मंजूर करणार्‍या प्राधिकार्‍याची परवानगी घेतल्याशिवाय येऊ दिले जाणार नाही.

(३३) जेव्हा प्रशसनिक गरज असेल अशा अपवादात्मक परिस्थितीत, रजा मंजूर करण्यास सक्षम असलेला प्राधिकारी, रजेवर असलेल्या कर्मचार्‍याला, त्या निकडीचे स्वरूप विशेष करून, कामावर परत बोलवू शकेल, आणि कामावर परत येणे त्या कर्मचार्‍यावर बंधनकाकर राहील. तथापि, दिलेल्या दिनेशानुसार, कर्मचारी कामावर परत येऊ शकत नसेल तर, त्याला आपल्या असमर्थतेविषयीच्या खर्‍याखुर्‍या परिस्थितीबाबत उक्त प्राधिकार्‍यांची खात्री पटवून द्यावी लागेल.

*(३४) असाधारण रजेवरील कर्मचार्‍याच्या वेतनावाढीची तारीख अशा रजेच्या कालवधीइतकी पुढे ढकलली जाईल.


*अधिसूचना क्रमांक खाशान्या १०८३/१९४/माशि ३ कक्ष, दिनांक २० डिसेंबर १९८४ अन्वये सुधारल्याप्रमाणे

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र खाजगी शाळा कर्मचारी (सेवेच्या शर्ती) नियमावली, १९८१- व्याख्या

अनुसूची “ज” - कर्मचार्‍यांची कर्तव्ये - महाराष्ट्र खाजगी शाळा कर्मचारी (सेवेच्या शर्ती) नियमावली, १९८१