१६ . रजा १६ . रजा - (१ ) हक्क म्हणून रजा मागता येेणार नाही. नैमित्तिक रजेव्यतिरिक्त रजा मंजूर करणे , ती नाकारणे किंवा रद्द करणे याबाबतचा विवेकाधिकार (एक) (मुख्याध्यापक वगळून अन्य) शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारीवर्गाच्या बाबातीत , शाळा समितीकडू व (दोन) मुख्याध्यापकाच्या बाबतीत , व्यवस्थापकवर्गाकडे राखून ठेवण्यात आला आहे. ( २ ) नैमित्तिक रजेव्यतिरिक्त इतर रजेसाठी , रजावाढीसाठी किंवा मोठ्या सुट्टीनंतर रजेवर जाण्यासाठी करावयाचा अर्ज , सामान्यत: रजा किंवा रजावाढ ज्या तारखेपासून पाहिजे असेल त्या तारखेपूर्वी पुरेसा अधी करावा लागेल. कर्मचार्याच्या आटोक्याबाहेरील परिस्थितीमुळे आगाऊ अर्ज करणे शक्य नसेल अशा अपवादात्मक बाबतीत देखील , अनुपस्थितीच्या तारखेपासून सात दिवसांच्या आत अर्ज न केल्यास , त्याने सेवा सोडली असल्याचे मानण्यात येईल. *( ३ ) ज्या कर्मचार्याला अनुपस्थितीच्या तारखेपासून सात दिवसांच्या आत अर्ज न करण्यामागे पुरेसे कारण नसेल अशा स्थायी कर्मचार्याच्या बाबतीत , ही गोष्ट शिस्तभंग म्हणून समजण्यात येईल ; आणि योग्य चौकशी केल्यावर योग्य त्या शिस्तभंगाच्या कार्यवाहीस तो पात्र ठरेल. जो
Comments
Post a Comment