महाराष्ट्र खाजगी शाळा कर्मचारी (सेवेच्या शर्ती) नियमावली, १९८१- व्याख्या
महाराष्ट्र खाजगी शाळा कर्मचारी ( सेवेच्या शर्ती ) नियमावली , १९८१ दिनांक १६ जुलै १९८१ महाराष्ट्र खाजगी शाळांतील कर्मचारी ( सेवेच्या शर्ती ) विनिमय अधिनियम , १९७७ क्रमांक एसटीआर - १०८१ - २ - एसई - ३ - सेल -" महाराष्ट्र खाजगी शाळातील कर्मचारी ( सेवेच्या शर्ती ) विनियमन अधिनियम , १९७७ " ( १९७८ चा महाराष्ट्र ३ ) याचे कलम १६ , पोट - कलम ( १ ) व ( २ ) या अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा आणि त्यासाठी आपणास समर्थ करणार् या इतर सर्व अधिकारांचा वापर महाराष्ट्र शासन , याद्वारे पुढील नियमावली करीत आहे . नियमावली उक्त कलम १६च्या पोट - कलम ( ३ ) अन्वये आवश्यक असल्याप्रमाणे यापूर्वी प्रसिद्ध करण्यात आली होती . ( दिनांक ३१ डिसेंबर १९८६ पर्यंत सुधारित ) १ . संक्षिप्त नांव - या नियमावलीस " महाराष्ट्र खाजगी शाळांतील कर्मचारी ( सेवेच्या शर्ती ) नियमावली , १९८१ " असे म्हणता यईल . २ . व्याख्या - ( १ ) या नियमावलीत संदर्भानुसार अर्थ अपेक्षित नसेल तर - ( अ ) " अधिनियम ...


















































Comments
Post a Comment