APPENDIX FOURTEEN FORM OF SERVICE BOOK [Vide Rule 67.5] SS CODE

 

APPENDIX FOURTEEN 

FORM OF SERVICE BOOK 

[Vide Rule 67.5]

 

अशासकीय माध्यमिक शाळांतील कर्मचाऱ्यांची सेवापुस्तके ठेवण्याबाबत.

 

आपणास माहीतच आहे की, शासनाने एप्रिल १९६६ पासून अनुदान घेणाऱ्या माध्यमिक शाळांतील शिक्षक-शिक्षकेतर सेवकांना शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणेच सेवानिवृत्ती वेतन योजना लागू केली आहे. परंतु शासनाच्या असे निदर्शनास आले आहे की,. शिक्षकांच्या सेवेच्या नोंदी शाळांनी बरोबर ठेवल्या नसल्याकारणाने शिक्षक अगर कर्मचारी सेवानिवृत्त बरेच दिवस झाले तरी त्यामुळे त्यांचे सेवानिवृत्ती वेतननिश्चित होण्यास त्यामुळे बराच कालावधी लागतो. हे टाळण्यासाठी माध्यमिक शाळासंहितेतील नमुन्याप्रमाणे प्रत्येक शाळा प्रमुखाने आपल्या शाळेतील शिक्षकांची सेवापुस्तके पूर्णपणे सर्वनोंदी सहतयार करावीत असे आपणास यापूर्वीच या संचालनालयाचे परिपत्रक क्रमांक एस - ६७ (सी) ५८ जन - , दिनांक २३ मार्च १९६८ अन्वव्ये कळविले आहेच. तरी सुद्धा याबाबत तक्रारी येतच आहेत.

 

            2. माध्यमिक शाळा संहितेमधील सेवापुस्तकाबाबतच्या नमुन्यात नोंदी ठेवण्यात काही अडचणी येतात असे निदर्शनास आणल्यामुळे याबाबत शासनाने आता असे ठरविले आहे की, शासकीय सेवकांबाबत ज्या नमुन्यात सेवापुस्तके ठेवले जाते त्याच नमुन्यात अशासकीय माध्यमिक शाळाशिक्षक शिक्षकेतर सेवकांचे सेवापुस्तक दोन प्रतीत ठेवावे. त्यात शिक्षकाच्या सर्व सरकारमान्य शाळांतील सेवेची नोंद घेऊन त्यावर संबंधित शिक्षकांची योग्य त्या रकान्यात स्वाक्षरी घेऊन सेवापुस्तकाची एक प्रत संबंधित शिक्षकाकडे / इतर कर्मचाऱ्यांकडे ठेवावी शाळेतील सेवापुस्तकात वेळोवेळी केल्या जाणाऱ्या नोंदी शिक्षकांपाशी असलेल्या प्रतीतही संबंधितांकडून ते पुस्तक मागवून घेऊन त्यातही त्याप्रमाणे नोंदी शाळेने कराव्यात ते पुस्तक पुन्हा त्या शिक्षकाकडे परत करावे.

. एखाद्या शिक्षकाने अगर कर्मचाऱ्याने शाळा सोडली तरी शाळेने त्यास फक्त विमुक्ती पत्र (डीसचार्जे सर्टिफिकेट) द्यावे. तसेच शिक्षकाच्या सेवापुस्तकाची दुसरी प्रत शाळा सोडताना संबंधित शाळेने सर्व नोंदी पूर्ण करून त्यावर सील करून शिक्षकाच्या ताब्यात द्यावे मूळ सेवापुस्तक शाळेकडे ठेवावे. शाळा सोडणाऱ्या शिक्षकाने अगर कर्मचाऱ्याने दुसऱ्या शाळेत नोकरी धरली तर त्या शाळेने पूर्वीच्या शाळेकडून संबंधित शिक्षकाचे अगर शिक्षकेतर कर्मचाऱ्याचे सेवापुस्तक मागवून घेऊन ते पुढे सुरु करावे. तसेच संबंधित शिक्षकाने हि मूळ सेवापुस्तक नवीन शाळेत पाठविण्यासंबंधी जुन्या शाळेची पत्रव्यवहार करावा तोपर्यंत सेवापुस्तकाची दुसरी प्रत सेवाविमुक्ती पत्राबरोबर नवीन शाळेत हजर करावी. शिक्षकाकडे असलेल्या सेवापुस्तकाच्या दुसऱ्या प्रतीतही नवीन शाळेत वेळोवेळी नोंदी करण्याची व्यवस्था करावी. तसेच जुन्या शाळेकडून मूळ सेवापुस्तक येईपर्यंत शिक्षकाने हजर केलेल्या दुसऱ्या सेवापुस्तकाच्या प्रतिप्रमाणे शिक्षकाचा पगार, रजा इत्यादी बाबत नियमाप्रमाणे निर्णय घ्यावा.

. तरी आपणास विनंती की, शिक्षकांच्या सेवा नोंदीबाबत वरील प्रमाणे कारवाई करावी, तसेच ते करताना जुने पुस्तक ही या पुस्तकाबरोबरच ठेवून ते दुसऱ्या शाळेत पाठवावे शाळेतील सेवेच्या नोंदी पूर्ण योग्य प्रकारे बरोबर नोंदल्या नसल्याने शिक्षकांना / शिक्षकेतर सेवकांना सेवानिवृत्ती-वेतन मिळण्यास विलंब होणार नाही याची काळजी घ्यावी. तसेच संबंधित शिक्षकांना अगर शिक्षकेतर सेवकांना त्याच्यापूर्वीच्या सेवेची संपूर्ण माहिती देण्यास आवश्यक ते दाखलेपूर्वीच्या शाळेकडून मिळण्याविषयी संबंधित शाळांकडे आपल्या मार्फत पत्रव्यवहार करण्यास सांगावे आपणही आपणाकडे अशी विचारणा झाल्यास ताबडतोब आवश्यक तो तपशील संबंधित शाळांना त्वरित कळवावा.

. सदर परिपत्रकाची पोच आपल्या शिक्षणाधिकाऱ्याकडे द्यावी. तसेच सदर परिपत्रक आपल्या शाळेतील सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना योग्य त्या कारवाई साठी दाखवून त्याची स्वाक्षरी घेतल्याचे पण शिक्षणाधिकाऱ्यांना कळवावे.

 

(शिक्षणसंचालक, महाराष्ट्र राज्य, पुणे यांचे परिपत्रक क्रमांक अमाशा / ४१७२ / ३७४६५ क. दिनांक १५ मार्च १९७४)

 

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र खाजगी शाळा कर्मचारी (सेवेच्या शर्ती) नियमावली, १९८१- व्याख्या

Leave Rule 16 - MEPS - 1981

१६. रजा - महाराष्ट्र खाजगी शाळा कर्मचारी (सेवेच्या शर्ती) नियमावली, १९८१