४. मुख्याध्यापकांच्या जबाबदाऱ्या-महाराष्ट्र खाजगी शाळा कर्मचारी (सेवेच्या शर्ती) नियमावली, १९८१

महाराष्ट्र खाजगी शाळा कर्मचारी (सेवेच्या शर्ती) नियमावली, १९८१ 

 मुख्याध्यापकांच्या जबाबदाऱ्या

*४. मुख्याध्यापकांच्या जबाबदाऱ्या :- (१) अधिनियम व नियम यातील तरतुदींचा अधिनतेने, शैक्षणिक प्रमुख म्हणून मुख्याध्यापक हा पुढील गोष्टींसाठी जबाबदार राहील: -

(अ) शाळेचा शैक्षणिक दर्जा वाढविणे;

(ब) नेमून दिलेल्या अध्यापनाचे काम करणे;

(क) राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद राज्यशास्त्र अर्थशास्त्र संस्था आणि इतर राज्य पातळीवरील संस्था यांसारख्या संस्थांकडून आयोजित केले जाणारे दिशानिदेशन पाठ्यक्रम (Orientation Course) चर्चासत्रे, सेवांतर्गत व अन्य प्रशिक्षणविषयक कार्यक्रम यांसारखी शैक्षणिक कार्यक्रमांची आखणी, अंमलबजावणी करण्याच्या कामी करणे;

(ड) विद्यार्थ्यांना प्रवेश देणे व शाळेत शिस्त राखणे;

(इ) सहशालेय व बहि:शालेय कार्यक्रमांचे आयोजन व पर्यवेक्षण करणे आणि शाळेचे अभिलेख ठेवणे;

(फ) नियम, विनियम, माध्यमिक शाळा संहिता व शासनाने किंवा संचालकाने वेळोवेळी शैक्षणिक बाबींसाठी काढलेले इतर आदेश यांच्या तरतुदींचे पालन करणे;

(ग) शासन, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, संचालनालय यांच्याकडून घेतल्या जाणार्‍या परीक्षांसुद्धा सर्व परीक्षा घेणे व त्यांचे पर्यवेषण करणे आणि परीक्षांशी संबंधित असलेले अंतर्गत मूल्यमापनाचे व नेमून देण्यात येईल असे इतर काम करणे;

(ह) सहाय्यक शिक्षक व इतर कर्मचारी यांच्या कामाचे मूल्यमापन करणे व शाळेतील कर्मचार्‍यांची सेवा पुस्तके ठेवणे;

(ई) विभाग किंवा संचालक वेळोवेळी नेमून देईल असे शाळेच्या संघटन व सुधारणाविषयीचे कोणतेही इतर काम.

() व्यवस्थापक वर्गाचे अधीक्षण व नियंत्रण यांच्या अधीनतेने, प्रशासकीय प्रमुख म्हणून मुख्याध्यापक हा पुढील गोष्टींसाठी जबाबदार राहील :-

(अ) हिशेब ठेवणे;

(ब) शाळेचे ग्रंथालय, प्रयोगशाळा, तो ज्या शाळेचा प्रमुख असेल केवळ त्याच शाळेच्या विद्यार्थ्यांकरिता असलेले वसतिगृह यांची व्यवस्था पाहणे;

(क) शाळेच्या प्रशासनासंबंधीचा पत्रव्यवहार;

(ड) नियम, विनियम, माध्यमिक शाळा संहिता व शासनाने किंवा संचालकाने वेळोवेळी काढलेले आदेश आणि शाळेच्या प्रशासनासंबंधी व्यवस्थापकवर्गाने वेळोवेळी दिलेले अनुदेश यांच्या तरतुदीचे पालन;

(इ) विभाग, संचालक किंवा व्यवस्थापक वर्ग वेळोवेळी नेमून देईल असे शाळेच्या प्रशासनविषयीचे कोणतेही इतर काम.

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र खाजगी शाळा कर्मचारी (सेवेच्या शर्ती) नियमावली, १९८१- व्याख्या

Leave Rule 16 - MEPS - 1981

१६. रजा - महाराष्ट्र खाजगी शाळा कर्मचारी (सेवेच्या शर्ती) नियमावली, १९८१