२४. अभिवेदने सादर करणे - महाराष्ट्र खाजगी शाळा कर्मचारी (सेवेच्या शर्ती) नियमावली, १९८१

२४अभिवेदने सादर करणे

 २४. अभिवेदने सादर करणे - () कर्मचाऱ्याकडून त्याची नोकरी किंवा त्याची शाळा या संबंधात व्यवस्थापक वर्गाकडे किंवा विभागाकडे केले जाणारे अभिवेदन हे मुख्याध्यापकाच्या मार्फत पुढे पाठवण्यात येईल. तथापि, तो त्याची तशी इच्छा असल्यास, आपल्या अभिवेनाची एक आगाऊ प्रत प्राधिकाऱ्यांच्या नावे पाठवू शकेल. अभिवेदन मिळाल्याची पोच शाळा-प्रमुखाकडून देण्यात येईल.

() शाळेच्या मुख्याध्यापकाकडून विभागाला केले जाणारे अभिवेदन व्यवस्थपक वर्गाच्या मार्फत पुढे पाठवण्यात येईल.

() मुख्याध्यापक किंवा प्रकरणपरत्वे, व्यवस्थापक वर्ग, कर्मचाऱ्याने त्याच्या नावे केलेल्या अभिवेदनावर, ते त्याच्याकडे पोचल्यापासून पंधरा दिवसांच्या आत, अंतिम निर्णय घेईल. जर अभिवादन विभागाच्या प्राधिकाऱ्यांच्या नवे करण्यात आलेले तर, मुख्याध्यापक किंवा प्रकरणपरत्वे व्यवस्थापक वर्ग, संबंधित कर्मचाऱ्याला त्याबाबत कळवून ते मिळाल्यापासून पंधरा दिवसांच्या आत ज्याच्या नवे ते करण्यात आले असेल त्या विभागाच्या प्राधिकाऱ्याकडे आपल्या अभिप्रायासह पाठवील; अशा प्रकारे ते पाठवण्यात आल्यास, ज्याच्या नवे ते अभिवेदन करण्यात या; आलेले असले तो प्राधिकारी अभिवेदनाच्या आगाऊ प्रतीवर थेट कार्यवाही करील.

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र खाजगी शाळा कर्मचारी (सेवेच्या शर्ती) नियमावली, १९८१- व्याख्या

Leave Rule 16 - MEPS - 1981

१६. रजा - महाराष्ट्र खाजगी शाळा कर्मचारी (सेवेच्या शर्ती) नियमावली, १९८१