२७. कपात करावयाची झाल्यास सेवा समाप्त करण्यासंबंधीची तत्वे - महाराष्ट्र खाजगी शाळा कर्मचारी (सेवेच्या शर्ती) नियमावली, १९८१
२७. कपात करावयाची झाल्यास सेवा समाप्त करण्यासंबंधीची तत्वे
२७. कपात
करावयाची झाल्यास सेवा समाप्त
करण्यासंबंधीची तत्वे
- मागील
नियमान्वये कर्मचाऱ्यांची सेवा
समाप्त करताना, पुढील
तत्वाचेही पालन करण्यात
येईल :-
(अ)
माध्यमिक शाळेच्या टप्प्याला
म्हणजे, इयत्ता आठवी
ते दहावी पर्यंतच्या
वर्गांची संख्या कमी
करावयाची असेल, त्याबाबतीत,
प्रशिक्षित पदवीधरांच्या प्रवर्गातील
कनिष्ठतम शिक्षकांची सेवा
समाप्त करण्यात येईल.
(ब)
पूर्व माध्यमिक शाळेच्या
टप्प्याला म्हणजे, इयत्ता
पाचवी ते सातवी
पर्यंतच्या वर्गांची संख्या
कमी करावयाची असेल
त्याबाबतीत, प्रशिक्षित उपस्नातकाच्या
(Under Graduate) प्रवर्गातील कनिष्ठतम शिक्षकाची
सेवा समाप्त करण्यात
येईल.
(क)
(एक)
सेवेत प्रवेश करताना
काही शिक्षक अप्रशिक्षित
मॅट्रिक / माध्यमिक शाळा
प्रमाणपत्रधारक (एस. एस.
सी.),
किंवा (दोन) मॅट्रिक
/माध्यमिक शाळा प्रमाणपत्रधारक
(एस.
एस.
सी.),
माध्यमिक अध्यापन प्रमाणपत्र
धारक एस. टी.
सी.
किंवा तत्सम प्रमाणपत्रधारक असतील आणि
त्यांनी आपल्या अर्हता
सुधारल्यामुळे - (एक) अनुक्रमे
अप्रशिक्षित पदवीधर किंवा
(दोन)
प्रशिक्षित पदवीधर म्हणून
त्यांचा प्रवर्ग बदलला
असेल आणि नियम
२६ अन्वये त्यांच्या
सेवा समाप्त करणे
आवश्यक असेल अशी
परिस्थिती निर्माण झाली
तर,
त्यांना - (एक) अप्रशिक्षित
मॅट्रिक/माध्यमिक शाळा,
प्रमाणपत्रधारक किंवा (दोन)
प्रशिक्षित मॅट्रिक/माध्यमिक
शाळा प्रमाणपत्रधारक इत्यादीं
सारख्या मूळच्या प्रवर्गात
परत जाण्याचा विकल्प
देण्यात येईल; त्यांनी
असे केल्यानंतर त्या
प्रवर्गातील कनिष्ठतम शिक्षकाची
सेवा समाप्त करण्यात
येईल.
(ड)
व्यवस्थापन एकपेक्षा अधिक
शाळा चालवित असेल
त्या बाबतीत आणि
ते चालवित असलेल्या
शाळांपैकी कोणत्याही एका
शाळेत नियम २६
अन्वये कपात करावयाची
असेल त्या बाबतीत,
अथवा, एकतर मान्यता
काढून घेतल्यामुळे किंवा
व्यवस्थापकवर्गाच्या निर्णयामुळे
त्या व्यवस्थापनाच्या शाळांपैकी
कोणतीही एक शाळा
बंद करणे आवश्यक
असेल त्या बाबतीत,
कर्मचारीवर्गात कपात करताना,
वरील तत्वांबरोबर व्यवस्थापन
चालवित असलेल्या सर्व
शाळांमधील कर्मचाऱ्यांच्या ज्येष्ठतेचा
विचार सामाईकपणे करण्याच्या
तत्वाचेही पालन करण्यात
येईल.
(इ)
कर्मचारी वर्गात कोणतीही
कपात करावयाची असेल
तेव्हा, अगोदर सेवेत
असलेल्या मागासवर्गीय व्यक्ती
ज्येष्ठतेनुसार कपातीस पात्र
असल्यास तरीही शाळेतील,
त्यांची संख्या, नियम
९ च्या पोट-नियम
(७)
मध्ये विहित केलेल्या
राखीव जागांच्या टक्केवारीपेक्षा अधिक नसेल
तर,
त्यांना, सेवेतून कमी
करण्यात येणार नाही.
त्यांच्याऐवजी कर्मची वर्गापैकी
तेवढयाच मागासवर्गेतर इतर
व्यक्तींना सेवेतून कमी
करण्यात येईल. तथापि,
कपात करताना व
अस्थायी कर्मचारी,यांच्यापैकी
अस्थायी कर्मचारी मागास
वर्गाचा असला तरी
वस्तुस्थिती विचारात न
घेता त्याला कमी
करण्यात येईल. हि
शर्त पाळण्यात येईल.
Comments
Post a Comment