४. मुख्याध्यापकांच्या जबाबदाऱ्या - महाराष्ट्र खाजगी शाळा कर्मचारी (सेवेच्या शर्ती) नियमावली, १९८
४. मुख्याध्यापकांच्या जबाबदाऱ्या
*४. मुख्याध्यापकांच्या जबाबदाऱ्या :- (१) अधिनियम व नियम यातील तरतुदींचा
अधिनतेने, शैक्षणिक प्रमुख म्हणून मुख्याध्यापक हा
पुढील गोष्टींसाठी जबाबदार राहील: -
(अ) शाळेचा शैक्षणिक दर्जा वाढविणे;
(ब) नेमून दिलेल्या अध्यापनाचे काम करणे;
(क) राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व
प्रशिक्षण परिषद राज्यशास्त्र अर्थशास्त्र संस्था आणि इतर राज्य पातळीवरील संस्था
यांसारख्या संस्थांकडून आयोजित केले जाणारे दिशानिदेशन पाठ्यक्रम (Orientation Course) चर्चासत्रे,
सेवांतर्गत व अन्य प्रशिक्षणविषयक कार्यक्रम यांसारखी शैक्षणिक कार्यक्रमांची आखणी,
अंमलबजावणी करण्याच्या कामी करणे;
(ड) विद्यार्थ्यांना प्रवेश देणे व शाळेत
शिस्त राखणे;
(इ) सहशालेय व बहि:शालेय कार्यक्रमांचे
आयोजन व पर्यवेक्षण करणे आणि शाळेचे अभिलेख ठेवणे;
(फ) नियम,
विनियम, माध्यमिक शाळा संहिता
व शासनाने किंवा संचालकाने वेळोवेळी शैक्षणिक बाबींसाठी काढलेले इतर आदेश यांच्या
तरतुदींचे पालन करणे;
(ग) शासन,
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, संचालनालय यांच्याकडून घेतल्या जाणार्या परीक्षांसुद्धा सर्व परीक्षा घेणे व
त्यांचे पर्यवेषण करणे आणि परीक्षांशी संबंधित असलेले अंतर्गत मूल्यमापनाचे व
नेमून देण्यात येईल असे इतर काम करणे;
(ह) सहाय्यक शिक्षक व इतर कर्मचारी यांच्या कामाचे मूल्यमापन करणे व शाळेतील
कर्मचार्यांची सेवा पुस्तके ठेवणे;
(
ई) विभाग किंवा संचालक वेळोवेळी नेमून देईल असे शाळेच्या संघटन व
सुधारणाविषयीचे कोणतेही इतर काम.
(२)
व्यवस्थापक वर्गाचे अधीक्षण व नियंत्रण यांच्या अधीनतेने, प्रशासकीय प्रमुख म्हणून मुख्याध्यापक हा पुढील गोष्टींसाठी जबाबदार राहील :-
(अ) हिशेब ठेवणे;
(ब) शाळेचे ग्रंथालय,
प्रयोगशाळा, तो ज्या शाळेचा
प्रमुख असेल केवळ त्याच शाळेच्या विद्यार्थ्यांकरिता असलेले वसतिगृह यांची
व्यवस्था पाहणे;
(क) शाळेच्या प्रशासनासंबंधीचा पत्रव्यवहार;
(ड) नियम,
विनियम, माध्यमिक शाळा संहिता
व शासनाने किंवा संचालकाने वेळोवेळी काढलेले आदेश आणि शाळेच्या प्रशासनासंबंधी
व्यवस्थापकवर्गाने वेळोवेळी दिलेले अनुदेश यांच्या तरतुदीचे पालन;
(इ) विभाग,
संचालक किंवा व्यवस्थापक वर्ग वेळोवेळी नेमून देईल असे
शाळेच्या प्रशासनविषयीचे कोणतेही इतर काम.
*अधिसूचना क्रमांक खाशान्या १०८३/१९४/माशि ३ कक्ष, दिनांक २० डिसेंबर १९८४ अन्वये सुधारल्याप्रमाणे
Comments
Post a Comment