१७. वयोनिवृत्ती व पुनर्सेवायोजना - महाराष्ट्र खाजगी शाळा कर्मचारी (सेवेच्या शर्ती) नियमावली, १९८१
१७. वयोनिवृत्ती व पुनर्सेवायोजना
१७.
वयोनिवृत्ती व पुनर्सेवायोजना - (१)
चतुर्थ श्रेणी कर्मचार्यांव्यतिरिक्त अन्य कोणताही
कर्मचारी,
त्याच्या वयाची ५८ वर्षे ज्या तारखेस पूर्ण होतील त्या
तारखेस सेवेतून निवृत्त होईल आणि कोणत्याही परिस्थितीत त्याला त्या वयानंतर सेवेत
मुदतवाढ दिली जाणार नाही. कनिष्ठ श्रेणीतील कर्मचार्याचे वयोनिवृत्तीचे वय ६०
वर्षे असेल;
परंतु राज्यातील विदर्भ प्रदेशातील मान्यताप्राप्त खाजगी
माध्यमिक शाळेचा जो शिक्षक किंवा मुख्याध्यापक दिनांक ३१ डिसेंबर १९६५ रोजी सेवेत
कायम असेल तो दिनांक ३१ डिसेंबर १९६५ नंतर त्याच शाळेच्या सेवेत राहिला किंवा
दुसर्या एखाद्या शाळेत गेला तरीही, त्याच्या वयाची
६० वर्षे पूर्ण झाल्यावर सेवानिवृत्त होईल.
टीप - जर एखाद्या कर्मचार्याची वयोनिवृत्तीची तारीख महिन्याच्या
मध्यावर येत असेल तर,
ज्या महिन्यात त्याच्या वयोनिवृत्तीची तारीख येते त्या
महिन्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत त्याला सेवेत राहू देण्यात येईल.
* (२)
दोन शैक्षणिक सत्रापैकी कोणत्याही एका सत्रामध्ये ज्या
शिक्षकांचे किंवा मुख्याध्यापकाचे वयोनिवृत्त होण्याचे वय पूर्ण होईल आणि त्याचे
वयोनिवृत्तीचे वय पूर्ण झाल्यावरही त्याची पुननियुक्ती करायची व्यवस्थापकवर्गाची
इच्छा असेल तर फक्त विशिष्ट सत्राच्या अखेरीपर्यंत त्याची अशी पूनर्नियुक्ती होऊ
शकेल,
मात्र सेवेत राहू देण्यास तो शारीरिकदृष्ट्या व
मानसिकदृष्ट्या योग्य असला पाहिजे.
(३)
पोट-नियम (२) मध्ये
विनिर्दिष्ट केलेल्या पद्धतीने एखाद्या व्यक्तीची पुनर्नियुक्ती झाल्यानंतर त्याचे
वेतन हे त्याच्या सेवानिवृत्तीच्या वेळी त्याला (विशेष वेतन किंवा अतिरिक्त वेतन
काही असल्यास त्यासह) मिळालेले अंतिम वेतन वजा (मृत्यू-नि-सेवानिवृत्ती
उपदानाचे निवृत्तीवेतन सममूल्य किंवा निवृत्ती वेतनाच्या ऐवजीचे उपदान यासहित)
निवृत्ती वेतन एवढ्या रकमेपेक्षा अधिक असणार नाही. तथापि असे वेतन अधिक (मृत्यू-नि-सेवानिवृत्ती
उपदानाचे निवृत्तीवेतन सममूल्य किंवा निवृत्तीवेतन ऐवजी उपदान यासहित)
निवृत्तीवेतन,
हे त्याची ज्या समय श्रेणीतील पदावर पुनर्नियुक्ती झाली
असेल त्या समयश्रेणीतील कमाल वेतन मर्यादेहून अधिक असणार नाही. वर नमूद
केल्याप्रमाणे एकदा वेतन निश्चित झाल्यावर (मृत्यू-नि-सेवानिवृत्ती उपदानाचे
निवृत्तीवेतन सममूल्य किंवा निवृत्तीवेतन ऐवजी उपदान यासहित) निवृत्ती वेतनाची
रक्कम अधिक अशा रितीने निश्चित केलेले वेतन मिळून होणारी एकूण रक्कम, सेवानिवृत्तीच्या वेळी त्याला मिळालेल्या अंतिम वेतनाहून अधिक होत असली तरीही, त्या पदधारकाला वार्षिक वेतनवाढीचा लाभ घेण्याचा हक्क असेल, परंतु पुनर्नियुक्तीनंतर निश्चित कलेले वेतन अधिक
(मृत्यू-नि-सेवानिवृत्ती उपदानाचे निवृत्तीवेतन सममूल्य किंवा निवृत्तीवेतन ऐवजीचे
उपदान यांसहित) निवृत्तीवेतन ही एकूण रक्कम, त्याच्या ज्या
समयश्रेणीतील पदावर पुनर्नियुक्ती झाली असेल त्यातील कमाल वेतन मर्यादेहून अधिक
होणार नाही.
(४)
निवृत्तीवेतन हे स्वतंत्र्य रक्कम म्हणून मिळेल आणि
कोणत्याही बाबतीत ते स्थगित ठेवले जाणार नाही.
(५)
अंशदायी भविष्यनिर्वाह निधी योजनेच्या कक्षेत येणार्या
कर्मचार्याचे पुननियुक्ती नंतरचे वेतन हे, त्याने
सेवानिवृत्तीच्या वेळी घेतलेले (विशेष वेतन किंवा अतिरिक्त वेतन यांसहित) अंतिम
वेतन वजा व्यवस्थापनाचे व शासनाचे अंशदायी भविष्यनिर्वाह निधीतील अंशदान व
त्यावरील व्याज याचे निवृत्तीवेतन सममूल्य याहून अधिक असणार नाही. तथापि, अशा रितीने निश्चित केलेले वेतन हे त्याची ज्या समयश्रेणीतील पुनर्नियुक्ती
झाली असेल त्यातील कमाल वेतन मर्यादेहून अधिक असणार नाही. परंतु, वेतन अधिक व्यवस्थापनाचे व शासनाचे अंशदान व त्यावरील व्याज याचे निवृत्तीवेतन
सममूल्य ही रक्कम,
त्याची ज्या सयम श्रेणीत पुनर्नियुक्ती झाली असेल त्यातील
कमाल वेतन मर्यादेहून अधिक होणार नाही अशा तर्हेने पदधारकाला वेतनवाढीचा लाभ
मिळेल.
(६)
जो कर्मचारी सेवानिवृत्तीच्या लाभांना किवा अंशदायी
भविष्यनिर्वाह निधीच्या लाभांनाही पात्र नसेल त्याची पोट-नियम (२) अन्वये,
त्याला जी वेतनश्रेणी मिळण्याचा हक्क असेल त्या
वेतनश्रेणीतील प्रारंभिक वेतनावर किंवा त्याहून अधिक परंतु, सेवानिवृत्तीच्या वेळी घेतलेल्या (विशेष वेतन किंवा अतिरिक्त वेतन काही
असल्यास त्यांसहित) वेतनाहून अधिक होणार नाही. एवढ्या प्रारंभिक वेतनावर, शिक्षण अधिकार्यांच्या किंवा अध्यापक विद्यालयाच्या बाबतीत, उपसंचालकांच्या पूर्व मान्यतेने अशी पुनर्नियुक्ती करता येईल.
*अधिसूचना क्रमांक खाशान्या १०८३/१९४/माशि ३ कक्ष, दिनांक २० डिसेंबर १९८४ अन्वये सुधारल्याप्रमाणे
Comments
Post a Comment