८. मुख्याध्यापक अनुज्ञेय होणारी वेतनश्रेणी आणि उप-मुख्याध्यापक, पर्यवेक्षक, मुद्रक, इत्यादी पदांची अनुज्ञेयता निश्चित करणे. - महाराष्ट्र खाजगी शाळा कर्मचारी (सेवेच्या शर्ती) नियमावली, १९८१
८. मुख्याध्यापक अनुज्ञेय होणारी वेतनश्रेणी आणि उप-मुख्याध्यापक, पर्यवेक्षक, मुद्रक, इत्यादी पदांची अनुज्ञेयता निश्चित करणे.
८.
मुख्याध्यापक अनुज्ञेय होणारी वेतनश्रेणी आणि
उप-मुख्याध्यापक,
पर्यवेक्षक, मुद्रक,
इत्यादी पदांची अनुज्ञेयता निश्चित करणे. - (१)
(अ) कोणत्याही शाळेतील मुख्याध्यापकाच्या पदास लागू होणार्या
वेतनश्रेणी;
आणि (ब) उप-मुख्याध्यापकांचे पद आणि पर्यवेक्षक आणि इतर
शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांची पदसंख्या यांची अनुज्ञेयता ही वर्षातील १ ऑगस्ट
या तारखेला हजेरीपटावरील विद्यार्थ्यांची संख्या अथवा, प्रकारणपरत्त्वे शाळेतील वर्गाची संख्या जेवढी असेल त्या आधारे निश्चित
करण्यात येईल.
(२)
शिक्षक व शिक्षकेतर पदांवर नेमणुका करण्यात आल्यानंतर
आशाप्रकारे नेमुणका करण्यात आलेल्या व्यक्तींची नावे आणि त्यांच्या अर्हता व अनुभव
यासंबंधीची तपशील आशा प्रत्येक नेमणुकीच्या तारखेपासून पंधरा दिवसांच्या आत शिक्षण
अधिकार्यांकडे आणि कनिष्ठ अध्यापक विद्यालयांच्या बाबतीत उप-संचालकाकडे
पाठविण्यात येईल.
Comments
Post a Comment