२५. उच्च किंवा अधिक अर्हता प्राप्त करणे - महाराष्ट्र खाजगी शाळा कर्मचारी (सेवेच्या शर्ती) नियमावली, १९८१
२५. उच्च किंवा अधिक अर्हता प्राप्त करणे
२५. उच्च
किंवा अधिक
अर्हता प्राप्त करणे - (१)
ज्यासाठी नियमित उपस्थिती
आवश्यक आहे. अशा
पाठ्यक्रमाकासाठी दाखल
होऊन उच्च किंवा
अर्हता प्राप्त करण्यासाठी
एखाद्या कर्मचाऱ्याची इच्छा
असल्यास त्याबाबतीत मुख्याध्यापकाव्यतिरिक्त अन्य कर्मचाऱ्याला
मुख्याध्यापकाची पूर्वपरवानगी
मिळवावी लागेल आणि
मुख्याध्यापकाला व्यवस्थापक
वर्गाची पूर्वपरवानगी मिळवावी
लागेल. इतर बाबतीत,
कर्मचाऱ्याने त्याबाबतीत मुख्याध्यापकाला किंवा व्यवस्थापक
वर्गाला कळवले पाहिजे.
शाळेच्या नित्याच्या कामाचे
नुकसान होत नसेल
तर,
मुख्याधापक किंवा व्यवस्थापक
वर्ग अशी परवानगी
देऊ शकेल. अशा
प्रकारे परवानगी देण्यात
आलेला कर्मचारी, अशी
अर्हता प्राप्त करण्यासाठी
परीक्षेची तयारी करण्याकरिता
कोणत्याही प्रकारची रजा
हक्क म्हणून मागू
शकणार नाही. तथापि,
तो परीक्षेला बसण्याकरिता
तसेच त्या प्रयोजनासाठी
कोणताही प्रवास करावयाचा
झाल्यास त्यासाठी आवश्यक
असलेल्या कालावधीसाठी त्याला
देय व अनुज्ञेय
असलेली रजा मिळण्यासाठी
पात्र असेल.
(२) अनुसूची "ब" मध्ये विहित केलेल्या अर्हता शिथिल करून नियुक्ती केलेल्या शिक्षकाच्या ज्या पूर्वावश्यकता आहेत अशा बी. एड. किंवा डी. एड. यासारख्या व्यावसायिक पाठयक्रमांच्या बाबतीत, तसेच विभागाने आयोजित केलेल्या कोणत्याही तत्सम पाठयक्रमांच्या, जर कर्मचाऱ्याने मुख्याध्यापकाला किंवा व्यवस्थापक वर्गाला आपली अशा पाठयक्रमास दाखल होण्याची इच्छा आहे असे अर्ज केल्यानंतर ताबडतोब कळवले तर, पोट-नियम (१) चे उपबंध लागू होणार नाहीत.
Comments
Post a Comment