७. वेतनश्रेणी व भत्ते - महाराष्ट्र खाजगी शाळा कर्मचारी (सेवेच्या शर्ती) नियमावली, १९८१

वेतनश्रेणी व भत्ते  

. वेतनश्रेणी व भत्ते - (एक) प्राथमिक शाळा, माध्यमिक शाळा आणि रात्रशाळासुद्धा, कनिष्ठ महाविद्यालये व कनिष्ठ अध्यापक विद्यालये यातील पूर्णकालिक व त्याचप्रमाणे अंशकालिक मुख्याध्यपक उप-मुख्याध्यापक, पर्यवेक्षक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या वेतन श्रेणी अनुसूची “क” मध्ये विनिर्दिष्ट केल्याप्रमाणे असतील; (दोन) शाळेच्या पूर्णकालिक कर्मचार्‍यांना त्यांच्या कामाच्या ठिकाणी वेळोवेळी अनुज्ञेय होणारे महागाई भत्ता, स्थानिक पूरक भत्ता व घरभाडे भत्ता यांसारखे भत्ते हे शासनाने खास खाजगी शाळाच्या कर्मचार्‍यांसाठी मंजूर केलेल्या दरांनी व अशा नियमानुसार प्रदेय असतील; (तीन) रात्रशाळासुद्धा शाळांतील अंशकालिक शिक्षकांना व शिक्षकेत्तर कर्मचार्‍यांना अनुज्ञेय असलेले महागाई भत्त्याचे दर हे, सर्वसाधारण किंवा विशेष आदेशाद्वारे शासन वेळोवेळी ठरवून देईल त्याप्रमाणे असतील.

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र खाजगी शाळा कर्मचारी (सेवेच्या शर्ती) नियमावली, १९८१- व्याख्या

Leave Rule 16 - MEPS - 1981

१६. रजा - महाराष्ट्र खाजगी शाळा कर्मचारी (सेवेच्या शर्ती) नियमावली, १९८१