२१. कार्यभार - महाराष्ट्र खाजगी शाळा कर्मचारी (सेवेच्या शर्ती) नियमावली, १९८१
२१. कार्यभार
२१. कार्यभार - (१) पूर्णकालिक शिक्षकाला शाळेच्या कामच्या तासामध्ये, शाळेच्या गरजेनुसार, रोजची विश्रांतीची वेळ वगळता, आठवड्यातून ३० तासांपर्यंत शाळेच्या आवारात हजर रहावे लागेल.
(२)
पटावर सरासरी ३० किंवा त्यापेक्षा कमी विद्यार्थी असलेल्या
वर्गामध्ये जो शिकवित असेल अशा माध्यमिक शाळेतील अथवा कनिष्ठ महाविद्यालयातील अथवा
अध्यापक विद्यालयातील पूर्णालिक शिक्षकाला दर आठवड्याला १९ तास प्रत्यक्ष
शिकविण्याचे काम कारवे लागेल. पटावर ३१ पासून ५० पर्यंत विद्यार्थी असलेल्या
वर्गांना जो शिकवीत असेल अशा शिक्षकाला दर आठवड्याला १८ तास प्रत्यक्ष शिकविण्याचे
काम करावे लागेल. पटावर ५० पेक्षा अधिक विद्यार्थी असलेल्या वर्गांना जो शिकवीत
असेल अशा शिक्षकाला दर आठवड्याला १७ तास प्रत्यक्ष शिकवण्याचे काम कारवे लागेल.
टीप - (१)
वेळापत्रकात तरतुद करण्यात आलेले सर्व काम या पोट-नियमात
विनिर्दिष्ट करण्यात आलेल्या तेवढ्या तासांमध्ये विभागले जाईल.
टीप - (२)
माध्यमिक शाळेच्या किंवा कनिष्ठ महाविद्यलयाच्या किंवा
अध्यापक विद्यालयाच्या शिक्षकाला वर्गाच्या पटानुसार वेळापत्रकामधील १७ ते १९
तासांचा शिकवण्याचा पूर्ण कार्यभार देण्यात येईल. परंतु खर्याखुर्या कारणास्तव
पूर्ण कार्यभार देता येणार नसेल त्याबाबतीत त्यामुळे अशा शिक्षकांच्या वेतनावर
विपरीत परिणाम होणार नाही.
टीप - (३)
दुबार पद्धतीच्या शाळांच्या बाबतीत वरील पोट-नियम (२) मध्ये विनिर्दिष्ट करण्यात आलेल्या पूर्ण कार्यभार शक्य होईल तोवर एकाच पाळीत
एका कर्मचार्याकडे नेमून देण्यात येईल.
टीप - (४)
रात्रशाळा शिक्षकांच्या बाबतीत, पूर्णवेळ शिक्षकांकरिता विनिर्दिष्ट करण्यात आलेल्या कार्यभाराचा अर्धा
कार्यभार त्यांच्याकडे असेल.
(३)
२० पेक्षा अधिक वर्ग असणार्या शाळांमधील मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक व पर्यवेक्षक यांना दर आठवड्याला निदान अनुक्रमे ४, ८ व १० तास एवढे शिकवण्याचे काम करावे लागेल. २० किंवा त्यापेक्षा कमी वर्ग
असणार्या शाळांमधील मुख्याध्यापक व पर्यवेषक यांना दर आठवड्याला निदान अनुक्रामे ६
व १२ तास एवढे शिकवण्याचे काम करावे लागेल.
(४)
शाळेच्या शिक्षकेतर कर्मचारीवर्गाचे कामाचे व
उपस्थितीचे तास ते
त्यांच्यापैकी लिपिकवर्गीय कर्मचारीवर्ग,
ग्रंथपाल व प्रयोगशाळा
सहाय्यक इत्यादिंच्या बाबतीत
प्रत्येक आठवड्याला साडे
आडतीस तास (भोजन
सुटी धरून) आणि
चपराशी, हमाल इत्यादीसारख्या निम्न श्रेणी कर्मचारीवर्गाच्या बाबतीत
प्रत्येक आठवड्याला ५०
तास
(भोजन सुटी धरून)
असतील.
टीप - रात्र
शाळेतील शिक्षकेतर कर्मचारीवर्गांच्या प्रत्येक प्रवर्गाचे
कामाचे तास व
उपस्थिती दिवस शाळेतील,
संबंधित प्रवर्गातील शिक्षकेतर
कर्मचारीवर्गासाठी विननिर्दिष्टकेलेल्या तासांच्या निम्मे
असतील.
Comments
Post a Comment