२६. पदे रद्द झाल्यामुळे होणारी कपात - महाराष्ट्र खाजगी शाळा कर्मचारी (सेवेच्या शर्ती) नियमावली, १९८१
२६. पदे रद्द झाल्यामुळे होणारी कपात
२६. पदे
रद्द झाल्यामुळे होणारी कपात
- (१)
स्थायी कर्मचाऱ्यांची सेवा,
पुढील कारणांवरून, ३
महिन्यांची नोटीस देऊन
किंवा नोटीशीऐवजी ३
महिन्यांची पगार (भत्त्यासह)
देऊन, व्यवस्थापक वर्गाला
समाप्त करता येईल
:-
(एक) वर्ग
किंवा तुकड्या यांची
संख्या कमी झाल्यामुळे
होणारी आस्थापनेतील कपात.
(दोन) विद्यार्थ्यांच्या संख्येतील घट
व परिणामी आस्थापनेत
झालेली कपात.
(तीन) विवक्षित
प्रवर्गातील शिक्षकांच्या संख्येवर
परिणाम होईल अशा
प्रकारे झालेला अभ्यासक्रमातील बदल.
(चार) एखाया
अभ्यासविषयक पाठयक्रम किंवा
एखादी शाळाच बंद
होणे.
(पाच) तत्सम
स्वरूपाचे अन्य कोणतेही
वास्तव्य कारण.
(२)
उपरोक्त पोट-नियम
(१)
अन्वये केली जाणारी
सेवासमाप्ती हि पुढील
शर्तीच्या अधीन असेल
:-
(एक)
सर्वसाधारणपणे जेष्ठतेच्या तत्त्वाचे
पालन केले पाहिजे.
(दोन)
कनिष्ठ व्यक्तीला कामावरून
कमी करावयास हवे
होते असे असताना
ज्येष्ठतेचे तत्त्व डावलून,
कर्मचारीवर्गातील वरिष्ठ
व्यक्तीला कमी करण्याचे
प्रस्तावित केले असेल
अशा प्रकरणातसुद्धा कर्मचारीवर्ग
कपातीच्या प्रत्येक बाबतीत,
व्यवस्थापक वर्गाचे शिक्षण
अधिकाऱ्याची किंवा अध्यापक
विद्यालयांच्या बाबतीत उपसंचालकाची
पूर्वमान्यता घेतली पाहिजे.
(तीन)
ज्यांच्या सेवा समाप्त
करण्याचे प्रस्तावित केले
असेल अशा कर्मचाऱ्यांना
शिक्षण अधिकाऱ्यांकडून किंवा
प्रकरणपरत्वे, उपसंचालकांकडून इतर
शाळांमध्ये सामावून घेतले
पाहिजे. कर्मचाऱ्यांना अशा
रीतीने सामावून घेतले
जाईतोपर्यंत व्यवस्थापक वर्गाला
वर्ग किंवा तुकड्या
बंद करण्याची किंवा
वरील पोट-नियम
(१)
मध्ये नमूद केलेल्या
इतर कोणत्याही कारणामुळे
कर्मचारीवर्गात कपात करण्याची
परवानगी असणार नाही.
(३)
कमी केलीली पदे
पुनरुज्जीवित करण्यात आली
असतील किंवा त्याच
विषयांसाठी जादा पदे
निर्माण करण्यात आलेली
असतील तर, ज्या
कर्मचाऱ्याला कमी करण्यात
आले असेल व
इतर शाळेत सामावून
घेण्यात आले असेल
अशा कर्मचाऱ्याला पोच
देय डाक नोंदणी
पत्राद्वारे त्या शाळेत
पुन्हा कामावर रुजू
होण्याची संधी व्यवस्थापक
वर्ग प्रथम देईल.
या प्रयोजनासाठी कर्मचाऱ्याने
दरवर्षी व्यवस्थापनाला आपला
पत्ता व आपली
उपलब्धता एप्रिल महिन्यापूर्वी,
पोचदेय डाकनोंदपत्राद्वारे कळविली
पाहिजे.
(४)
कमी केलेल्या व
अन्य शाळेत सामावून
घेण्यात आलेल्या व्यक्तीला
तिच्या मुळाच्या शाळेत
प्रत्यावर्तित होणे किंवा
ज्या शाळेत तिला
सामावून घेण्यात आले
असेल त्याच शाळेत
आपली सेवा पुढे
चालू ठेवणे याबाबत
विकल्पाधिकार असेल.
(५)
कर्मचाऱ्याने, त्याला ज्या
शाळेत सामावून घेण्यात
आले असेल त्याच
शाळेत आपली सेवा
पुढे चालू ठेवण्याबाबतचा
विकल्प स्वीकारला तर
किंवा व्यवस्थापक वर्गाने
त्याची शाळेत पुन्हा
नियुक्ती करण्याबाबत किंवा
त्याला परत पूर्वीच्या
शाळेत घेण्याबाबत विचारणा
करण्यासंबंधी त्याला उद्देशून
पाठवलेले पोचदेय डाक
नोंदणी पत्र मिळाल्याच्या
तारखेपासून पंधरा दिवसांच्या
आत कर्मचाऱ्यांकडून लेखी
उत्तर मिळाले नाही
तर किंवा अशी
विचारणा करणारे पत्र
स्वीकारण्यास त्याने नकार
दिला तर व्यवस्थापक
वर्गास इतर कोणत्याही
अर्हताप्राप्त व्यक्तीची किंवा
व्यक्तींची नेमणूक करून
असे पद किंवा
अशी पदे भरण्याची
मोकळीक राहील.
(६)
एखाद्या कर्मचारी मूळ
शाळेत प्रत्यावर्तित होण्याचा
विकल्प स्वीकारील, त्यावेळी,
त्याला त्याचे वेतन,
जेष्ठता इत्यादी बाबतीत
मूळ स्थितीवर पुनः
स्थापित केले जाईल.
Comments
Post a Comment