३५. निलंबनाच्या शर्ती - महाराष्ट्र खाजगी शाळा कर्मचारी (सेवेच्या शर्ती) नियमावली, १९८१

३५निलंबनाच्या शर्ती 

३५. निलंबनाच्या शर्ती - () व्यवस्थापक वर्ग एखाद्या कर्मचाऱ्याला निलंबित करू इच्छित असेल त्याबाबतीत नियम ३३ मध्ये नमूद समुचित प्राधिकाऱ्यांची पूर्वमान्यता घेऊनच त्याला निलंबित करण्यात येईल.

() निलंबनाचा कालावधी, अशा समुचित प्राधिकाऱ्यांची नसेल तर, एरव्ही, चार महिन्यांपेक्षा अधिक असणार नाही.

() कर्मचाऱ्याला पूर्वपरवानगीने निलंबित करण्यात आले असेल त्याबाबतीत, त्याला सहकारी बँकेमार्फत रक्कम देण्याच्या योजनेखाली फक्त चार महिन्यांसाठी निर्वाह भत्ता देण्यात येईल त्यानंतर संबंधित व्यवस्थापनाकडून ती रक्कम दिली जाईल.

() व्यवस्थापकवर्गाने उपरोक्तप्रमाणे समुचित प्राधिकाऱ्यांची पूर्वमान्यता घेतल्याशिवाय कर्मचाऱ्याला निलंबित केले असेल त्याबाबतीत निलंबनाच्या पहिल्या चार महिन्याच्या कालावधीत आणि त्यानंतर चौकशी पूर्ण होईपर्यंतच्या कालावधीतही व्यवस्थापकवर्ग स्वतःच निर्वाह भत्ता देईल.

() नियम ३३ चे पोट-नियम () किंवा () याच्या उपबंधाचा भंग केल्याचे प्रकरण सोडल्यास, एरव्ही निर्वाह भत्ता रोखून ठेवण्यात येणार नाही.

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र खाजगी शाळा कर्मचारी (सेवेच्या शर्ती) नियमावली, १९८१- व्याख्या

अनुसूची “ज” - कर्मचार्‍यांची कर्तव्ये - महाराष्ट्र खाजगी शाळा कर्मचारी (सेवेच्या शर्ती) नियमावली, १९८१

१६. रजा - महाराष्ट्र खाजगी शाळा कर्मचारी (सेवेच्या शर्ती) नियमावली, १९८१