११. सेवा पुस्तक - महाराष्ट्र खाजगी शाळा कर्मचारी (सेवेच्या शर्ती) नियमावली, १९८१
११. सेवा पुस्तक
११. सेवा पुस्तक - (१)
शाळेतील प्रत्येक कर्मचार्यांसाठी, त्यांच्या नेमणुकीच्या तारखेपासून तीन महिन्यांच्या आत, नमुना (इ) अनुसार सेवा पुस्तक व रजा खाते उघडण्यात येऊन सेवा पुस्तक व रजेचा
हिशेब दोन प्रतीत ठेवण्यात येईल; आणि त्यात कर्मचारी
यांच्या सेवेच्या व रजेच्या नोंदी ठेवण्यात येतील. सेवा पुस्तकाची दुसरी प्रत
संबंधित कर्मचार्याला देण्यात येईल व ती वेळोवेळी अद्यावत करण्यात येईल.
(२)
सेवा पुस्तकातील नोंदी विशेषत: जन्म तारीख, वैद्यकीय तपासणी,
शैक्षणिक व व्यवसायिक अर्हता इत्यादींसंबंधिच्या नोंदी शाळा
प्रमुख हा जातीने जन्म नोंदणी प्रामाणपत्र, शाळासोडल्याचा
दाखला माध्यमिक शाळाप्रमाणपत्र, वैद्यकीय तपासणीचे
प्रमाणपत्र पदवी,
पदविका प्रमाणपत्र यांच्या मूळप्रतीवरून पडताळून पाहिल्या
जातील. “नोंदी या मूळ प्रमाणपत्रांस अनुसरून केलेल्या आहेत” अशा अर्थाचा शेरा
संबंधित स्तंभामध्ये लिहिण्यात येईल व पडताळणीनंतर मुख्याध्यापक त्यावर सही करून, तारीख घालील.
Comments
Post a Comment