२३. खाजगी शिकवणी - महाराष्ट्र खाजगी शाळा कर्मचारी (सेवेच्या शर्ती) नियमावली, १९८१

 २३. खाजगी शिकवणी

२३. खाजगी शिकवणी :- (१) पूर्णकालिका शिक्षकवर्ग - (अ) कामाच्या पुढील बाबी वगळता, मुख्याध्यापकाला पारिश्रमिकांसह व खाजगी शिकवण्या किंवा कोणत्याही अंशकालिक काम हाती घेता येणार नाही :-

(एक) (विद्यापीठाच्या संमतीने) स्नातकोत्तर संशोनासाठी मार्गदर्शक म्हणून काम करणे;

(दोन) महाविद्यालयात किंवा विद्यापीठाच्या स्नातकोत्तर विभागात अंशकालिक अधिव्याख्याता म्हणून काम करणे;

(तीन) ज्यामुळे त्याच्या नित्याच्या कामात व्यत्यय येत नाही असे आणि जे व्यवस्थापक वर्गांच्या लेखी पूर्व परवानगीनेच हाती घेण्यात येईल असे किरकोळ स्वरूपाचे अन्य कोणतेही शैक्षणिक कार्य.

(ब) शिक्षकाला दिवसाकाठी दोन तासापेक्षा अधिक वेळ खाजगी शिकवणी करता येणार नाही किंवा दिवसातील शिकवणीच्या संपूर्ण कालावधीत पाचपेक्षा अधिक विद्यार्थ्यांना शिकवता येणार नाही. "पाच विद्यार्थी" या शब्दप्रयोगात विद्यार्थ्यांचे गट असा अर्थ अभिप्रेत नसून, तेच पाच विद्यार्थी असे अभिप्रेत आहे. रात्र शाळांमधून काम करणारे दिवस-शाळांचे शिक्षक, त्यांनी खाजगी शिकवण्या घेतलेल्या नसतील तर, या नियमात नमूद केल्याप्रमाणे दोन तासांऐवजी रात्र-शाळांमध्ये पूर्ण वेळ काम करू शकतील.

(क) माध्यमिक शाळा किंवा कोणतेही अन्य परीक्षा मंडळ यांच्या अंतर्गत किंवा बहि:स्थ परीक्षेसाठी विद्यार्थ्यांची तयारी करून घेण्याकरिता कोणत्याही खास शिक्षक वर्गाशी शिक्षकाला प्रत्यक्षपणे किंवा अप्रत्यक्षपणे संबंध ठेवता येणार नाही. अंतर्गत किंवा बहि:स्थ परीक्षेसाठी एखाद्या शिक्षकडून खाजगी शिकवणी घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या ज्यावेळी पाचपेक्षा अधिक होईल त्यावेळी तो खास शिक्षण वर्ग असल्याचे मानण्यात येईल.

(ड) व्यस्थपाक वर्गाच्या पूर्वसंमतीने पारिश्रमिकासह अभ्यासक्रमविषक व अभ्यासेतर कार्यक्रमाचे वर्ग चालविण्यासाठी शिक्षकाने व्यतीत केलेला कालावधी खाजगी शिकवणीच्या अनुज्ञेय असलेल्या दोन तासांच्या कालमर्यादेतून वजा करण्यात येईल.

(२) अंशकालिका शिक्षवर्ग - (अ) अंशकालिका शिक्षकाने एका किंवा अधिक शाळांमध्ये शिकवण्यासाठी व्यतीत केलेल्या तासांची तसेच त्याने शिकवण्यामध्ये व्यतीत केलेल्या तासांची एकूण संख्या ही, पूर्णवेळ शिक्षकाने शाळेत शिकवण्यासाठी व्यतीत केलेल्या तासांची संख्या अधिक पूर्णवेळ शिक्षकाने खाजगी शिकवणी घेण्यासाठी अनुज्ञेय असलेल्या तासांची संख्या यापेक्षा अधिक असता कामा नये.

 (ब) अंशकालिका शक्षकाने कोणतेही शिकवणीचे काम घेण्यापूर्वी शाळा प्रमुखाला त्याबाबत कळवले पाहिजे.

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र खाजगी शाळा कर्मचारी (सेवेच्या शर्ती) नियमावली, १९८१- व्याख्या

Leave Rule 16 - MEPS - 1981

१६. रजा - महाराष्ट्र खाजगी शाळा कर्मचारी (सेवेच्या शर्ती) नियमावली, १९८१