४३ न्यायधिकरणापुढे विधी व्यवसायीची उपस्थिती - महाराष्ट्र खाजगी शाळा कर्मचारी (सेवेच्या शर्ती) नियमावली, १९८१

४३ न्यायधिकरणापुढे विधी व्यवसायीची उपस्थिती

*४३ न्यायधिकरणापुढे विधी व्यवसायीची उपस्थिती - शाळा न्यायाधिकरणाचे पीठासीन अधिकारी, कोणत्याही पक्षकारांच्यावतीने कोणत्याही कामकाजसंबंधात न्यायाधिकरणापुढे उपस्थित राहण्यासाठी विधी व्यवसायीस, विशेष परवानगी पुढील परिस्थितीत देऊ शकतील, ती अशी :-

() वादातील कोणत्याही एका पक्षकाराच्या आकलनाबाहेरील वादाची गुंतागुंत ;

() कामकाजाच्या मार्गात उपस्थित होणारा विधिविषयक प्रश्न;

परंतु, असे की, जेव्हा जेव्हा अशी परवानगी एका पक्षकाराला दिली जाईल तेव्हा तशीच परवानगी, वादाच्या दुसऱ्या पक्षकारालासुद्धा देण्यात येईल;

शिवाय असे हि, जेथे व्यवस्थापकवर्गाचे प्रतिनिधित्व विधिव्ययसायी असणारी किंवा विधी व्यवसायींची अर्हता असणारी व्यक्ती करील तेथे कर्मचाऱ्याला आपली बाजू विधी व्यवसायीमार्फत मांडण्याची परवानगी दिली जाईल.


 *अधिसूचना क्रमांक खाशान्या १०८३/१९४/माशि ३ कक्ष, दिनांक २० डिसेंबर १९८४ अन्वये सुधारल्याप्रमाणे

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र खाजगी शाळा कर्मचारी (सेवेच्या शर्ती) नियमावली, १९८१- व्याख्या

अनुसूची “ज” - कर्मचार्‍यांची कर्तव्ये - महाराष्ट्र खाजगी शाळा कर्मचारी (सेवेच्या शर्ती) नियमावली, १९८१

१६. रजा - महाराष्ट्र खाजगी शाळा कर्मचारी (सेवेच्या शर्ती) नियमावली, १९८१