२२. कामे व शिस्तविषयक संहिता - महाराष्ट्र खाजगी शाळा कर्मचारी (सेवेच्या शर्ती) नियमावली, १९८१

२२कामे  शिस्तविषयक संहिता -

२२. कामे शिस्तविषयक संहिता - () मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक, पर्यवेक्षक, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारीवर्ग (लिपिक) यांची कामे अनुसूची "" मध्ये विनिर्दिष्ट केल्याप्रमाणे असतील.

() सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना पुढील शिस्तविषक संहितेचे पालन करावे लागेल :-

() कर्मचाऱ्याने राजकीय कारणावरून किंवा वंश, धर्म, जात, भाषा अथवा लिंग-भेद या कारणावरून किंवा स्वैरपणे किंवा व्यक्तिगत स्वरूपाच्या कारणांवरून भेदाभेद करता सर्व विद्यार्थ्यांना समान वागणूक दिली पाहिजे आणि त्यांना इतर विद्यार्थ्यांविरुद्ध किंवा इतर कर्मचायांविरुद्ध किंवा शाळेच्या प्रशासनाविरुद्ध चिथावणी देण्यापासून परावृत्त असले पाहिजे .

() तात्विक विचाराच्या किंवा अभिव्यक्तीच्या स्वातंत्र्याचा वापर करताना शिक्षकांनी शाळेच्या सवलतीचा गैरवापर करता कामा नये.

() कर्मचाऱ्याने संस्थेच्या किंवा व्यवस्थापनाच्या साधन संपत्तीचा किंवा सावलीचा त्याच्या वैयक्तिक वापरासाठी किंवा वाणिज्यिक, किंवा धार्मिक प्रयोजनांसाठी वापर करता कामा नये.

( ) विद्यार्थ्यांचे मूल्यमापन करताना शिक्षकाने नि:पक्षपाती राहावे आणि हेतुतः वाजवीपेक्षा जादा गुण किंवा कमी गुण देऊ नयेत किंवा कोणत्याही विध्यार्थ्यांना सूडबुद्धीने वागवू नये.

() नियम २३ मध्ये अन्यथा तरतूद करण्यात आली असेल ते खेरीज करून एरव्ही शिक्षकाने कोणतेही खाजगी शिकवणीचे वर्ग चालवू नयेत किंवा तेथे नोकरीत राहू नये अथवा धंदेवाईक तत्त्वावर खाजगी शिकवणी घेऊ नये.

() मोठ्या सुटीत किंवा रजेच्या कालावधीत आपल्या पत्त्यात कोणताही बदल झाला असल्यास, असा पत्त्यातील बदल कर्मचाऱ्याने प्रकरणपरत्वे, मुख्याध्यपक, मुख्य कार्यकारी अधिकारी किंवा अध्यक्ष यास कळविला पाहिजे.

() तो ज्या शाळेत पूर्ण वेळ तत्त्वावर नोकरीत असेल त्या शाळेच्या प्राधिकऱ्याकडून लेखी पूर्व परवानगी मिळविल्याशिवाय, पूर्णवेळ शिक्षकांनी वेतनावर किंवा कोणत्याही मोबदल्याकरिता दुसऱ्या शैक्षणिक, सांस्कृतिक किंवा साहित्यिक संस्थेत अंशकालिक नोकरी स्वीकारू नये. तथापि, असे काम खाजगी शिकवण्या धरून दिवसाला दोन तास इतकेच मर्यादित असेल. रात्रीच्या शाळेत काम करण्यास इच्छुक असलेल्या शिक्षकेत्तर पूर्णकालिका कर्मचाऱ्याच्या बाबतीत, त्याला रात्रीच्या शाळेच्या कामकाजाचा संपूर्ण वेळ कसं करण्याची परवानगी देण्यात येईल.

() पुरुष महिला कर्मचारी आणि विद्यार्थी यांच्याबरोबरचे कर्मचाऱ्याचे वर्तन विनयशील असले पाहिजे.

(आय) कर्मचाऱ्याने -

(एक) तो त्यात्यावेळी ज्या क्षेत्रात असेल त्या क्षेत्रात अंमलात असलेल्या, मादक पेये औषधद्रव्ये यांच्या संबंधातील कोणताही कायद्याचे काटेकोरपणे पालन केले पाहिजे;

(दोन) कामावर हजर असताना कोणतेही मादक पेय किंवा औषधीद्रव्ये सेवन करता कामा नये किंवा मादक पेये किंवा औषधीद्रव्ये यांच्या अंमलाखाली असता कामा नये; आणि अशा प्रकारचे पेय किंवा औषधीद्रव्ये यांच्या अंमलामुळे कोणत्याही प्रकारे आपल्या कर्तव्य पालनावर परिणाम होणार नाही. याची योग्य ती काळजी घेतली पाहिजे;

(तीन) कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी कोणत्याही मादक पेयाचा किंवा औषधीद्रव्याचा वापर करण्यापासून अलिप्त राहिले पाहिजे;

(चार) मद्य घेतलेल्या अवस्थेत कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी वावरता कामा नये;

(पाच) आपल्या वर्तनावर ताबा ठेवणे शक्य होणार नाही अशा प्रकारे मादक पेय किंवा औषधीद्रव्य यांचा अतिरिक्त वापर करता कामा नये.

स्पष्टीकरण - या नियमांच्या प्रयोजनासाठी "सार्वजनिक जागा" म्हणजे जेथे जनतेला पैसे भरून किंवा अन्यथा प्रवेश देण्यात आलेला असतो किंवा दिला जातो अशी कोणतीही जागा किंवा परिसर (वाहनासह).

() पोट-नियम () मध्ये नमूद केलेल्या आचारसंहितेच्या कोणत्याही नियमाचे अनुपालन करण्यात कसूर केल्यास, ती बाब निष्काळजीपणची किंवा या दोन्ही प्रकारची असल्याचे मानण्यात येईल.

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र खाजगी शाळा कर्मचारी (सेवेच्या शर्ती) नियमावली, १९८१- व्याख्या

Leave Rule 16 - MEPS - 1981

१६. रजा - महाराष्ट्र खाजगी शाळा कर्मचारी (सेवेच्या शर्ती) नियमावली, १९८१