९. कर्मचार्यांची नेमणूक - महाराष्ट्र खाजगी शाळा कर्मचारी (सेवेच्या शर्ती) नियमावली, १९८१
९. कर्मचार्यांची नेमणूक
९.
कर्मचार्यांची नेमणूक - (१)
शाळेतील वर्गांची संख्या तसेच तरुद केलेले पर्यायी अभ्यास
क्रम आणि त्यात शिकवले जाणारे वैकल्पिक विषय यासहित अभ्यासक्रम या गोष्टी विचारात
घेता शाळेत पुरेशा प्रमाणात शिक्षकवर्ग असला पाहिजे.
(२)
(मुख्याध्यापक व उप-मुख्याध्यापक वगळता) शाळेतील शिक्षक व
शिक्षकेतर कर्मचारीवर्गाच्या नेमणुका शाळा समितीकडून करण्यात येतील:
परंतु,
शाळा समितीने प्राधिकृत केले असेल तर, ज्यांची मुदत तीन महिन्यांपेक्षा अधिक नाही अशा अल्पकालीन मुदतीच्या रजा रिक्त
पदांवरील नेमणुका मुख्याध्यापकास करता येतील.
(३)
शिक्षकवर्गीय किंवा शिक्षकेतर पदासाठी शाळेत करावयाच्या
प्रत्येक नेमणुकीबाबत या नियमात अन्यथा तरतुद करण्यात आली नसेल तर, एरव्ही नेमणुकीसाठी पात्र असणार्या अशा पदासाठी अर्ज करू इच्छिणार्या
उमेदवारांनी आपले नांव,
पत्ता, जन्म तारीख, शैक्षणिक व व्यवसायिक पात्रता, अनुभव, इत्यादी संबंधातील सविस्तर तपशील देऊन लेखी अर्ज करावा; आणि त्यासोबत मूळप्रमाणापत्राच्या सत्य प्रती जोडण्यात याव्यात. पोट-नियम (७) अन्वये ज्यांच्यासाठी पदे राखून ठेवण्यात आली असतील अशा मागास जमातीच्या
निरनिराळ्या गटातील उमेदवाराशिवाय इतर उमेदवारांनी त्यांच्या अर्जात त्यांच्या
जाती नमूद करण्याची आवश्यकता असणार नाही.
(४)
शाळेतील कोणत्याही पदावरील नेमणुकीसाठी वयोपर्यादा
पुढीलप्रमाणे असेल :-
(अ) प्राथमिक शाळेतील कोणत्याही पदावर नेमणूक करण्यासाठी उमेदवाराचे वय १८
वर्षांपेक्षा कमी व *२८ वर्षांपेक्षा अधिक नसावे; आणि मागास वर्गातील उमेदवारांच्या बाबतीत त्यांचे वय *३३ वर्षांपेक्षा अधिक
नसावे:
परंतु महिला,
माजी सैनिक आणि पूर्वनुभव असलेल्या व्यक्तीच्या बाबतीत कमाल
वयोमर्यादा उप-संचालकाच्या पूर्वपरवानगीने शिथिल करता येईल.
(ब) प्राथमिक शाळेशिवाय इतर कोणत्याही शाळेत कोणत्याही पदावर नेमणूक करताना
उमेदवाराचे वय १८ वर्षापेक्षा कमी नसावे.
(५)
एखाद्या पदावर नेमण्यात आलेल्या उमेदवाराला अनुसूची “ड” मधल
नमुन्यात नियुक्ती आदेशाचे पत्र पाठवण्यात येईल. नेमण्यात आलेल्या उमेदवाराला
नियुक्ती अदोश मिळाल्याबद्दल त्यांच्याकडून पोच घेण्यात यावी.
(६)
प्रत्येक कर्मचार्याला, त्यांच्या
नेमणुकीपासून तीन महिन्यांच्या आत व्यवस्थापकवर्गाने कोणताही वैद्यक व्यवसायी
नामानिर्दिष्ट केला असेल तर अशा नोंदी व वैद्यक व्यवसायीकडून किंवा अन्यथा
कोणत्याही नोंदी व वैद्यक व्यवसायीकडून स्वत:ची वैद्यकीय तपासणी करवून घ्यावी
लागेल. या वैद्यकीय तपासणीचा खर्च व्यवस्थापकवर्गाला सोसावा लागेल. तो कर्मचारी
कोणत्याही सांक्रमिक रोगापासून मुक्त असून अशा नेमणुकीस शारीरिकदृष्ट्या पात्र आहे
असे प्रमाणपत्र मिळेपर्यंत ही नेमणूक सर्शत असेल.
(७)
व्यवस्थापकवर्ग हा शिक्षकवर्गीय, तसेच शिक्षकेतर कर्मचारीवर्गातील एकूण पदापैकी ३४ टक्के पदे अनुसुचित जाती, धर्मांतर करून बौद्ध झालेल्या अनुसूचित जातीय व्यक्ती, अनुसूचित जनजाती,
विमुक्त जनजाती, भटक्या जमाती व
इतर मागासवर्ग यातील व्यक्तीसाठी पुढीलप्रमाणे राखून ठेवली ते प्रमाणे असे:-
|
(अ) अनुसुचित जातीय व धर्मातर करून बौद्ध झालेल्या
अनुसूचित जातीय व्यक्ती |
१३ टक्के |
|
(ब) अनुसुचित जनजाती (विनिर्दिष्ट क्षेत्राबाहेर राहणार्यांसुद्धा) |
७ टक्के |
|
(क) विमुक्त जनजाती व भटक्या जनजाती |
४ टक्के |
|
(ड) इतर मागासवर्ग |
१० टक्के |
*(८)
पोट-नियम (७) अन्वये राखीव
म्हणून ठेवण्यात आलेल्या रिक्त जागा भरण्याच्या प्रयोजनासाठी व्यवस्थापक वर्ग त्या
प्रदेशात भरपूर खप असलेल्या निदान एखाद्या तरी वर्तमानपत्रात त्या रिकाम्या
जागांबाबत जाहिरात देईल. तसेच, या रिकाम्या जागांबाबत
जिल्ह्याचे सेवायोजन कार्यालय, जिल्हा समाजकल्याण
अधिकारी व मागासवर्गीय व्यक्तींच्या या नियमाच्या प्रयोजनार्थ शासनाने मान्यता
दिलेल्या कोणत्याही संघटना यांना त्या रिकाम्या जागा कळवील व जर, त्यांच्याकडे अर्हताप्राप्त उमेदवारांची नावे नोंदवाण्यात आली असतील तर, त्यांना ती नावे पाठविण्याबाबत कळवील. जाहीरातीला प्रतिसाद देऊन ज्या
उमेदवारांनी अर्ज केले असतील त्या उमेदवारांमधून किंवा सेवायोजन कार्यालयाकडून
किंवा जिल्हा समाजकल्याण अधिकार्यांकडून किंवा वर उल्लेखिलेल्या संघटनांकडून
ज्यांच्या नावाची शिफारस करण्यात आली आहे असे कोणी उमेदवार असल्यास, त्यांच्यामधून कोणतेही राखीव पद भरणे शक्य झाले नाही अथवा सेवायोजन
कार्यालयाकडून किंवा जिल्हा समाजकल्याण अधिकार्यांकडून किंवा वर उल्लेखिलेल्या
संघटनांकडून एक महिन्याच्या मुदतीत अशा नावाची शिफारस करण्यात आली नाही तर, पोटनियम (९)
च्या तरतुदीनुसार राखीव पदे भरण्याची कार्यवाही
व्यवस्थापकवर्ग करू शकेेल.
(९)
(अ) जे शिक्षकवर्गीय पद मागासवर्गापैकी विविक्षित
प्रवर्गातील व्यक्तीसाठी राखीव म्हणन ठेवण्यात आले आहे त रिक्त पद भरणे शक्य नसेल
त्या प्रकारणी,
पोट-नियम (७) मध्यें
विनिर्दिष्ट केलेया अनुक्रमाने इतर उर्वरित प्रवर्गातील उमेदवारांची निवड करून ते
पद भरता येईल आणि त्या प्रवर्गापैकी कोणत्याही प्रवर्गातील उमेदवार उपलब्ध झाला
नाही तर,
ते पद मागासवर्गीय नसलेल्या उमेदवारांची वर्षावर्षापुरती
तात्पुरर्ती नेमणूक करून भरता येईल.
(ब) शिक्षकेतर पदाच्या बाबतीत जर, मागासवर्गापैकी
विविक्षित प्रवर्गातील उमेदवार उपलब्ध झाला नाही तर पाच वर्षाच्या आत ते पद
भरण्यासाठी व्यवस्थापकवर्ग ठराविक कालांतरगणिक प्रयत्न करीत राहील, मात्र मागासवर्गाच्या संबंधित प्रवर्गापैकी नसलेल्या इतर कोणत्याही व्यक्तीची
नेमणूक करून त्या कालावधीत ते पद भरता येणार नाही.
(१०)
(अ) व्यवस्थापकवर्ग हा मुख्याध्यापक व उप-मुख्याध्यापक
यांच्या एकूण पदांपैकी (किंवा रिक्त जागांपैकी) २४ टक्के पदे ही अनुसूचित जाती, धर्मातर करून बौद्ध झालेल्या अनुसूचित जातीय व्यक्ती, अनुसूचित जनजाती,
विमुक्त व भटक्या जनजाती यांच्यासाठी पुढीलप्रमाणे राखून
ठेवील ते प्रमाण असे:-
|
(१) अनुसुचित जातीय व धर्मातर करून बौद्ध झालेल्या
अनुसूचित जातीय व्यक्ती |
१३ टक्के |
|
(२) अनुसुचित जनजाती (विनिर्दिष्ट क्षेत्राबाहेर राहणार्यांसुद्धा) |
७ टक्के |
|
(३) विमुक्त जनजाती व भटक्या जनजाती |
४ टक्के |
(ब) खंड (अ) मध्ये
विनिर्दिष्ट करण्यात आलेल्या जाती आणि जनजातीतील व्यक्तींसाठी राखीव असेल असे
मुख्याध्यापकाचे किंवा उपमुख्याध्यापकाचे पद भरणे शक्य नसेल त्याबाबतीत, खंड (अ) विनिर्दिष्ट केलेल्या अनुक्रमाने उरलेल्या इतर उर्वरित प्रवर्गातील
उमेदवाराला पदोन्नती देऊन असे पद भरता येईल. तथापि, अशी रिकामी पदे भरण्याची टक्केवारी ही, अशा प्रकारे
प्रवर्गासाठी ठरवून दिलेल्या मर्यादेहून अधिक होता कामा नये. यापैकी कोणत्याही
प्रवर्गातील उमेदवार उपलब्ध झाला नाही तर, -
(एक) मुख्याध्यापकाचे रिकामे पद किंवा रिकामी पदे शिक्षण अधिकार्याची
पूर्वमान्यता मिळवून ज्येष्ठता-नि-गुणवत्ता यांच्या आधारे एखाद्या शिक्षकाला
पदोन्नती देऊन भरता येईल किंवा येतील;
(दोन) उप-मुख्याध्यापकांचे रिकामे पद किंवा रिकामी पदे तीन वर्षाच्या
कालावधीपर्यंत रिक्त ठेवण्यात येतील मात्र त्या कालावधीत अशा जातीचे किंवा
जनजातीचे कोणतेही शिक्षक उपलब्ध झाल्यास, त्यांना
पदोन्नती देऊन असे पद किंवा अशी पदे भरणे शक्य झाले तर, गोष्टी वेगळी.
* ११. रद्द केला.
*अधिसूचना क्रमांक खाशान्या १०८३/१९४/माशि ३ कक्ष, दिनांक २० डिसेंबर १९८४ अन्वये सुधारल्याप्रमाणे
Comments
Post a Comment