१८. सेवामुक्ती प्रमाणपत्र - महाराष्ट्र खाजगी शाळा कर्मचारी (सेवेच्या शर्ती) नियमावली, १९८१ *अधिसूचना क्रमांक खाशान्या १०८३/१९४/माशि ३ कक्ष, दिनांक २० डिसेंबर १९८४ अन्वये सुधारल्याप्रमाणे

१८सेवामुक्ती प्रमाणपत्र

१८. सेवामुक्ती प्रमाणपत्र - (१) जो कर्मचारी रीतसर नोटीस देऊन सेवा सोडील किंवा ज्या कर्मचार्‍याची सेवा समाप्त करण्यात आली असेल, अशा (स्वत: मुख्यध्यापक सोडून अन्य) कर्मचार्‍याला, मुख्याध्यापक अनुसूची “ह” मधील नमुन्यात सेवामुक्ती प्रमाणपत्र देईल. मुख्याध्यापकाच्या बाबतीत असे सेवामुक्ती प्रमाणपत्र मुख्य कार्यकारी अधिकार्‍याकडून देण्यात येईल, आणि मुख्याध्यापक हा स्वत:च मुख्य कार्यकारी अधिकारी असेल तर, अध्यक्षाकडून देण्यात येईल. मुख्याध्यापक, मुख्य कार्यकारी अधिकारी किंवा अध्यक्ष हा, संबंधित कर्मचार्‍याला किंवा, प्रकरणपरत्वे, मुख्याध्यापकाला सेवेतून मुक्त केल्याच्या तारखेपासून किमान एक आठवड्याच्या आत सेवामुक्ति प्रमाणपत्र देईल. जर सेवामुक्ति प्रमाणपत्र नाकारण्यात आले तर, अशा नाकाराची कारणे कर्मचार्‍याला किंवा मुख्याध्यापाकाला सेवामुक्तिीच्या तारखेपासुन एक आठवड्याच्या आत लेखी कळवावी लागतील. मुख्याधपकाने, मुख्यकार्यकारी अधिकार्‍याने किंवा अध्यक्षाने सेवामुक्ति प्रमाणपत्र देण्यास नकार दिल्यास त्याबाबतीत, कर्मचार्‍याला किंवा मुख्याध्यापकाला, शिक्षण अधिकार्‍याकडे किंवा अध्यापक विद्यालयाच्या बाबतीत शिक्षण उपसंचालकाकडे अपील करता येईल. शिक्षण अधिकारी किंवा शिक्षण उपसंचालक, मुख्याध्यापकाने मुख्यकार्यकारी अधिकार्‍याने किंवा अध्यक्षाने नमूद केलेल्या कारणांचा विचार करून मुख्याध्यापकाला, मुख्य कार्यकारी अधिकार्‍याला किंवा अध्यक्षाला सेवामुक्ति प्रमाणपत्र देण्याबाबत निदेश देऊ शकेल आणि असे निदेश मिळल्यावर मुख्याध्यापक, मुख्य कार्यकारी अधिकारी किंवा अध्यक्ष याने सेवामुक्ती प्रमाणपत्र दिले पाहिजे.

(२) पूर्वी एखाद्या शाळेच्या सेवेत असलेल्या कर्मचार्‍याने सेवामुक्ती प्रमाणपत्र सादर केल्याशिवाय किंवा सेवमुक्ति प्रमाणपत्र देण्याविषयी पूर्वीच्या शाळेच्या व्यवस्थापक वर्गाला लेखी विनंती करूनही सेवामुक्ती प्रमाणपत्र सादर करण्यास असमर्थ असल्याबद्दल लेखी कळविल्याशिवाय त्या कर्मचार्‍याची दुसर्‍या शाळेत नियुक्ती केली जाणार नाही दुसर्‍या शाळेच्या व्यवस्थापक वर्गाने पूर्वीच्या शाळेच्या व्यवस्थापक वर्गाकडून त्याबाबतची कारणे जाणून घेतल्याशिवाय आणि कर्मचार्‍याच्या समाधानकारक कामाविषयीच्या व सद्वर्तनाविषयीच्या खर्‍याखुर्‍या महितीबाबत त्याची खात्री पटल्याशिवाय दुसर्‍या शाळेच्या व्यवस्थापक वर्गाला त्या कर्मचार्‍याची सेवा पुढे चालू ठेवता येणार नाही. त्याची सेवा जर पुढे चालू ठेवली तर, नवीन शाळेच्या व्यवस्थापकवर्ग शिक्षण अधिकार्‍याला किंवा अध्यापक विद्यालयाच्या बाबतीत उपसंचालकाला पूर्वीच्या शाळेच्या व्यवस्थापक वर्गाने सेवामुक्ति प्रमाणपत्र देण्यास नकार दिल्याबाबत कळवील आणि त्या कर्मचार्‍याचे वेतन काढण्यासाठी, त्याला मिळालेल्या अंतिम वेतनाबाबतचे प्रमाणपत्र त्या अधिकार्‍याकडून मिळवील. पंरतु दिवसा शाळेच्या कर्मचारी जेंव्हा रात्र शाळेत नोकरी इच्छित असेल तेव्हा, अशा सेवामुक्ति प्रमाणपत्राची शाळेत आवश्यकता असणार नाही. उक्त कर्मचार्‍याने आशा जादा अंशकालिका सेवा करण्यास आपली हरकत नसल्याचे नमूद करून दिवस शाळेचा मुख्याध्यापक आपली संमती कळवील.

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र खाजगी शाळा कर्मचारी (सेवेच्या शर्ती) नियमावली, १९८१- व्याख्या

Leave Rule 16 - MEPS - 1981

१६. रजा - महाराष्ट्र खाजगी शाळा कर्मचारी (सेवेच्या शर्ती) नियमावली, १९८१