६. शिक्षकांची अर्हता - महाराष्ट्र खाजगी शाळा कर्मचारी (सेवेच्या शर्ती) नियमावली, १९८१

शिक्षकांची अर्हता 

. शिक्षकांची अर्हता - प्राथमिक शाळा, माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालये व कनिष्ठ अध्यापक विद्यालयेयांतील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्या पदांची किंमत अर्हता अनुसूची “ब” मध्ये विनिर्दिष्ट केल्याप्रमाणे असेल:

परंतु, असे की, जेव्हा प्रशिक्षित पदवीधर शिक्षक मिळत नसतील अशा अपवादात्मक परिस्थितीत माध्यमिक शाळांमध्ये गणित व विज्ञान विषय शिकविण्यासाठी अप्रशिक्षित असे विज्ञान शाखेचे पदवीधर आणि इतर विषय शिकविण्यासाठी अप्रशिक्षित असे कला व वाणिज्य शापखेचे पदवीधार यांच्य नेमणुका करण्यास शिक्षण अधिकारी व्यवस्थापकवर्गास परवानगी देऊ शकेल. तथापी, त्यांना स्वखर्चाने प्रशिक्षण अर्हता मिळवावी लागेल याची स्पष्ट जाणीव देऊन आणि प्रशिक्षित पदवीधर शिक्षक उपलब्ध झाल्याबरोबर त्यांच्या सेवा समाप्त केल्या जाण्यास पात्र असतील अशी आणखी शर्त घालून अशा नेमणुका वार्षिक मुदतीच्या तत्त्वावर करण्यास परवानगी देण्यात येईल:


* आणखी असे की, महाराष्ट्र खाजगी शाळांतील कर्मचारी (सेवेच्या शर्ती) नियम, १९८१ अस्तित्वात येण्यापूर्वी शिक्षण अधिकार्‍यांची परवानगी मिळवून नियुक्त केलेल्या आणि जो महाराष्ट्र खाजगी शाळांतील कर्मचारी (सेवेच्या शर्ती) (दुरूस्ती) नियम, १९८४ अस्तित्वात येतेवेळी कोणत्याही शाळेच्या सेवेत असलेल्या अप्रशिक्षित पदवीधर शिक्षकाला, तो स्वखर्चाने विहित केलेली प्रशैक्षणिक अर्हता १ जून १९८७ पूर्वी मिळवील या अटीवर, सेवेत पुढे चालू ठेवला जाईल. अशी अर्हता त्याने यापूर्वीच प्राप्त केले असल्यास गोष्ट वेगळी राहील. तशी अर्हता तो प्राप्त करू न शकल्यास त्याची सेवा समाप्त केली जाईल.


*अधिसूचना क्रमांक खाशान्या १०८३/१९४/माशि ३ कक्ष, दिनांक २० डिसेंबर १९८४ अन्वये सुधारल्याप्रमाणे

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र खाजगी शाळा कर्मचारी (सेवेच्या शर्ती) नियमावली, १९८१- व्याख्या

Leave Rule 16 - MEPS - 1981

१६. रजा - महाराष्ट्र खाजगी शाळा कर्मचारी (सेवेच्या शर्ती) नियमावली, १९८१