१२. ज्येष्ठता सूची - महाराष्ट्र खाजगी शाळा कर्मचारी (सेवेच्या शर्ती) नियमावली, १९८१

१२ज्येष्ठता सूची 

१२. ज्येष्ठता सूची - (१) प्रत्येक व्यवस्थापक वर्ग हा आपल्या शाळेतील मुख्याध्यापक व उपमुख्याध्यापक यांच्यासुद्धा शिक्षक वर्ग व शिक्षकेतर कर्मचारी वर्ग यांची नमुना “फ” मध्ये घालून दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वास अनुसरून एक ज्येष्ठता सूची तयार करील व ती राखली. अशा रीतीने तयार करण्यात आलेली ज्येष्ठता सूची संबंधित कर्मचारी वर्गातील व्यक्तींमध्ये फिरविण्यात येईल व अशा सूचीची प्रत मिळाण्याबद्दल त्यांच्या सह्या घेण्यात येतील. ज्येष्ठता सूचीत नंतर वेळोवेळी करण्यात आलेला कोणताही बदल संबंधित कर्मचारीवर्गातील व्यक्तीच्या निदर्शनास आणून देण्यात येईल; आणि बदलाची दखल घेण्यात आली असल्याबद्दल त्यांच्या सह्या घेण्यात येतील;

() ज्येष्ठता सूची किंवा तिच्यामधील बदल याबाबत कोणतेही आक्षेप असल्यास, व्यवस्थापकवर्गाकडून त्यावर यथोचितरित्या विचार केला जाईल;

() ज्येष्ठतेच्या बाबतीत परस्परांमध्ये कोणतेही विवाद असल्यास, असे विवाद शिक्षणाधिकार्‍याकडे त्याच्या निर्णयाशी निर्देशित करण्यात येतील.


Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र खाजगी शाळा कर्मचारी (सेवेच्या शर्ती) नियमावली, १९८१- व्याख्या

Leave Rule 16 - MEPS - 1981

१६. रजा - महाराष्ट्र खाजगी शाळा कर्मचारी (सेवेच्या शर्ती) नियमावली, १९८१