१३. मोठी सुट्टी व मोठ्या सुट्टीचे वेतन - महाराष्ट्र खाजगी शाळा कर्मचारी (सेवेच्या शर्ती) नियमावली, १९८१

 १३मोठी सुट्टी व मोठ्या सुट्टीचे वेतन

१३. मोठी सुट्टी व मोठ्या सुट्टीचे वेतन - (१) या नियमाच्या उपबंधाच्या अधिनतेने, शाळेतील मुख्याध्यापक, प्रयोगशाळा सहाय्यक व प्रयोगशाळा परिचर, शिक्षकवर्गातील सर्व कर्मचार्‍यांनासुद्धा पुढीलप्रमाणे मोठी सुट्टी मिळण्याचा हक्क असेल : -

(एक) सर्वसाधारणपणे दिवाळी या सणाचा समावेश होईल अशी, दरवर्षी एकतर ऑक्टोबर किंवा नोव्हेंबर महिन्यात सुरू होणारी कमी मुदतीची सुट्टी;

(दोन) दरवर्षी समान्यत: मे महिन्यात सुरू होणारी उन्हाळ्याची मोठी सुट्टी.

सुट्ट्या सुरु होण्याच्या तारखा व त्यांचा कालावधी शिक्षण व निरीक्षक किंवा, प्रकरणपरत्वे, जिल्ह्यातील शिक्षणाधिकारी यांच्याकडून अधिसूचित करण्यात येईल.

() कोणत्याही अस्थायी कर्मचार्‍याने संबंधित सत्रातील मोठा काळ काम केले असेल आणि रजा, प्रतिनियुक्ती किंवा विनिर्दिष्ट कालावधीसाठी निर्माण करण्यात आलेले पद यामुळे तात्पुरत्या रिकाम्या झालेला ज्या पदावर त्यांची मूलत: नियुक्ती झालेली असेल ते तात्पुरते रिकाम पद जर, सुट्टीनंतरही अस्तित्वात राहिले आणि असा कर्मचारी सुटीनंतर सेवेत राहिला तर अशा अस्थायी कर्मचार्‍यास सुटीच्या कालावधीचे वेतन मिळण्याचा हक्क राहील.

() जेव्हा व्यवस्थापकवर्गाने एखाद्या अस्थायी कर्मचार्‍याची सेवा उन्हाळ्याची सुटी सुरू होण्याच्या थोडे आधी समाप्त केली असेल तेव्हा, जर आस्थापनेत कपात होण्याच्या शक्यतेखेरीज अन्य कारणास्तव त्यांची सेवा समाप्त करण्यात आली आहे अशी शिक्षण अधिकार्‍यांची खात्री झाली असेल तर, अशा अस्थायी कर्मचार्‍यास मोठ्या सुट्टीच्या वेतनाशिवाय आणखी त्याच्या सेवा समाप्तीची तारीख व मोठी सुटी सुरू होण्याची तारीख यामधील कालावधीचे वेतन व भत्ते मिळण्याचा हक्क राहील.

() स्थायी कर्मचार्‍याने रीतसर नोटीस देऊन शाळेतील आपल्या पदाचा राजिनामा सत्राच्या शेवटच्या कामच्या दिवशी दिला असेल तर, त्याला सुटीचे वेतन मिळण्याचा हक्क राहील.

() स्थायी कर्मचार्‍याने रीतसर नोटीस देऊन शाळेतील आपल्या पदाचा राजीनामा सत्राच्या मध्याावर दिला असेल आणि पोट-नियम (२) अन्वये सुटीचे वेतन मिळण्यास जी व्यक्ती एरव्ही हक्कदार झाली असती अशा दुसर्‍या व्यक्तीची नेमणूक करणे शाळेला भाग पडेल असेल तर, ज्याने राजीनामा दिला आहे अशा स्थायी कर्मचार्‍याला त्या कालावधीचे सुटीचे वेतन मिळण्याचा हक्क असणार नाही.

() दिनांक १६ जुलै १९६९ ते ६ फेब्रुवारी १९७४ (हे दोन्ही दिवस धरून) या कालावधीत माध्यमिक शाळा व अध्यापक विद्यालये यामध्ये नियुक्ती करण्यात आलेल्या व (प्रशिक्षणाच्या संपूर्ण कालावधीसाठी रजा मंजूर करून) स्वखर्चाने प्रशिक्षण घेण्याची ज्यांना परवानगी देण्यात आलेली असेल अशा अप्रत्यशिक्षित शिक्षकांना, प्रशिक्षण पूर्ण होऊन ते आपल्या कामावर रूजू झाल्यानंतर लगेच येणार्‍या सुटीचे वेतन मिळण्याचा हक्क राहील.

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र खाजगी शाळा कर्मचारी (सेवेच्या शर्ती) नियमावली, १९८१- व्याख्या

Leave Rule 16 - MEPS - 1981

१६. रजा - महाराष्ट्र खाजगी शाळा कर्मचारी (सेवेच्या शर्ती) नियमावली, १९८१