१५. गोपनीय अहवाला लिहिणे इत्यादी - महाराष्ट्र खाजगी शाळा कर्मचारी (सेवेच्या शर्ती) नियमावली, १९८१
१५. गोपनीय अहवाला लिहिणे इत्यादी
१५.
गोपनीय अहवाला लिहिणे इत्यादी - (१)
दरवर्षी अनुसूची “ग” मधील संबंधित नमुन्यात गोपनीय अहवाल
लिहिण्यात येेतील. कर्मचारी व मुख्याध्यापक यांच्या संबंधातील गोपनीय अहवाल
लिहिणारे प्राधिकारी हे अनुक्रमे मुख्याध्यापक व मुख्य कार्यकारी अधिकारी असतील.
जूनपासून सुरू होणार्या शैक्षणिक वर्षात सहा महिने किंवा त्याहून अधिक काळा
ज्याने काम केले आहे अशा कर्मचार्याच्या किंवा मुख्याध्यापकाच्या संबंधात गोपनीय
अहवाल लिहिण्यात येईल. मुख्याध्यापक किंवा शिक्षक हा व्यवस्थापनाचा सचिव असेल तर, त्यांच्या संबंधातील गोपनीय असहवाल व्यवस्थापनाच्या अध्यक्षाकडून लिहिला जाईल.
(२)
कर्मचारी व मुख्याध्यापक यांच्याबाबतीत अशा प्रकारे
लिहिण्यात आलेल्या गोपनीय अहवालांचे परिक्षण अनुक्रमे मुख्य कार्यकारी अधिकार्याकडून
व व्यवस्थापक वर्गाच्या अध्यक्षांकडून केले जाईल. अध्यक्षाने लिहिलेल्या
मुख्याध्यापकांच्या किंवा शिक्षकांच्या गोपनीय अहवालाचे परिक्षण व्यवस्थापन
समितीकडून केले जाईल.
(३)
गोपनीय अहवाल लिहिणारा संबंधित प्राधिकारी, कोणताही प्रतिकूल शेरा असल्यास, असा शेरा
संबंधित कर्मचार्याला किंवा प्रकारणपरत्वे, मुख्याध्यापकाला
दरवर्षी ऑगस्ट महिना संपण्यापूर्वी गोपनीयरित्या लेखी कळवण्याची व्यवस्था करील.
(४)
वरील पोट-नियम (३) अनुसार
कर्मचार्याला कळविण्यात आलेल्या प्रथतकूल शेर्याविरूद्ध त्याने कोणतेही अभिवेदन
केल्यास,
अशा अभिवेदनावर शाळा समितीकडून निर्णय दिला जाईल.
मुख्याध्यापकाकडून अशाच प्रकारचे अभिवेदन करण्यात आले असल्यास, अशा अभिवेदनावर व्यवस्थापन समितीकडून निर्णिय दिला जाईल.
(५)
गोपनीय अहवाल न लिहिणे व न ठेवणे आणि पोट-नियम (३) मध्ये विहित केलेल्या कालावधीत कर्मचार्यांना प्रतिकूल शेरा न कळविणे याचा
अर्थ संबंधित कर्मचार्याचे अहवालाधीन वर्षाच्या कालावधीतील काम समाधानकारक होते
असा होईल.
(६)
परिवीक्षाधीन नेमणूक करण्यात आलेल्या एखाद्या कर्मचार्याच्या
कामाचे मूल्यमापन,
त्याच्या परिवीक्षेच्या कालवधीत शाळाप्रमुखाकडून
वस्तुनिष्ठपणे केले जाईल;
आणि अशा मूल्यमापनाची नोंद ठेवण्यात येईल.
Comments
Post a Comment