२०. भविष्यनिर्वाह निधी - महाराष्ट्र खाजगी शाळा कर्मचारी (सेवेच्या शर्ती) नियमावली, १९८१

२०भविष्यनिर्वाह निधी -

२०. भविष्यनिर्वाह निधी - (१) अनुदानित किंवा अनअनुदानित शाळेत पूर्णवेळ काम कारणारा (ज्याने निवृत्ती वेतनासाठी विकल्प दिला असेल असा कर्मचारी नव्हे) प्रत्येक कर्मचारी अथवा एकाच व्यवस्थापनाकडून चालविण्यात येणार्‍या एकापेक्षा अधिक शाळांमध्ये अंशकालिन तत्वावर कमा कारणारा व त्या शाळांमध्ये पूर्ण वेळ कार्यभार हाताळणार प्रत्येक कर्मचारी, त्या त्या वेळी अंमलात असल्याप्रमाणे ‘अंशदायी भविष्यनिर्वाह निधी नियमावली (मुंबई)’ अन्वये अंशदायी भविष्यनिर्वाह निधीमध्ये वर्गणी भरेल.

() ज्यांची नेमणूक १ एप्रिल १९६६ पूर्वी झालेली असेल आणि ज्याने अंशदायी भविष्यनिर्वाह निधी योजनेसाठी आपला विकल्प लेखी दिलेला असेल असा, अनुदानित खाजगी माध्यमिक शाळेत पूर्णकालिक तत्वावर काम करणारा प्रत्येक कर्मचारी, शासनाद्वारे करण्यात आलेल्या व त्याबाबतीत अंमलात असलेल्या नियमांनुसार त्या निधीत वर्गणी भरेल.

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र खाजगी शाळा कर्मचारी (सेवेच्या शर्ती) नियमावली, १९८१- व्याख्या

Leave Rule 16 - MEPS - 1981

१६. रजा - महाराष्ट्र खाजगी शाळा कर्मचारी (सेवेच्या शर्ती) नियमावली, १९८१