५. उप-मुख्याध्यापक व पर्यवेक्षक यांच्या अर्हता व नेमणुका - (सेवेच्या शर्ती) नियमावली, १९८१
महाराष्ट्र खाजगी शाळा कर्मचारी (सेवेच्या
शर्ती) नियमावली,
१९८१
उप-मुख्याध्यापक व पर्यवेक्षक यांच्या अर्हता व नेमणुका -
५. उप-मुख्याध्यापक व पर्यवेक्षक
यांच्या अर्हता व नेमणुका - (१) ज्या शाळेत वीसपेक्षा अधिक वर्ग असतील अशा माध्यमिक शाळैचा
व्यवस्थापक वर्ग हा मुख्याध्यापकास त्याच्या संघटनविषयक, प्रशासनविषयक व पर्यवेक्षकीय कामात मदत करण्यासाठी
उप-मुख्याध्यापक नेमील :
* परंतु, असे की, महाराष्ट्र खाजगी शाळांतील कर्मचारी (सेवेच्या शर्ती) नियम, १९८१ अंमलात येण्यापूर्वी अस्तित्वात असलेल्या नियमांनुसार
व्यवस्थापक वर्गाने उप-मुख्याध्यापकाच्या ऐवजी पर्यवेक्षकाची नियुक्ती केली असेल
अशा प्रकरणी :-
(एक) महाराष्ट्र खाजगी शाळांतील कर्मचारी (सेवेच्या शर्ती)
नियम,
१९८४ अंमलात आल्यानंतर, जर असा
नेमलेल्या पर्यवेक्षक ज्येष्ठतम शिक्षक व उप-मुख्याध्यापक म्हणून नियुक्त करण्यास
पात्र असेल तर,
त्याला उप-मुख्याध्यापक म्हणून नेमले जाईल; किंवा
(दोन) जर, असा नेमलेला
पर्यवेक्षक हा जेष्ठातम शिक्षक नसेल आणि त्याच्या पर्यवेक्षक म्हणून नियुक्तीची
मुदत महाराष्ट्र खाजगी शाळांतील कर्मचारी (सेवेची शर्ती) (दुरूस्ती) नियम, १९८४ अंमलात आल्यानंतर समाप्त व्हावयाची असेल तर, त्याची पर्यवेक्षक म्हणून नियुक्तीची मुदत संमपल्यानंतर
लगेच,
ह्या नियमानुसार उप-मुख्याध्यापक म्हणून नियुक्त होण्यास
पात्र असलेल्या ज्येष्ठतम शिक्षकाची उप-मुख्याध्यापक म्हणून नियुक्ती
व्यवस्थापकवर्ग करील.
(२)
पोट-नियम (५) मधील
तरतुदींच्या अधिनतेने,
मुख्याध्यापकाची अर्हता व नेमणूक यासंबधातील नियम ३च्या
तरतुदी उप-मुख्याध्यापक व पर्यवेक्षक यांच्य पदांनाही यथोचित फेरबदलासह लागू
होतील.
* (३)
दहापेक्षा अधिक वर्ग असलेल्या माध्यमिक शाळेला पोट-नियम (४)च्या तरतुदींनुसार एक अथवा अधिक पर्यवेषक अनुज्ञेय असतील.
![]()
(४)
एखाद्या शाळेत किती पर्यवेक्षक असावेत त्यासंबंधी खालील
रीतीने नियमन करण्यात येईल :-
|
(एक) १० किंवा १० पेक्षा कमी वर्ग असलेल्या शाळा |
पर्यवेक्षक नाही. |
|
(दोन) १० पेक्षा अधिक, परंतु ४० पेक्षा अधिक नाहीत इतके वर्ग |
पर्यवेक्षकाचे एक पद. |
|
(तीन) ३० पेक्षा अधिक, परंतु ४० पेक्षा अधिक नाहीत इतके वर्ग |
पर्यवेक्षकाची दोन पदे असलेल्या शाळा. |
|
(चार) ४० पेक्षा अधिक वर्ग असलेल्या शाळा |
पर्यवेक्षकाची तीन पदे; |
*परंतु असे की, नियम ९च्या
पोट-नियम (१०)
मधील खंड (ब) च्या उप-खंड (दोन) अन्वय उप-मुख्याध्यापकाचे
पद तीन वर्षााच्या अगर त्यापेक्षा कमी कालावधीसाठी रिक्त ठेवावे लागेल अशा
प्रकारणी वरील खंड (दोन),
(तीन) किंवा (चार) प्रमाणे अनुज्ञेय असलेल्या
पर्यवेक्षकांच्या पदांव्यतिरिक्त आणखी एक पर्यवेक्षकाचे पद अशा कलावधीपुरते
अनुज्ञेय राहील.
(५)
पर्यवेक्षकांची पदे कायम कर्मचार्यांमधून
ज्येष्ठता-नि-गुणवत्ता हा निकष काटेकोरपणे लावून त्याआधारे भरण्यात येतील. अनुसूची
“फ” मध्ये दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वांच्या आधारे ज्येष्ठता निश्चित करण्यात
येईल. नियम ३च्या पोट-नियम (६) खालील स्पष्टीकरणात
देण्यात आलेल्या अर्थाने त्याचे सेवाविषयक पूर्ववृत्त लक्षात घेवून त्यानुसार
गुणवत्ता ठरविण्यात येईल.
Comments
Post a Comment