१९. निवृत्तीवेतन - महाराष्ट्र खाजगी शाळा कर्मचारी (सेवेच्या शर्ती) नियमावली, १९८१
१९. निवृत्तीवेतन -
१९.
निवृत्तीवेतन - जो कर्मचारी
अनुदानित माध्यमिक शाळेचा किंवा अनुदानित अध्यापक विद्यालयाचा पूर्णकालिक तत्वावर
काम करणारा आणि १ एप्रिल १९६६ रोजी किंवा त्यानंतर सेवानिवृत्त होणारा कर्मचारी
असूनही आणि जो कर्मचारी अनुदानित प्राथमिक शाळेचा पूर्णकालिक तत्त्वावर काम करणारा
व १ एप्रिल १९७९ रोजी किंवा त्यानंतर सेवानिवृत्त होणारा कर्मचाररी असूनही, ज्याने निवृत्तीवेतनासाठी आपला विकल्प दिलेला आहे असे कर्मचारी आणि वर नमूद
केलेल्या त्या त्या तारखांना किंवा त्यानंतर नेमणूक झालेला कर्मचारी, शासनाने खासकरून खाजगी शाळांतील कर्मचार्यांसाठी मंजूर केलेल्या दराने व
मंजूर केलेल्या नियमानुसार निवृत्ती वेतन मिळण्यास पात्र असतील.
Comments
Post a Comment