४०. राजीनामा - महाराष्ट्र खाजगी शाळा कर्मचारी (सेवेच्या शर्ती) नियमावली, १९८१

४०राजीनामा

४०. राजीनामा - () स्थायी कर्मचारी तीन कॅलेंडर महिन्यांची नोटीस देऊन, नोकरी सोडून देऊन शकेल आणि अस्थायी कर्मचारी एका कॅलेंडर महिन्याची नोटीस देऊन नोकरी देऊ शकेल. तथापि व्यवस्थापकवर्ग कर्मचाऱ्याने नोटीशीऐवजी तीन महिन्यांच्या किंवा, प्रकरणपरत्वे, एक महिन्याच्या वेतनाची (भत्ते वगळून) रक्कम दिल्यावर त्याआधी सेवा सोडून देण्यास कर्मचाऱ्याला परवानगी देऊ शकेल. नोटीशीऐवजी दिली जाणारी रक्कम नोटिशीचा कालावधी जितक्या दिवसांनी कमी पडत असेल तितक्या दिवसांच्या कालावधीच्या वेतनाइतकी मर्यादित असेल.

() पोट-नियम () मध्ये विनिर्दिष्ट केल्याप्रमाणे एकतर रीतसर नोटीस दिल्याशिवाय किंवा नोटीशी ऐवजी वेतनाची रक्कम दिल्याशिवाय अगोदरच नोकरी सोडण्यास व्यवस्थापकवर्गाने एखाद्या कर्मचाऱ्याला परवानगी दिल्यास नोटिशीच्या ऐवजी द्यावयाची वेतनाची त्या प्रमाणातील रक्कम, संबंधित शाळला देय असलेल्या अनुदानातून कापण्यात येईल.

() मोठ्या सुट्टीचा हक्क असणारा कर्मचारी सुट्टीच्या कालावधीत किंवा सुटीचा कोणताही भाग समाविष्ट होईल अशा कालावधीत राजीनाम्याची नोटीस देऊ शकणार नाही. राजीनाम्याची नोटीस, वर्षाचे पहिले सत्र सुरु झाल्यानंतर एका महिन्याच्या आत देता येणार नाही.

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र खाजगी शाळा कर्मचारी (सेवेच्या शर्ती) नियमावली, १९८१- व्याख्या

अनुसूची “ज” - कर्मचार्‍यांची कर्तव्ये - महाराष्ट्र खाजगी शाळा कर्मचारी (सेवेच्या शर्ती) नियमावली, १९८१

१६. रजा - महाराष्ट्र खाजगी शाळा कर्मचारी (सेवेच्या शर्ती) नियमावली, १९८१