४२. निवडणूक लढविणे - महाराष्ट्र खाजगी शाळा कर्मचारी (सेवेच्या शर्ती) नियमावली, १९८१

४२निवडणूक लढविणे

*४२. निवडणूक लढविणे - () पोट-नियम ते मधील (दोन्हीधरुन) तरतुदींच्या अधीनतेने; व्यवस्थापक वर्गाला लेखी पूर्व सूचना देऊन अकृशि विद्यापीठांच्या कायद्यातील तरतुदींनुसार, विद्यापीठ विधिसभेच्या किंवा प्रकरणपरत्वे, भारतीय संविधानाच्या खंड १७१ च्या, कलम च्या पोट-कलम () () मधील तरतुदींनुसार, महाराष्ट्र विधान परिषदेच्या निवडणूक कर्मचारी लढवू शकेल.

 () पोट-नियम () ते () मधील (दोन्हीधरुन), तरतुदीच्या अधीनतेने, व्यवस्थापक वर्गाच्या लेखी पूर्व परवानगीने [वरील पोट-नियम () मध्ये उल्लेखिलेली पदे वगळून इतर ] स्थानिक, जिल्हा, राज्य किंवा राष्ट्रीय स्तरावरील सार्वजनिक पदांच्या निवडणुका, कर्मचारी लढवू शकेल.

() अशी निवडणूक लढविण्यासाठी नामनिर्देशनपत्र भरल्यानंतर ते वैध असल्याचे घोषित झाल्यानंतर ताबडतोब संबंधित कर्मचारी त्याला देय अनुज्ञेय असलेल्या रजेवर जाईल; आणि जर त्यांच्या खात्यात कोणतीही रजा शिल्लक नसेल तर तो असाधारण रजेवर जाईल आणि निवडणूक निकाल घोषित होईपर्यंत रजेवरच राहील:

 परंतु, असे कि, अशी निवडणूक लढविणाऱ्या अस्थायी कर्मचायांच्याबाबतीत, व्यवस्थापकवर्गाच्या मते निवडणूक मोहीम कर्मचाऱ्याच्या कर्तव्यांवर प्रतिकूल परिणाम करण्याची शक्यता असल्यास, व्यवस्थापकवर्ग अशा कर्मचारला निवडणूक मोहिमेच्या कालावधीसुद्धा आपल्या पदाचा राजीनामा द्यावयास लावू शकेल.

() अशी निवडणूक लढविणारा कर्मचारी, तो ज्या संस्थेच्या सेवेत आहे, अशा संस्थेच्या व्यवस्थापक वर्गाला, कर्मचाऱ्यांना किंवा विद्यार्थ्यांना, निवडणूक मोहिमेत सहभागी करून घेणार नाही.

() () कायम कर्मचारी निवडणूक आल्यास, जेवढ्या कालावधीसाठी तो ते पद धारण करणार आहे तेवढ्या कालावधीचे रजेचा कालावधी, त्याला देय अनुज्ञेय असलेल्या रजेने आणि जर कोणतीही रजा त्याच्या खात्यात शिल्लक नसेल तर असाधारण रजेन, वाढवील, आणि व्यवस्थापक वर्ग नियम १६ च्या पोट-नियम (१३) मधील मर्यादा शिथिल करून अशी रजावाढ मंजूर करील.

() तथापि, जर अशा सार्वजनिक पदाची सत्रे किंवा सभा ठराविक कालांतराने भरत असतील तर, प्रवास कालावधी धरून अशा सत्रांच्या प्रत्यक्ष कालावधी एवढी त्याला देय अनुज्ञेय असलेली रजा किंवा, प्रकरणपरत्वे, असाधारण रजा, घेण्याची त्याला परवानगी असेल आणि उर्वरित कालावधीमध्ये शाळेत हजर राहण्याची परवानगी दिली जाईल.

() या उद्देशाकरिता घेतलेल्या असाधारण रजेचा कालावधी वार्षिक वेतनवाढीच्या प्रयोजनाकरिता मोजला जाईल.

() () जर कायम कर्मचारी, ज्यासाठी पूर्णवेळ उपस्थिती किंवा मूळकर्तव्या पासून दीर्घकाळ अनुपस्थिती आवश्यक आहे असा, सभापती, अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, सहसचिव इत्यादी सारखा, पदाधिकारी झाला तर, तो आपण धारण करीत असलेल्या पदावर त्याचा धरणाधिकार राखून ठेवण्यासाठी अर्ज करील आणि व्यवस्थापकवर्ग त्याचा अर्ज मंजूर करील.

() निवडणूक निकाल घोषित होईलपर्यंत रजेवर असलेल्या तात्पुरत्या कर्मचायांच्याबाबतीत तो निवडणूक आल्यास, सार्वजनिक पदावर निवड झाल्याबरोबर ताबडतोब तो आपण धारण करत असलेल्या पदाचा राजीनामा देईल.

() पोट-नियम (), () () च्या तरतुदी -

(एक) सार्वजनिक पदांवर निवडून आलेले स्थायी कर्मचारी त्यांच्या पदामुळे पुन्हा विद्यापीठ विधीसभेवर किंवा प्रकरणपरत्वे, राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळावर निवडले गेल्यास, त्यांना;

(दोन) राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळावर किंवा विभागीय मंडळावर राज्य शासनाकडून नामनिर्देशित केल्या गेलेल्या स्थायी कर्मचाऱ्यांना यथोचित फेरबदलासह लागू राहतील.


 *अधिसूचना क्रमांक खाशान्या १०८३/१९४/माशि ३ कक्ष, दिनांक २० डिसेंबर १९८४ अन्वये सुधारल्याप्रमाणे

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र खाजगी शाळा कर्मचारी (सेवेच्या शर्ती) नियमावली, १९८१- व्याख्या

अनुसूची “ज” - कर्मचार्‍यांची कर्तव्ये - महाराष्ट्र खाजगी शाळा कर्मचारी (सेवेच्या शर्ती) नियमावली, १९८१

१६. रजा - महाराष्ट्र खाजगी शाळा कर्मचारी (सेवेच्या शर्ती) नियमावली, १९८१