२९. शिक्षा - महाराष्ट्र खाजगी शाळा कर्मचारी (सेवेच्या शर्ती) नियमावली, १९८१

२९शिक्षा

२९. शिक्षा - या नियमांच्या उपबंधास बाधा येता, नियम २८ मध्ये विनिर्दिष्ट केल्याप्रमाणे गैरवर्तणूक, नैतिक अधःपात, कर्तव्यात बुद्धिपरस्सर हयगय आणि अक्षमता यामुळे दोषी ठरलेला कोणताही कर्मचारी पुढीलपैकी कोणत्याही शिक्षेस पात्र ठरेल :-

() ताकद देणे, खरडपट्टी काढणे किंवा ठपका ठेवणे.

() जास्तीत जास्त एक वर्ष एवढ्या कालावधीसाठी वेतनवाढ रोखून ठेवणे.

() हयगय किंवा आदेशांचा भंग यामुळे संस्थेला सोसावे लागलेले संपूर्ण आर्थिक नुकसान किंवा अशा नुकसानीचा कोणताही भाग, वेतनातून किंवा त्याला देय असेल अशा इतर रकमेतून वसूल करणे.

() खालच्या पदावर आणणे.

() सेवा समाप्त करणे.

परंतु, नियम ३१ च्या खंड () मध्ये विनिर्दिष्ट केल्याप्रमाणे किरकोळ शिक्षा लादण्याच्या निर्णयामुळे आपल्यावर अन्याय झाला आहे असे वाटणाऱ्या, खाजगी शाळेतील एखाद्या कर्मचाऱ्यास, शिक्षेबाबत आदेश मिळाल्याच्या तारखेपासून ४५ दिवसांच्या आत, संबंधित विभागाच्या (Region) उपसंचालकाकडे अपील दाखल करता येईल.

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र खाजगी शाळा कर्मचारी (सेवेच्या शर्ती) नियमावली, १९८१- व्याख्या

अनुसूची “ज” - कर्मचार्‍यांची कर्तव्ये - महाराष्ट्र खाजगी शाळा कर्मचारी (सेवेच्या शर्ती) नियमावली, १९८१

१६. रजा - महाराष्ट्र खाजगी शाळा कर्मचारी (सेवेच्या शर्ती) नियमावली, १९८१