३९. अपिले दाखल करण्याची कार्यपद्धती - महाराष्ट्र खाजगी शाळा कर्मचारी (सेवेच्या शर्ती) नियमावली, १९८१

३९अपिले दाखल करण्याची कार्यपद्धती

३९. अपिले दाखल करण्याची कार्यपद्धती - () अधिनियमाच्या कलम , पोटकलम () अन्वये केल्या जाणाऱ्या प्रत्येक अपील अर्जावर अपिलकार यथोचितरित्या सही करील आणि ते तीन प्रतीमध्ये शाळा न्यायाधिकरणाच्या पीठासीन अधिकाऱ्याला सक्षम सादर करील किंवा पोच देय नोंदणी डाकेने पाठवील.

() प्रत्येक अपिलकाराला आपापले अपील वेगवेगळे करावे लागेल. कोणतेही संयुक्त अपील दाखल करून घेण्यात येणार नाही. परंतु अपील जर एकाच चौकशीमधून उद्भवलेले असेल आणि अपिलात उपस्थित करण्यात आलेले मुद्दे एकाच प्रकारचे असतील तर, न्यायाधिकरण दोन किंवा अधिक कर्मचाऱ्यांनी केलेले संयुक्त अपील दाखल करून घेऊ शकेल.

() प्रत्येक अपील अर्जामध्ये अपीलकाराने ज्यांचा आधार घेतलेला असेल अशी महत्त्वाची सर्व निवेदन आणि युक्तीवाद यांचा समावेश असेल आणि त्यासोबत ज्या आदेशाविरुद्ध अपील करण्यात आलेले असेल त्या आदेशाची एक प्रत आणि अपिलात निर्देश केलेल्या सर्व दस्तऐवजाच्या प्रती जोडलेल्या असतील.

() प्रत्येक अपील अर्जासोबत "पीठासीन अधिकारी शाळा न्यायाधिकरण......" यांच्या नावे देय असलेली पन्नास रुपये किमतीची एक रेखित इंडियन पोस्टल ऑर्डर किंवा डिमांड ड्राफ्ट जोडावा लागेल. न्यायाधिकरणाच्या कार्यालयामध्ये ही फी रोख स्वरूपात भरणा करता येईल किंवा डाक मनि ऑर्डरने पाठविता येईल.

() प्रत्येक अपील अर्ज मराठी किंवा इंग्रजी भाषेत सादर करता येईल.

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र खाजगी शाळा कर्मचारी (सेवेच्या शर्ती) नियमावली, १९८१- व्याख्या

अनुसूची “ज” - कर्मचार्‍यांची कर्तव्ये - महाराष्ट्र खाजगी शाळा कर्मचारी (सेवेच्या शर्ती) नियमावली, १९८१

१६. रजा - महाराष्ट्र खाजगी शाळा कर्मचारी (सेवेच्या शर्ती) नियमावली, १९८१