अनुसूची "अ" - शाळा समिती - महाराष्ट्र खाजगी शाळा कर्मचारी (सेवेच्या शर्ती) नियमावली, १९८१

 अनुसूची ""

[नियम () () पहा]

शाळा समिती


. () प्रत्येक शाळेची एक शाळा समिती असेल तो शाळेच्या व्यवस्थापनाबद्दल शासनाला जबाबदार असेल ; (एक) प्राथमिक शाळा; (दोन) कोणताही उच्च माध्यमिक वर्ग असल्यास त्याच्या माध्यमिक शाळा; (तीन) वरिष्ठ महाविद्यालयाशी संलग्न असलेला कनिष्ठ महाविद्यालयाचा भाग; आणि (चार) अध्यापक विद्यालय, यांच्यासाठी निरनिराळ्या शाळा समित्या असतील.

*() एकापेक्षा अधिक शाळा चालणाऱ्या कोणत्याही संस्थेसाठी किंवा ट्र्स्टसाठी अशी संस्था किंवा ट्र्स्ट चालवित असलेल्या सर्व शाळांसाठी किंवा शाळासमूहासाठी अशा प्रत्येक शाळेच्या शाळा समिती व्यतिरिक्त एकेक समन्वय समिती असेल. *शाळा समितीच्या निरनिराळ्या कामांच्याबाबतचे समितीचे निर्णय समन्वय समितीच्या अनुसमर्थनाच्या अधीन राहतील.

. शाळा समिती ही पुढील सदस्य मिळून बनेल, ते असे :-

() नियामक मंडळाचा अध्यक्ष किंवा त्याने नामनियुक्त केलेली व्यक्ती नियामक मंडळाने नामनियुक्त केलेले तीन सदस्य मिळून होणारे व्यवस्थापक वर्गाचे चार प्रतिनिधी. नियामक मंडळाचा अध्यक्ष किंवा त्याने नामनियुक्त केलेली व्यक्ती हि समितीची सभापती असेल ;

() फक्त त्याच शाळेच्या कायम शिक्षकांमधून वर्षावर्षाला, आळीपाळीने ज्येष्ठता क्रमांनुसार एक सदस्य, आणि फक्त त्या शाळेच्या शिक्षकेतर कर्मचारी वर्गामधून, वर्षावर्षाला संवर्गांच्या आळीपाळीने ज्येष्ठता क्रमानुसार, एक सदस्य उदाहरणार्थ, ग्रंथपाल असल्यास, तो पहिल्या वर्षी, ज्येष्ठतम वरिष्ठ लिपिक दुसऱ्या वर्षी प्रयोगशाळा सहाय्यक असल्यास, तो तिसऱ्या वर्षी, कनिष्ठ श्रेणी कर्मचारी, वर्गातील ज्येष्ठतम व्यक्ति चवथ्या वर्षी नंतर पुन्हा ज्येष्ठता क्रमानुसार लिपिक पाचव्या वर्षी आणि त्यानुसार पुढे.

() मुख्याध्यापक शाळा समितीची पदसिद्ध सचिव असेल तो समितीच्या सभेच्या कार्यवृत्तांची नोंद ठेवण्यास जबाबदार असेल; परंतु शाळा, ही सार्वजनिक विश्‍वस्त व्यवस्था म्हणून नोंदलेल्या एखाद्या ट्र्स्टकडून चालविण्यात येत असेल त्याबाबतीत, कोणतेही संस्थापक सदस्य उपलब्ध असतील तर, खंड () मध्ये निर्देशिलेल्या चार प्रतिनिधींमध्ये अशा सदस्यांचा समावेश असेल. शाळा समितीवर असा एक किंवा त्याहून अधिक परंतु, चारापेक्षा कमी संस्थापक सदस्य असतील तर, संस्थापक सदस्य हे अशा शाळेच्या शाळा समितीवरील एकूण सदस्यांची संख्या चार होईल अशाप्रकारे आणखी तीन किंवा आवश्यक तेवढे सदस्य नामनियुक्त करतील.

*आणखी असे की, नियामक मंडळाच्या अध्यक्षाला त्याने नामनियुक्त केलेली व्यक्ती एक वर्षानंतर बदलण्याचा हक्क राहील, त्याच प्रमाणे नियामक मंडळाला त्याने नामनियुक्त केलेल्या व्यक्तिपैकी एक किंवा जास्त व्यक्ति एक वर्षानंतर बदलण्याचा हक्क राहील.

() जर परवानगीशिवाय एखाद्या सदस्य लागोपाठ तीन बैठकांना गैरहजर राहिला तर त्याची नामनियुक्ती रद्द होईल.

*() प्रत्येक वर्षात दोन बैठकांमधील कालावधी ६० दिवसांपेक्षा जास्त रहाणार नाही अशा अटींवर, शाळा समितीच्या सहा बैठका होतील.

. शाळा समितीची कामे पुढीलप्रमाणे असतील, ती अशी :-

() शाळेचे व्यवस्थापन वित्त व्यवस्थेचे विनियमन हिशोब ठेवणे आणि शाळेच्या रकमांची गुंतवणूक करणे;

() अर्थसंकल्प तयार करणे ;

() मुख्याध्यापकांकडून अन्य कर्मचाऱ्यांची नियुक्ती ;

() अध्यापनाचे नवीन पाठयक्रम चालू करणे;

() अधिनियम ही नियमावली यांच्या तरतुदींच्या अधिनतेने मुखाध्यापकांकडून अन्य कर्मचाऱ्यांना कायम करणे, त्यांची पदोन्नती करणे किरकोळ शिक्षा देणे ;

() मुख्याध्यापकांकडून अन्य कर्मचाऱ्यांना नैमित्तिक रजेशिवाय इतर रजा मंजूर करणे, शाळा प्रमुखाला व्यवस्थापकवर्गाकडून रजा मंजूर केली जाईल ;

() शाळेशी संबंधित असलेल्या बाबींवर व्यवस्थापकवर्गाला कळविणे.

. समन्वय समिती ही पुढील सदस्य मिळून बनेल, ते असे :-

() अध्यक्ष (किंवा व्यवस्थापकवर्गाच्या सदस्यांमधून अध्यक्षाचा प्रतिनिधी);

() त्याच व्यवस्थापकवर्गाकडून चालविण्यात येणाऱ्यापैकी प्रत्येक शाळेचा किंवा ज्या स्थानिक भागासाठी समन्वय समिती स्थापन करण्यात आली असेल त्या भागामधील शाळासमूहापैकी प्रत्येक शाळेचा प्रमुख ;

() शाळेच्या व्यवस्थापकवर्गांचे प्रतिनिधित्व करणारा, प्रत्येक शाळेचा किंवा शाळा समुहपैकी प्रत्येक शाळेचा सदस्य;

*परंतु असे की, नियामक मंडळाच्या अध्यक्षाला किंवा प्रकरणपरत्वे, नियामक मंडळाला, आपला प्रतिनिधी किंवा समन्वय समितीवर व्यवस्थापकवर्गाचे प्रतिनिधित्व करणारा शाळा समितीचा सदस्य एक वर्षानंतर बदलण्याचा हक्क राहील ;

*() जर एखाद्या सदस्य परवानगीशिवाय लागोपाठ तीन बैठकांना गैरहजर राहिला तर त्याची नामनियुक्ती रद्द होईल;

*() वरील () मधील सदस्यांपैकी व्यवस्थापकवर्गाने नामनियुक्ती केलेला सदस्य समन्वय समितीचा पदसिद्ध सदस्य राहील;

*() प्रत्येक वर्षात समन्वय समितीच्या कमीत कमी दोन बैठका होतील.

*. समन्वय समिती, सर्वसाधारणतः त्याच व्यवस्थापक वर्गाच्या नियंत्रणाखाली किंवा त्याच स्थानिक भागातील शाळा समूहाच्या नियंत्रणाखाली शाळांच्या कार्यामध्ये समन्वय साधील. शाळा समितीच्या निर्णयांचे अनुसमर्थन करण्याचा किंवा ते आपल्या शिफारशींसह त्या समितीकडे पुन्हा संदर्भित करण्याचा हक्क समन्वय समितीला असेल.

. शाळा समिती किंवा समन्वय समिती यांची मुदत व्यवस्थापक वर्गाच्या मुदतीबरोबरच समाप्त होईल.

. मुख्याध्यापक वगळता, शाळा, समितीचा किंवा समन्वय समितीचा कोणताही एकेकटा सदस्य शाळेचे अंतर्गत प्रशासन, शाळेची शिस्त आणि कर्मचाऱ्यांची कामे यामध्ये प्रत्यक्षपणे किंवा अप्रत्यक्षपणे हस्तक्षेप करणार नाही.


*अधिसूचना क्रमांक खाशान्या १०८३/१९४/माशि ३ कक्ष, दिनांक २० डिसेंबर १९८४ अन्वये सुधारल्याप्रमाणे

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र खाजगी शाळा कर्मचारी (सेवेच्या शर्ती) नियमावली, १९८१- व्याख्या

अनुसूची “ज” - कर्मचार्‍यांची कर्तव्ये - महाराष्ट्र खाजगी शाळा कर्मचारी (सेवेच्या शर्ती) नियमावली, १९८१

१६. रजा - महाराष्ट्र खाजगी शाळा कर्मचारी (सेवेच्या शर्ती) नियमावली, १९८१