२८. सेवेतून काढून टाकणे किंवा सेवा समाप्त करणे - महाराष्ट्र खाजगी शाळा कर्मचारी (सेवेच्या शर्ती) नियमावली, १९८१

२८सेवेतून काढून टाकणे किंवा सेवा समाप्त करणे

२८. सेवेतून काढून टाकणे किंवा सेवा समाप्त करणे - () परिवीक्षधीन कर्मचाऱ्याव्यतिरिक्त अन्य अस्थायी कर्मचाऱ्यांची सेवा, त्याला एका कॅलेंडर महिन्याची नोटीस दिल्यावर किंवा नोटिशीऐवजी एका महिन्यात वेतन (वेतन काही असल्यास भत्ते) देऊन, कोणतेही कारण देता, व्यस्थापक वर्गाला केव्हाही समाप्त करता येईल.

एखाद्या कर्मचाऱ्यास मोठी सुटी मिळण्याचा हक्क असेल त्याबाबतीत, मोठ्या सुटीत किंवा सुटीचा कोणताही भाग समाविष्ट होईल अशा कालावधीत किंवा मोठ्या सुटीनंतर एका महिन्याच्या आत नोटीस देण्यात येणार नाही.

*() . . . . . .. . . . . . . . . . . . . रद्द झाला.

*() . . . . . . . . . . . . . . . . . . . . रद्द झाला

() एप्रिल १९६६ पूर्वी माध्यमिक शाळेत अथवा अध्यापक विद्यालयात नियुक्ती झालेल्या ज्या स्थायी कर्मचाऱ्याने किंवा एप्रिल १९७९ पूर्वी प्राथमिक शाळेत नियुक्ती झालेल्या ज्या स्थायी कर्मचाऱ्यांनी अंशदायी भविष्यनिर्वाह निधी योजनेत राहण्याचा विकल्प स्वीकारला असेल अशा कर्मचाऱ्यास शासकीय रुग्णालयाच्या जिल्हा शल्य चिकित्सकाने किंवा अधिक्षकाने वैद्यकीयदृष्ट्या अपात्र ठरविल्यामुळे शाळेच्या सेवेतून मुक्त करावयाचे असेल तर, त्याला सेवेच्या प्रत्येक पूर्ण वर्षागणिक अर्ध्या महिन्याचा पगार (वेतन भत्ते) किंवा किमान तीन महिन्यांचा पगार (वेतन भत्ते यापैकी अधिक असेल तेवढ्या दराने उपदान) देण्यात येईल:

 परंतु, या पोट-नियमाखाली उपदान मिळणारा कर्मचारी शिवाय वरील पोट-नियम () मध्ये तरतूद केल्याप्रमाणे भरपाई मिळण्यास पात्र समजला जाणार नाही.

() कर्मचारी पुढीलपैकी कोणत्याही एका किंवा अधिक कारणांमुळे शिक्षा होण्यास पात्र ठरेल :-

() गैरवर्तणूक ;

() नैतिक अध:पात;

() कर्तव्यात बुद्धिपुरस्सर सतत हयगय;

या नियमाच्या प्रयोजनार्थ :-

* () "गैरवर्तणूक" यामध्ये पुढील गोष्टींचा समावेश होतो :-

(एक) या नियमद्वारे किंवा तदन्वये घालून दिलेल्या सेवेच्या अटी शर्ती यांचा भंग करणे, आणि

(दोन) आचार संहितेचा भंग करणे ; आणि

(तीन) तशाच स्वरूपाचे इतर कोणतेही कृत्य;

*() "नैतिक अध:पात" यामध्ये पुढील गोष्टींचा समावेश होतो :-

(एक) एखाद्या विद्यार्थी अगर विद्यार्थिनींशी अगर कर्मचारी महिलेशी वा पुरुषाशी अतिप्रसंग करणे अगर अनैतिक वर्तन करणे; आणि

(दोन) तशाच स्वरूपाचे इतर कोणतेही कृत्य ;

() "कर्तव्यात बुद्धीपुरस्सर हयगय" यात पुढील गोष्टींचा समावेश होतो :-

(एक) या नियमाद्वारे किंवा ************ विहित करण्यात आलेल्या कोणत्याही कर्तव्यापासून च्युत होणे किंवा कर्तव्य पार पाडण्यात कसूर करणे;

(दोन) पूर्व परवानगीशिवाय कामावर सतत गैरहजर राहणे; आणि

(तीन) तशाच स्वरूपाचे इतर कोणतेही कृत्य ;

() "अक्षमता" यात पुढील गोष्टींचा समावेश होतो :-

(एक) शैक्षणिक प्रगती करणे ज्ञान अद्यावत ठेवणे याबाबत वारंवार सूचना दिलेल्या असताना देखील त्यासाठी सोयी उपलब्ध असतानासुद्धा त्या कामी कसूर करणे;

(दोन) आटोक्याबाहेरील कारणे नसताना ठरवून दिलेल्या पाठयक्रम ठराविक कालावधीमध्ये शिकवून पूर्ण करणे; आणि

(तीन) तशाच स्वरूपाचे इतर कोणतेही कृत्य.


*अधिसूचना क्रमांक खाशान्या १०८३/१९४/माशि ३ कक्ष, दिनांक २० डिसेंबर १९८४ अन्वये सुधारल्याप्रमाणे

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र खाजगी शाळा कर्मचारी (सेवेच्या शर्ती) नियमावली, १९८१- व्याख्या

अनुसूची “ज” - कर्मचार्‍यांची कर्तव्ये - महाराष्ट्र खाजगी शाळा कर्मचारी (सेवेच्या शर्ती) नियमावली, १९८१

१६. रजा - महाराष्ट्र खाजगी शाळा कर्मचारी (सेवेच्या शर्ती) नियमावली, १९८१