अनुसूची "फ" - महाराष्ट्र खाजगी शाळा कर्मचारी (सेवेच्या शर्ती) नियमावली, १९८१

 

अनुसूची "फ"

(नियम १२ पहा)

१. प्राथमिक शाळांमधील शिक्षकांच्या ज्येष्ठता ठरविण्याबाबतची मार्गदर्शक कर्तव्ये :-

प्राथमिक शाळांमधील प्राथमिक शाळा शिक्षकांची ज्येष्ठता त्यांच्या सेवेत रुजू होण्याच्या तारखेवर आणि स्थानापन्नतेच्या अखंड कालावधीवर आधारित राहील.

२. माध्यमिक शाळा, अध्यापक विद्यालयाचे आणि माध्यमिक शाळा आणि वरिष्ठ महाविद्यालयांशी संलग्न असलेले कनिष्ठ महाविद्यालयीन वर्ग यातील शिक्षकांची ज्येष्ठता ठरविण्याबाबतची मार्गदर्शक तत्त्वे :-

माध्यमिक शाळा, अध्यापक विद्यालये आणि माध्यमिक शाळांशी संलग्न असलेले कनिष्ठ महाविद्यालयातील वर्ग यातील शिक्षकांची ज्येष्ठता ठरविण्याकरिता पुढीलप्रमाणे शिक्षकांचे प्रवर्ग पाडण्यात यावेत :-

प्रवर्ग "अ" : ५०० हून अधिक विद्यार्थी असलेल्या माध्यमिक शाळांचे मुख्याध्यापक आणि चारपेक्षा जास्त तुकड्या असणाऱ्या अध्यापक विद्यालयांचे प्राचार्य यांच्या बाबतीत, त्याच्या आपापल्या पदांवरील नियुक्ती दिनांकाच्या आधारे.

प्रवर्ग "ब" : ५०० आणि त्याहून कमी विद्यार्थी असलेल्या माध्यमिक शाळाचे मुख्यध्यापक, चार किंवा त्याहून कमी तुकड्या असलेल्या अध्यापक शिक्षणशास्त्र विद्यालयाचे प्राचार्य आणि २० हून अधिक वर्ग असलेल्या माध्यमिक शाळांचे उपमुख्याध्यापक यांच्या बाबतीत त्यांच्या आपापल्या पदावरील नियुक्ती दिनांकाच्या आधारे.

प्रवर्ग "क" : पुढील अर्हता धारण करणारे :-

एम. ए. /एम. एससी. /एम. कॉम., बी.टी./ बी. एड., किंवा तत्सम; किंवा

बी. ए. / बीएससी./बी.कॉम., बी.टी. /बी. एड., किंवा तत्सम; किंवा

बी. ए. /बी. एससी./बी.कॉम., डीप.टी. (दोन वर्षाचा जुना पाठयक्रम); किंवा

बी. ए. /बी. एससी./बी.कॉम.,एस. टी. सी. / डीप. एड. /डीपटी. (एक वर्षाचा पाठयक्रम)

एस. टी . सी. इत्यादी झाल्यानंतर १० वर्षाच्या सेवेसह

प्रवर्ग "ड" पुढील अर्हता धारण करणार :--

बी. ए./बी. एससी./बी. कॉम., एस. टी. सी./डीप., एड., (एक वर्षाचा पाठयक्रम)किंवा तत्सम.

प्रवर्ग "ई" : पुढील अर्हता धारण करणारे :--

एस. एस. सी., एस. टी. सी./डीप. एड./डीप. टी. (एक वर्षाचा पाठयक्रम) किंवा तत्सम.

प्रवर्ग "फ" : अप्रशिक्षित पदवीधर किंवा तत्सम अर्हताधारक.

प्रवर्ग "ग" : अप्रशिक्षित मॅट्रिक झालेले किंवा तत्सम अर्हताधारक.

प्रवर्ग "ह" : प्रवर्ग "अ" ते "ग" यांमध्ये उल्लेखिलेल्या शिक्षकांव्यतिरिक्त इतर सर्व शिक्षक.

टीप (१) - १ ऑक्टोबर १९७० रोजी किंवा त्यानंतर नियुक्त करण्यात आलेल्या एस.टी.सी., टी. डी., ज्युनि पी.टी. सी., डीप. एड. (एस. एस. सी. नंतर एक वर्षाचा पाठयक्रम) अर्हता असणाऱ्या शिक्षकांना "क", "ड" व "ई" प्रवर्गाच्या प्रयोजनार्थ अप्रशिक्षित म्हणून समजण्यात येईल आणि त्यांची ज्येष्ठता "फ" किंवा प्रकरणपरत्वे "ग" या प्रवर्गात निश्चित करण्यात येईल.

टीप (२) - एस. एस.सी. परीक्षेनंतर दोन वर्षांनी ज्या प्राप्त करता येतात अशा पुढील प्रशिक्षणविषयक अर्हता या ज्येष्ठतेच्या प्रयोजनासाठी १ ऑक्टोबर १९७९ नंतर हि प्रशिक्षणविषयक अर्हता म्हणून समजण्यात येतील:-

(१) दि. एड. (२ वर्षाचा);

(२) टी.डी. (मुंबई विद्यापीठ);

(३) डीप. एड. (नागपूर विद्यापीठ).

टीप (३) - ज्यांची त्याच त्या प्रवर्गातील अखंड सेवेतील नियुक्तीची तारिख सारखीच आहे अशा शिक्षकांच्या बाबतीत, वयाने वरिष्ठ असलेला शिक्षक ज्येष्ठ म्हणून समजण्यात येईल.

टीप (४) - वर नमूद केलेले प्रवर्ग हे ज्येष्ठताश्रेणी दर्शवित असून ते उतरत्या क्रमाने नमूद करण्यात आलेले आहेत.

टीप (५) - व्यवस्थापक वर्ग एकापेक्षा अधिक शाळा चालवीत असेल त्या बाबतीत आणि अशा शाळांपैकी एका किंवा अधिक शाळांना कनिष्ठ महाविद्यालयाने वर्ग संलग्न करण्यात आलेले असतील किंवा संलग्न करण्यात आलेले नसतील त्याबाबतीत, विशिष्ट संवर्गाची ज्येष्ठता सूची हि सर्व शाळांच्या (कोणतीही रात्र शाळा असल्यास, त्या व्यतिरिक्त), किंवा त्या व्यवस्थापनाच्या शाळांना संलग्न करण्यात आलेल्या कनिष्ठ महाविद्यालयाच्या वर्गामध्ये सेवा करणाऱ्या त्या संवर्गातील सर्व व्यक्तींची ज्येष्ठता सूची एकत्रित असेल. ज्या व्यक्तींना अशा कोणत्याही शाळेच्या किंवा कनिष्ठ महाविद्यालयाच्या वर्गात एक विशिष्ट संवर्गात केलेली एकूण अखंड सेवा, ज्येष्ठतेच्या प्रयोजनार्थ आणि पदोन्नतीच्या प्रयोजनार्थ विचारात घेण्यात येईल.

टीप (६) - रात्र शाळेमधील शिक्षक वर्गाची ज्येष्ठतासूची स्वतंत्रपणे ठेवण्यात येईल.

टीप (७) - एकूण शाळांपैकी एक शाळा ही मुलींची शाळा असेल आणि व्यवस्थापक वर्ग त्या शाळेतील शिक्षकांची वेगळी ज्येष्ठतासूची ठेवू इच्छित असेल त्याबाबतीत, व्यवस्थापक वर्ग त्यानुसार ठराव करील आणि त्या ठरावाची एक प्रत शिक्षण अधिकाऱ्याकडे किंवा, प्रकरणपरत्वे, शिक्षण उपसंचालकाकडे पाठवील तथापि, असा निर्णय भविष्यकाळात कोणत्याही वेळी रद्द करता येणार नाही. तसेच, व्यवस्थापक वर्गाने असा निर्णय घेतल्यावर शिक्षकांच्या पदांवर नियुक्त करावयाच्या उमेदवारांना, त्याच व्यवस्थापक वर्गाकडून चालविल्या जाणाऱ्या इतर शाळांमधील बढतीच्या पदांवर त्यांचा कोणताही हक्क असणार नाही. या गोष्टीची स्पष्ट जाणीव द्यावी लागेल; अशा शाळेतील शिक्षकवर्गातील कर्मचाऱ्यांच्या सेवा अन्य कोणत्याही शाळेकडे किंवा अन्य शाळेतील शिक्षकांच्या सेवा या शाळेकडे कायम स्वरूपात बदली करता येणार नाहीत. अशा शाळेतील शिक्षकांच्या सेवा या शाळेकडे कायम स्वरूपात बदली करता येणार नाहीत. अशा शाळेतील शिक्षकवर्गातील कर्मचाऱ्याच्या सेवांची तात्पुरती बदली देखील शिक्षण अधिकारी किंवा प्रकरणपरत्वे, शिक्षण उपसंचालक यांच्या पूर्वपरवानगीचे करण्यात

टीप (८) - व्यवस्थापक वर्ग एक किंवा अधिक माध्यमिक शाळा आणि अध्यापक विद्यालय चालवीत असेल त्याबातीत, अध्यापक विद्यालयातील प्रशिक्षित पदवीधर शिक्षक हे उच्च वेतनश्रेणीत असेल तरीही, या अनुसूचित परिच्छेद २ मध्ये घालून दिलेल्या मार्गदर्शक तत्वांनुसार, अशा शाळा आणि अध्यापक विद्यालये या दोन्ही प्रकरणांच्या संस्थेतील सर्व शिक्षकांची एक संयुक्त ज्येष्ठतासूची ठेवण्यात येईल. ही ज्येष्ठता सूची माध्यमिक शाळेच्या (शाळांच्या) मुख्याध्यापकांच्या (मुख्याध्यापकांच्या) व उपमुख्याध्यापकाच्या (उपमुख्याध्यापकांच्या) आणि अध्यापक विद्यालयाच्या (विद्यालयांच्या) प्राचार्याच्या (प्राचार्यांच्या) पदांवर बढती मिळण्याच्या प्रयोजनासाठी आधारभूत असेल.

टीप (९) - स्थायी करण्यात आल्या नंतर परंतु १ जुलै १९७० पूर्वी ज्यांच्या सेवेत एकदा किंवा अनेकदा खंड (प्रत्यक्ष खंड किंवा अन्यप्रकारे खंड उदाहरणार्थ त्याच व्यवस्थापक वर्गाच्या नियंत्रणाखाली पूर्ण सेवेच्या दोन कालावधीमध्ये अंशकालिक सेवा करण्यामुळे झालेला खंड) पडलेला असेल आणि ज्यांनी त्या खंड कालावधीनंतर संवर्ग बदललेला नसेल अशा स्थायी शिक्षकांच्या बाबतीत, व्यवस्थापक वर्ग जास्तीतजास्त तीन वर्षापर्यंतचे सेवाखंड त्यातील अनुपस्थितीचा कालावधी पूर्वलक्षी प्रभावासह परिवर्तित करून, ते ज्येष्ठतेच्या प्रयोजनासाठी, क्षमापित करील. असा कालावधी तीन वर्षापेक्षा अधिक होत असेल आणि शिक्षकांनी जर, त्या कालावधीत अंशकालिक तत्त्वावर सेवा केलेली असेल तर, अंशकालिक सेवेच्या एकूण कालावधीच्या निम्म्याइतका कालावधी केवळ ज्येष्ठतेच्या प्रयोजनासाठी व्यवस्थापकवर्ग, जमेस धरील अशा प्रत्येक प्रकारच्या खंडांची एकूण संख्या शिक्षकाच्या सेवाकालात तीनपेक्षा अधिक असता कामा नये आणि अशा प्रकारे मिळालेल्या ज्येष्ठतेमुळे शिक्षकाला पूर्वलक्षी प्रभावाने पदोन्नती मिळण्याचा हक्क प्राप्त होणार नाही.

टीप (१०) - जे ३१ डिसेंबर १९६५ रोजी सेवेत स्थायी झालेले होते आणि "मध्यप्रदेश माध्यमिक शिक्षण अधिनियम, १९५१" च्या तरतुद आणि त्याखाली केलेले नियम यानुसार ज्यांची ज्येष्ठता निश्चित करण्यात आली होती अशा विदर्भ प्रदेशातील माध्यमिक शाळा शिक्षकांच्या ज्येष्ठतेला बाधा येणार नाही, अशा शक्षकांपैकी कोणत्याही शिक्षकाने आपली अर्हता वाढल्यास आणि त्यायोगे तो वरच्या प्रवर्गात गेल्यास, ज्येष्ठतेबाबतची ही मार्गदर्शक तत्त्वे, वरच्या प्रवर्गात त्याची ज्येष्ठता निश्चित करण्याचा जेथवर संबंध आहे तेथवर लागू होतील.

३. शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची ज्येष्ठता ठरविण्याबाबतची मार्गदर्शक तत्वे :-

लिपिक - पदोन्नतीच्या श्रेणीतील लिपिकवर्गीय व पर्यवेक्षकीय पदांमध्ये कनिष्ठ लिपिक, वरिष्ठ लिपिक, प्रमुख लिपिक आणि अधीक्षक यांचा समावेश होतो. शाळेतील किंवा शाळांमधील कनिष्ठ लिपिकांची ज्येष्ठता, संबंधित व्यक्तींच्या नियुक्तीच्या तारखेच्या आधारे निश्चित्त करण्यात येईल. वरिष्ठ लिपिकाचे पद ज्येष्ठतम कनिष्ठ लिपिकाला पदोन्नती देऊन भरण्यात येईल. प्रमुख लिपिक आणि अधीक्षक ही पदे अनुक्रमे ज्येष्ठतम वरिष्ठ लिपिक आणि ज्येष्ठतम प्रमुख लिपिक यांना पदोन्नती देऊन भरण्यात येतील.

ग्रंथपाल - व्यवस्थापकवर्ग केवळ एकच शाळा चालवीत असेल त्याबाबतीत, ग्रंथपालाचे पद हे एकच असल्याने त्याची ज्येष्ठतासूची ठेवण्याची आवश्यकता नाही. व्यवस्थापक वर्ग एकापेक्षा अधिक शाळा चालवित असेल त्याबाबतीत ग्रंथपालांची ज्येष्ठतासूची नियुक्तीच्या तारखेच्या आधारे ठेवण्यात येईल. ग्रंथपाल अन्य कोणत्याही पदावर बढती मिळण्यास पात्र समजले जाणार नाहीत.

प्रयोगशाळा सहायक - प्रयोगशाळा सहाय्यकांची ज्येष्ठातांसूची नियुक्तीच्या तारखेच्या आधारे ठेवण्यात येईल. ही पदे धारण करणाऱ्या व्यक्ती, अन्य कोणत्याही पदावर बढती मिळण्यास पात्र समजल्या जाणार नाहीत.

निम्नश्रेणी कर्मचारी वर्ग - प्रयोशाळा परिचर, नाईक, तेलवाला (ऑइलमन), यंत्र परिचर, चपराशी, पहारेकरी, चौकीदार, सफाईगार, स्त्री-सेवक (कॉल वूमन), कामाठी, परिचर, प्रयोगशाळा, हमाल, उदवाहन चालक आणि असा अन्य निम्नश्रेणी कर्मचारीवर्ग यांची एक संयुक्त ज्येष्ठतासूची त्यांच्या, नियुक्तीच्या तारखांच्या आधारे ठेवण्यात येईल. निम्नश्रेणी कर्मचारी वर्गापैकी कोणत्याही व्यक्तीने एकत्र, प्रयोगशाळा सहायक किंवा लिपिक या पदासाठी विहित करण्यात आल्याप्रमाणे, त्याची अर्हता वाढल्यास, अशा कर्मचाऱ्याला उक्त पद भरतेवेळी ज्येष्ठता सूचीमधील त्याच्या क्रमानुसार प्राधान्य देण्यात येईल.

टीप (१) - व्यवस्थापक वर्ग एकापेक्षा अधिक शाळा चालवित असेल याबाबतीत, एका विशिष्ट संवर्गाची ज्येष्ठता सूचीही त्या व्यवस्थापनाच्या सर्व शाळांमध्ये काम करणाऱ्या त्या संवर्गातील सर्व व्यक्तींची मिळून संयुक्त ज्येष्ठतेच्या प्रयोजनासाठी विचारात घेण्यात येईल. अशा एकत्र ज्येष्ठता सूचीच्या आधारे विविध पदोन्नती देण्यात येतील.

टीप (२) - एकाच संवर्गातील दोन किंवा अधिक व्यक्तींची नियुक्तीची तारीख एकच असेल तर वयाने वरिष्ठ असलेली व्यक्ती म्हणून समजली जाईल.

टीप (३) - पदोन्नतीच्या प्रयोजनासाठी, एकाच व्यवस्थापकवर्गाकडून चालविल्या जाणाऱ्या सर्व शाळांमधून रिक्त होणार पदांचा एकत्रित विचार केला जाईल.

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र खाजगी शाळा कर्मचारी (सेवेच्या शर्ती) नियमावली, १९८१- व्याख्या

अनुसूची “ज” - कर्मचार्‍यांची कर्तव्ये - महाराष्ट्र खाजगी शाळा कर्मचारी (सेवेच्या शर्ती) नियमावली, १९८१

१६. रजा - महाराष्ट्र खाजगी शाळा कर्मचारी (सेवेच्या शर्ती) नियमावली, १९८१