३२. किरकोळ शिक्षा लादण्याची पद्धती - महाराष्ट्र खाजगी शाळा कर्मचारी (सेवेच्या शर्ती) नियमावली, १९८१

३२. किरकोळ शिक्षा लादण्याची पद्धती

३२. किरकोळ शिक्षा लादण्याची पद्धती - नेमून दिलेली कामे निकालात काढण्यास विलंब लावणे, कर्तव्यात हयगय करणे, शिरजोरपणा करणे, वरिष्ठांच्या आदेशाचे पालन न करणे व इतर गैरवर्तणूक किंवा गैरवागणूक यासारख्या कर्मचाऱ्यांनी केलेल्या प्रमादांबद्दल किरकोळ शिक्षा लादता येतील. या नियमात अभिप्रेत असलेल्या कोणत्याही शिक्षेचा अंतिम आदेश देण्यापूर्वी कर्मचाऱ्याला, त्याने केलेले प्रसाद किंवा, आकृती (Omissions) याबद्दल त्याला शिक्षा का देण्यात येऊ नये याविषयी सबळ पुरेशी कारणे दोन आठवड्याच्या आत स्पष्ट करण्याची लेखी संधी देण्यात येईल. त्याला कोणतीही शिक्षा द्यावयाची झाल्यास, तिचे स्वरूप व परिणाम हे, कर्मचाऱ्याने कोणतेही स्पष्टीकरण दिले असल्यास त्या स्पष्टीकरणावर विचार केल्यानंतर, ठरवण्यात येईल.

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र खाजगी शाळा कर्मचारी (सेवेच्या शर्ती) नियमावली, १९८१- व्याख्या

अनुसूची “ज” - कर्मचार्‍यांची कर्तव्ये - महाराष्ट्र खाजगी शाळा कर्मचारी (सेवेच्या शर्ती) नियमावली, १९८१

१६. रजा - महाराष्ट्र खाजगी शाळा कर्मचारी (सेवेच्या शर्ती) नियमावली, १९८१