४१ बदल्या - महाराष्ट्र खाजगी शाळा कर्मचारी (सेवेच्या शर्ती) नियमावली, १९८१

४१ बदल्या

*४१ बदल्या - () या नियमातील तरतुदींच्या अधिनतेने, प्रशासकीय कारणासाठी, बढतीमुळे किंवा संबंधित कर्मचाऱ्यांच्या विनंतीवरून केलेल्या बदल्या वगळता, एरव्ही जर तसे करणे प्रशासकीयदृष्ट्या सोयीचे असेल तर, एकाहून अधिक शाळा चालविणारा व्यवस्थापकवर्ग आपल्या कोणत्याही कर्मचाऱ्याची बदली करणार नाही.

() अपवादात्मक प्रकरणे वगळता, अशा बदल्या करणे लेखी नमूद केल्याशिवाय सत्राच्या मध्येच केल्या जाणार नाहीत.

() बदल्यामुळे संबंधित कर्मचाऱ्याच्या वेतन किंवा वेतनश्रेणीवर प्रतिकूल परिणाम होणार नाही आणि अशा बदल्यांची परिणती त्यांना अनुज्ञेय असलेल्या निवृत्तीवेतनाच्या लाभात घट होण्याची होणार नाही अशी दक्षता व्यवस्थापकवर्ग घेईल.

() तुलनात्मक दर्जाच्या शासकीय कर्मचाऱ्यांना लागू असणाऱ्या दराप्रमाणे प्रवासभत्त्यावर दैनिक भत्त्यावर काही खर्च झाल्यास, तो खर्च व्यवस्थापक वर्ग स्वतः सोशील. जर कर्मचाऱ्यांच्या विनंतीवरून बदली केली असेल तर हा खर्च संबंधित कर्मचारी सोशल. परंतु असे की, बदलीमुळे मुख्यालयामध्ये बदल होत असेल तेव्हा कर्मचाऱ्याला द्यावयाचा पदग्रहण अवधि (रविवार वगळून) सहा दिवस आणि प्रत्यक्ष प्रवासाचे दिवस एवढ्या पर्यंत मर्यादित राहील. या मर्यादेच्या अधीनतेने, पदग्रहण अवधिचा कालावधी सर्व प्रयोजनाकरिता "कर्तव्य" कालावधी समजला जाईल. परंतु, असे कि, जर बदली मोठ्या सुट्टीच्या कालावधीत अमलात आली तर कर्मचाऱ्याला पदग्रहण अवधीचा हक्क राहणार नाही.

() एक माध्यमिक शाळा किंवा अनेक माध्यमिक शाळा आणि कनिष्ठ अध्यापक महाविद्यालय चालविणाऱ्या व्यवस्थापकवर्गाच्या बाबतीत :-

() अध्यापक विद्यालयातील शिक्षकांच्या त्यांच्या इच्छेविरुद्ध माध्यमिक शाळेमध्ये बदल्या केल्या जाणार नाहीत. मात्र, माध्यमिक शाळांमध्ये रिक्त पदांची उपलब्धता असल्यास, कर्मचाऱ्यांच्या स्वतःच्या विनंतीनुसार अशा बदल्या करता येतील. अशा बदलीच्या प्रसंगी, अध्यापक विद्यालयात शिक्षकाला मिळणाऱ्या वेतनाला संरक्षण दिले जाणार नाही. त्याने जेवढ्या कालावधीत अध्यापक विद्यालयात सेवा केली असेल तेवढ्या कालावधीची सेवा त्याने माध्यमिक शाळेमध्ये केली आहे असे समजले जाईल. आणि तो माध्यमिक शाळेमध्ये रुजू होईल त्यावेळी त्याचे वेतन त्याप्रमाणे पुनर्निश्चित केले जाईल.

() माध्यमिक शाळांमधील शिक्षकांच्या त्यांच्या इच्छेविरुद्ध अध्यापक विद्यालयामध्ये बदल्या केल्या जाणार नाहीत. मात्र, कर्मचाऱ्याच्या स्वतःच्या विनंतीनुसार अशा बदल्या पुढील शर्तीवर करता येतील, त्या अशा, -

(एक) अध्यापक विद्यालयामध्ये रिक्त उपलब्ध असली पाहिजेत ;

(दोन) एकत्रित ज्येष्ठता सूचीमधील संबंधित कर्मचाऱ्याचे स्थान तेच ठेवले जाईल; आणि

(तीन) त्यांच्या सध्याच्या वेतनाएवढ्या वेतनाच्या टप्प्यावर किंवा अध्यापक विद्यालयाच्या वेतनश्रेणीमधील सुरुवातीच्या वेतनावर, यापैकी जे अन्य असेल त्यावर, त्यांचे अध्यापक विद्यालयातील वेतन निश्चित केले जाईल.

*अधिसूचना क्रमांक खाशान्या १०८३/१९४/माशि ३ कक्ष, दिनांक २० डिसेंबर १९८४ अन्वये सुधारल्याप्रमाणे

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र खाजगी शाळा कर्मचारी (सेवेच्या शर्ती) नियमावली, १९८१- व्याख्या

अनुसूची “ज” - कर्मचार्‍यांची कर्तव्ये - महाराष्ट्र खाजगी शाळा कर्मचारी (सेवेच्या शर्ती) नियमावली, १९८१

१६. रजा - महाराष्ट्र खाजगी शाळा कर्मचारी (सेवेच्या शर्ती) नियमावली, १९८१