अनुसूची "ब" - (एक) प्राथमिक शिक्षकांच्या अर्हता - महाराष्ट्र खाजगी शाळा कर्मचारी (सेवेच्या शर्ती) नियमावली, १९८१

 अनुसूची "ब"

[नियम २(१) (ज) आणि ६ पहा]

(एक) प्राथमिक शिक्षकांच्या अर्हता


१. प्राथमिक शाळांच्या शिक्षकांची नियुक्ती (विशेष शिक्षक-चित्रकला-शिक्षक वगळता) जे; एस. एस. सी. ची परीक्षा किंवा मॅट्रिकची परीक्षा किंवा लोकशाला परीक्षा किंवा शासनाने तत्सम परीक्षा म्हणून मान्यता दिलेली इतर कोणतीही परीक्षा आणि प्राथमिक शिक्षक प्रमाणपत्र परीक्षा, शिक्षण पदविका परीक्षा किंवा (दोन वर्षाच्या कालावधीची पूर्वप्राथमिक) शिक्षण पदविका परीक्षा उत्तीर्ण झाले असतील अशा उमेदवारांमधून नामनिर्देशनाद्वारे करण्यात येईल.

टिप - पूर्ववर्ती उपबंधांमध्ये काहीही अंतर्भूत असेल तरी, शिक्षण पदविका (दोन वर्षाच्या कालावधीची पूर्व प्राथमिक) धारण करणारी व्यक्ती केवळ पहिली ते चौथीच्या वर्गाना शिकवण्यास पात्र असेल -

(अ ) हे नियम अमलात येण्यापूर्वी, त्यात्या वेळी अमलात असलेल्या सेवाप्रवेश नियमास अनुसरून ज्यांना सेवाप्रवेश देण्यात आला होता व त्यानंतर रिकाम्या जागांच्या अभावी ज्यांना कार्यमुक्त करण्यात आले होते अशा उमेदवारांना पुनर्नियुक्तीसाठी पात्र समजण्यात येईल.

(ब) इतर गोष्टी समान असल्यास,-

(एक) इंग्रजी, गणित व विज्ञान हे विषय किंवा यापैकी कोणतेही दोन विषय घेऊन माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा (एस. एस. सी.) किंवा तत्सम परीक्षा उत्तीर्ण झालेले उमेदवार, आणि

(दोन) संक्षिप्त पाठयक्रम घेऊन बाब (एक) मध्ये नमूद केलेल्या अर्हता ज्यांनी प्राप्त केलेल्या आहेत अशा महिला उमेदवार यांना अग्रक्रम देण्यात येईल.

२. प्राथमिक शाळांतील विशेष शिक्षकाच्या (चित्रकला शिक्षक) पदावरील नियुक्ती, जे उमेदवार माध्यमिक शाळा प्रमाणपत्र (एस. एस. सी.) परीक्षा उत्तीर्ण झाले आहेत व कला शिक्षकाची पदविका (आर्ट टीचर्स डिप्लोमा) किंवा चित्रकला शिक्षकाचे प्रमाणपत्र (ड्रॉईंग टीचर्स सर्टिफिकेट) किंवा चित्रकला मास्टरचे प्रमाणपत्र (ड्रॉईंग मास्टर सर्टिफिकेट) धारण करीत आहेत अशा उमेदवारांमधून नामनिर्देशनाद्वारे करण्यात येईल

३. जिल्हा परिषद किंवा नगरपालिका शिक्षण मंडळ किंवा महानगरपालिका किंवा नगरपालिका यांच्या सेवेतील किंवा खाजगी प्राथमिक शाळांतील सेवेतील ज्या प्राथमिक शिक्षकांची प्राथमिक शिक्षक, म्हणून प्रथम नियुक्ती केल्याची तारीख १५ ऑक्टोबर १९६६ अशी असेल किंवा तत्पूर्वीची एखादी तारीख असेल अशा प्राथमिक शिक्षकांना माध्यमिक शाळा प्रमाणपत्र आणि प्रशिक्षण अर्हता संपादन करण्याबाबत सूट देण्यात आली आहे.

४. ३० जून १९७२ पूर्वी सेवाप्रविष्ट झालेल्या प्राथमिक शक्षकांना व त्यांच्या नियुक्तीच्या वेळी अमलात असलेल्या नियमांनुसार ज्याच्याकडे शैक्षणिक व प्रशिक्षणविषयक अर्हता आहेत अशा प्राथमिक शिक्षकांना माध्यमिक शाळा प्रमाणपत्र व शिक्षण पदविका या अर्हता मधून सूट देण्यात आलेली आहे. ३० जून १९७२ नंतर ज्यांना सेवाप्रवेश देण्यात आला आहे व ज्यांच्याकडे माध्यमिक शाळा प्रमाणपत्र व प्रशिक्षण या अर्हता नाहीत अशा शिक्षकांना त्या अर्हता जून १९८५ पूर्वी संपादन केल्या पाहिजेत. जून १९८५ पूर्वी या अर्हता संपादन न केल्यास ते, सेवासमाप्तीस पात्र ठरतील.

५. माध्यमिक शाळा प्रमाणपत्र (एस. एस.सी.) आणि एस. ती. सी. किंवा टी. डी. किंवा डी. टी. (एक वर्ष) किंवा डिप्लोमा एन एज्युकेशन (एका वर्षाचा) या अर्हता असणाऱ्या ज्या प्राथमिक शाळा शिक्षकांना दिनांक ३० सप्टेंबर १९७० रोजी किंवा त्यापूर्वी प्राथमिक शाळेत नियुक्त करण्यात आले असेल असे शिक्षक प्रशिक्षत असल्याचे समजण्यात येईल व प्रशिक्षित एस. एस. सी. शिक्षकांना जे वेतनमान मिळते ते वेतनमान मिळण्यास पात्र असल्याचे समजण्यात येईल.

(दोन) माध्यमिक शाळा व अध्यापक विद्यालयातील प्रशिक्षित शिक्षकांच्या अर्हता

(१) स्नातक शिक्षकांसाठी - (एक) अध्यापनातील किंवा शिक्षणशास्त्रांची कोणत्याही सांविधिक विद्यापीठाची स्नातक हि पदवी किंवा शासनाने तत्सम म्हणून मान्यता दिलेली अर्हता;

*(दोन) कोणत्याही सांविधिक विद्यापीठाची अध्यापन पदविका (टिचिंग डिप्लोमा) धारण करणाऱ्या एखाद्या व्यक्तीची पहिली नियुक्ती (१ ऑक्टोबर १९७० पूर्वी) करण्यात आली असेल आणि अशी व्यक्ती त्या दिनांकानंतर सेवाखंडाशिवाय आगर सेवाखंडासहित शिक्षक, म्हणून सेवा करीत असेल तर, अशी पदविका;

*(तीन) महाराष्ट्र राज्याच्या शिक्षण विभागाचे माध्यमिक अध्यापक प्रमाणपत्र (सेकंडरी टिचर्स सर्टिफिकेट) धारण करणाऱ्या एखाद्या व्यक्तीची पहिली नियुक्ती (१ ऑक्टोबर १९७०) पूर्वी करण्यात आली असेल तर, आणि अशी व्यक्ती त्या दिनांकानंतर सेवाखंडाशिवाय अगर सेवाखंडासहित, शिक्षक म्हणून सेवा करीत असेल तर, असे प्रमाणपत्र;

(चार) स्नातक मूलोद्योग प्रशिक्षण केंद्राची (ग्रॅज्युएट्स बेसिक ट्रेनिग सेंटर्स) शिक्षक शास्त्रातील पदविका;

*(पाच) शारीरिक शिक्षणातील पदविका किंवा शासनाने तत्सम म्हणून मान्यता दिलेली अर्हता किंवा महाराष्ट्र शासनाचा फिजिकल एज्युकेशन या विषयातील हायत डिप्लोमा (कार्यपद्धती विषयातील एक विषय म्हणून शारीरिक शिक्षण), किंवा शारीरिक शिक्षण व या विषयातील स्नातक (बी. पी. एड.) (मराठवाडा विद्यापीठ) किंवा शारीरिक शिक्षण व या विषयातील स्नातक (बी.पी.एड.) (शिवाजी विद्यापीठ) किंवा शिक्षणशास्त्र विषयातील स्नातक (बी. एड.) (शारीरिक शिक्षण) (पुणे विद्यापीठ) किंवा शिक्षणशास्त्र विषयातील स्नातक (बी. एड.) (शारीरिक शिक्षण) (मुंबई विद्यापीठ) किंवा शारीरिक शिक्षण या विषयातील स्नातक (बी.पी.एड.) (नागपूर विद्यापीठ), किंवा अमरावतीच्या हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाने दिलेली शारीरिक शिक्षण, संस्कृती व मनोरंजन यामधील पदविका (डिप्लोमा इन फिजिकल एज्युकेशन, कल्चर व रिक्रिएशन) किंवा;

(सहा) शासन किंवा आंतर-विद्यापीठ मंडळ वरीलपैकी कोणत्याही अर्हतेसमान असलेली म्हणून मंजूर करील अशी कोणतीही इतर पदवी, पदविका किंवा प्रमाणपत्र

(२) उपस्नातक शिक्षकांसाठी - (एक) माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षेनंतर दोन वर्षांनी देण्यात येणारी नागपूर किंवा मुंबई विद्यापीठाची शिक्षण शास्त्रातील पदविका (डिप्लोमा इन एज्युकेशन).

*(दोन) महाराष्ट्र राज्याच्या शिक्षण विभागाचे माध्यमिक शिक्षण प्रमाणपत्र (सेकंडरी टिचर्स सर्टिफिकेट) किंवा कोणत्याही सांविधिक विद्यापीठाची शिक्षण पदविका (टिचर्स डिप्लोमा) धारण करणाऱ्या व्यक्तीची पहिली नियुक्ती जर १ ऑक्टोबर १९७० पूर्वी झाली असेल आणि अशी व्यक्ती त्या दिनांकानंतर सेवाखंडाशिवाय अगर सेवाखंडासहित शिक्षण म्हणून सेवा करीत असेल तर, असे प्रमाणपत्र किंवा अशी पदविका;

*(तीन) शासनाने मान्यता दिलेले शारीरिक शिक्षणातील प्रमाणपत्र धारण करणाऱ्या व्यक्तीने जर ते प्रमाणपत्र ३१ मे १९७१ पूर्वी प्राप्त केले असेल आणि जर ती व्यक्ती २० सप्टेंबर १९७८ रोजी अगर तत्पूर्वी नियुक्ती झाली असेल तर, असे प्रमाणपत्र;

(चार) शासनाने दिलेली (प्राथमिक) शिक्षणशास्त्रातील पदविका; किंवा

(पाच) शासनाने किंवा आंतरविद्यापीठ मंडळाने मान्यता दिलेली कोणतीही इतर तत्सम पदविका किंवा प्रमाणपत्र.

(३) चित्रकला शिक्षकांसाठी - चित्रकला शिक्षण (ड्रॉईंग टिचर) प्रमाणपत्र किंवा चित्रकला मास्टर (ड्रॉईंग मास्टर) प्रमाणपत्र किंवा कला शिक्षण (आर्ट टिचर) पदविका किंवा कला मास्टर (आर्ट मास्टर) पदविका.

(४) हस्तकला शिक्षकांसाठी (क्राफ्ट टिचर) - तंत्र शिक्षण संचालनालय चालवीत असलेला हस्तकलेचा विशेष पाठयक्रम किंवा शासनाने मान्यता दिलेला किमान सहा महिने मुदतीचा इतर कोणताही तत्सम पाठयक्रम पूर्ण केल्याबद्दलचे प्रमाणपत्र.

(५) भाषा शिक्षकांसाठी (अरबी, हिंदी, पर्शियन, संस्कृत इत्यादी) - स्नातक शिक्षकांसाठी शासन किंवा आंतरविद्यापीठ मंडळबाब (एक) खाली निर्देशिलेल्या व्यावसायिक अर्हता, सक्षम अर्हता म्हणून मंजूर करील अशी कोणतीही पदवी, पदविका किंवा प्रमाणपत्र.

*टीप (१) - १ जून १९६३ रोजी सेवेत असलेल्या व्यक्तींनी धारण केलेल्या पदांसाठी शासनाने ज्या अर्हता मान्य केल्या असतील त्या अर्हता असणाऱ्या व्यक्ती मान्य अर्हता असलेल्या व्यक्ती असल्याचे मानण्यात येईल.

*टीप (२) - वरील भाग २ मधील बाब (तीन) मध्ये उल्लेखिलेल्या अर्हतेच्या बाबतीत, ज्या व्यक्तींनी ती अर्हता दिनांक ३१ मे १९७१ रोजी अगर तत्पूर्वी प्राप्त केली असेल परंतु दिनांक १ जून १९७१ रोजी अगर त्यानंतर सेवेत प्रवेश केला असेल तर त्या व्यक्तींना (एक) १ एप्रिल १९७६ पासून सुधारीत केलेली वेतनश्रेणी, (दोन) सेवाशाश्वती व (तीन दर्जा इत्यादी प्रयोजनांसाठी प्रशिक्षित समजले जाईल; मात्र त्या व्यक्ति २० सप्टेंबर १९७८ पर्यंत शारीरिक शिक्षणाचे शिक्षण म्हणून सतत असल्या पाहिजेत.

(तीन) कनिष्ठ महाविद्यालयामधील शिक्षकांच्या अर्हता

(१) पूर्णकालिक शिक्षण - (अ) सांविधिक विद्यापीठाची संबंधित विषयातील दुसऱ्या वर्गाची स्नातकोत्तर पदवी आणि बी. एड. किंवा विभागाने मान्यता दिलेली अध्यापन शास्त्रातील पदविका किंवा प्रमाणपत्र.

(ब) खंड (क) च्या उपबंधाच्या अधिनतेने जे शिक्षक नियत दिनांकास सेवेत असतील किंवा उपसंचालकांची मान्यता घेऊन नियत दिनांकानंतर नियुक्त करण्यात आले असतील अशा शिक्षकांच्या अर्हता पुढीलप्रमाणे असतील :-

(एक) सांविधिक विद्यापीठाची भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र किंवा गणित या विषयांसह विज्ञान शाखेतील किमान दुसऱ्या वर्गातील स्नातकोत्तर पदवी किंवा सांविधिक विज्ञापीठाची गणित या विषयासह कला शाखेतील किमान दुसऱ्या वर्गातील स्नातकोत्तर पदवी किंवा सांविधिक विद्यापीठाची वाणिज्य शाखेतील किमान दुसऱ्या वर्गातील स्नातकोत्तर पदवी, किंवा कोणतीही उच्च अर्हता;

(दोन) सांविधिक विद्यापीठाची वाणिज्य शास्त्रातील किमान दुसऱ्या वर्गातील स्नातक पदवी आणीत तसेच जो सनदी लेखापाल आहे (असे शिक्षक सनदी लेखापालाची व्यावसायिक अर्हता पूर्वीपासूनच धारण करीत असल्याने त्यांनी शिक्षणशास्त्रातील स्नातक पदवी अथवा विभागाकडून मान्यता मिळालेली अध्यपान पदविका किंवा प्रमाणपत्र यासारखी व्यावसायिक अर्हता संपादन करण्याची गरज नसेल);

(तीन) सांविधिक विद्यापीठाची किमान दुसऱ्या वर्गातील स्नातक पदवी तसेच तंत्रशास्त्रात स्नातक पदवी;

(चार)संविधिक विद्यापीठाची कला शाखेतील पाहल्या वर्गातील स्नानकेतर पदवी;

(पाच) सांविधिक विद्यापीठाची कोणत्याही संबंधित विषयातील किमान दुसऱ्या वर्गातील स्नानकोत्तर पदवी;

*(सहा) (अ) सांविधिक विद्यापीठाची स्नातक पदवी -

(एक) पदवी द्वितीय वर्गातील असल्यास इयत्ता ८वी ते इयत्ता १० वी अगर ११ वी ला शिकविण्याचा किमान ७ वर्षाचा अनुभव, किंवा

(दोन) पदवी तृतीय वर्गातील (पास क्लास) असल्यास, इयत्ता ८ वी, इयत्ता १०वी अगर ११वीला शिकविण्याचा किमान १० वर्षाचा अनुभव;

(ब) सांविधिक विद्यपीठाची शिक्षणशास्त्रातील स्नातक पदवी, आणि

(क) १९७५-७६ सालामध्ये नेमणूक; अथवा

(सात) शासनाकडून किंवा आंतर-विद्यापीठ मंडळाकडून तत्सम म्हणून मान्यता मिळालेली इतर कोणतीही अर्हता.

(क) उप-खंड (एक), (तीन), (चार) आणि (पाच) यात निर्दिष्ट करण्यात आलेली अर्हता असणाऱ्या शिक्षकांना सांविधिक विद्यापीठाची शिक्षणशास्त्रातील स्नातक पदवी किंवा विभागाकडून मान्यता देण्यात आलेली अध्यपनातील पदविका किंवा प्रमाणपत्र ही व्यावसायिक अर्हता १३ मार्च १९८५ रोजी किंवा त्यापूर्वी मिळवणे आवश्यक आहे आणि असे करण्यास त्यांनी कसूर केल्यास, उपरोक्त तारखेनंतर रु. ५००-९०० या वेतनश्रेणीतील उपार्जित होणाऱ्या वेतनवाढी मिळण्यास ते पात्र असणार नाहीत.

(ड) जर, खंड (अ ) व (ब) यात निर्दिष्ट करण्यात आलेली अर्हता धारण करणाऱ्या व्यक्ती उपलब्ध नसतील तर, प्रत्येक प्रकरणाच्या बाबतीत गुणवत्तेच्या तत्त्वाच्या आधार संचालकाला अर्हतेची अट शिथिल करता येईल आणि तिच्याबाबत अशी अट शिथिल करण्यात आली असेल त्या व्यक्तीची निव्व्ल अस्थायी नेमणूक करण्यात येईल

(२) अंशकालिक शिक्षक - लेखापालन व लेखाशास्त्र, जीवशास्त्र व भूशास्त्र इत्यादींसारख्या विवक्षित वैकल्पिक विषयांसाठी अंशकालिका शिक्षक नेमणे आवश्यक असेल कनिष्ठ महाविद्यालयातील वर्गासाठी पूर्ण वेळ शिक्षकांसाठी जी अर्हता विहित करण्यात आली आहे तीच त्यांनाही लागू होईल. खंड

(१) मध्ये निर्दिष्ट केल्याप्रमाणे योग्य त्या प्रकरणी संचालकास अर्हतेची अट शिथील करता येईल.

(३) तांत्रिक विषयांसाठी शिक्षक - तांत्रिक विषय शिकविणाऱ्या किंवा वैकल्पिक तांत्रिक विषय शिकविणाऱ्या शिक्षकांनी पुढील अर्हता धारण केली पाहिजे, ती अशी ---

(एक) तीन वर्षाचा शिकविण्याचा अनुभव किंवा व्यावसायिक अनुभव यासह अभियांत्रिकीतील पदविका; अथवा

(दोन) अभियांत्रिकी किंवा तंत्रशास्त्र यातील पदवी धारण करणारे शिक्षक

(४) कला विषय शिकविणारे शिक्षक - वैकल्पिक कला विषय शिकवण्यासाठी पुढील अर्हता धारण करणारी व्यक्ती पात्र असेल असे मानण्यात यावे :-

(अ) (एक) शासनाच्या कला संचालनालयाकडून देण्यात येणारी निदान दुसऱ्या वर्गातील चित्रकला व रंगचित्रकाला अथवा स्कल्पचर व मॉडेलिग अथवा उपयोजित कला यातील पदविका किंवा सांविधिक विद्यापीठाची ललित कला अथवा वाणिज्यिक कला यातील किमान दुसऱ्या वर्गातील पदवी किंवा शासनाच्या कला संचालनालयाकडून मान्यता देण्यात आलेली तत्सम अर्हता; आणि

(दोन) निदान दुसऱ्या वर्गातील कला संचालक यांच्याकडून देण्यात येणारी ए. एम. (आर्ट मास्टर) प्रमाणपत्र अथवा ए. एम. पदविका अथवा कला शिक्षण या विषयांची पदविका, अथवा

 (ब) जे उमेदवार ए. एम. प्रमाणपत्र आर्ट मास्टर धारण करीत असतील आणि ज्यांनी माध्यमिक शाळांमध्ये किमान १० वर्ष कला शिक्षक म्हणून काम केले असेल असे उमेदवार.

टीप - खंड (अ) चा उप-खंड (एक) मध्ये निर्दिष्ट करण्यात आलेली सुधारित पदविका पाठयक्रम ज्यांनी केलेली नाही अथवा जे केळवण आर्ट मास्टरचे प्रमाणपत्र धारण करीत असतील अशा उमेदवारांना कनिष्ठ महाविद्यालयातील वर्गामध्ये शिकविण्यासाठी पात्र समजण्यात येईल. परंतु, मूलभूत पाठयक्रमाअंतर्गत उजळणी पाठयक्रम किंवा कला संचालनालयाकडून चालविण्यात येणार कला शिक्षणातील दिशा निदेशन (ओरीएन्टेशन) कार्यक्रम त्यांनी केलेला असला पाहिजे किंवा तो पूर्ण करणारा असले पाहिजेत.

(५) हिंदी शिक्षक - खंड (१) मध्ये निर्दिष्ट करण्यात आलेल्या पात्रतेशी समतुल्य म्हणून मान्यता देण्यात आली असेल अशी हिंदीतील शैक्षणिक व प्रशिक्षित पात्रता जी धारण करीत असेल अशी व्यक्ती हिंदी शिक्षक म्हणून नेमणूक केली जाण्यास पात्र असेल.

(६) संरक्षणविषयक अभ्यासासाठी शिक्षक - पुढीलपैकी कोणतीही पात्रता जी व्यक्ती धारण करीत असेल ती संरक्षणविषयक अभ्यास शिक्षक म्हणून नेमणूक केली जाण्यास पात्र असेल :-

(अ) सर्वच विषयांपैकी संरक्षणविषयक अभ्यास हा एक विषय असलेली स्नातक किंवा अधिस्नातक;

(ब) कोणत्याही विद्याशाखेची, स्नातक आणि राष्ट्रीय छात्र सेनेच्या वरिष्ठ स्तरातील किमान तीन वर्ष इतका अनुभव असलेला किंवा राष्ट्रीय छात्र सेनेच्या कनिष्ठ स्तरातील किमान पाच वर्ष इतका अनुभव असलेला राजादिष्ट अधिकारी (कमिशण्ड ऑफिसर); अथवा

(क) शिक्षण शास्त्रातील पदवी धारण करणारी कोणत्याही विद्याशाखेतील स्नातक माध्यमिक शाळेतील सात वर्षाचा शिकविण्याचा अनुभव आणि राष्ट्रीय छात्र सेनेच्या स्तराचे निदान प्रमाणपत्र यासह

*(७) शारीरिक शिक्षण शिक्षक - (अ) डी. पी. एड. ही पदविका किंवा कोणत्याही सांविधिक विद्यापीठाची बी. पी. एड. अगर बी. एड. (शारीरिक शिक्षण) ही पदवी धारण करणारी व्यक्ती, जर ती कला, विज्ञान किंवा वाणिज्य या शाखेतील दुसऱ्या वर्गाची स्नातकाची पदवी धारण करीत असेल तर सात वर्षांची प्रशिक्षणोत्तर अनुभव व पास वर्गाची स्नातक पदवी धारण करीत असेल तर दहा वर्षाचा अनुभव.

 

*(८) व्यावसायिक विषय किंवा अभ्यासक्रम शिकविणारे शिक्षक:-

अनुक्रमांक

()

पदाचा प्रकार

()

अर्हता आणि अनुभव

()

तांत्रिक गट

.

पूर्ण वेळ शिक्षक

(अ) तंत्र परीक्षा मंडळ, मुंबई, यांनी प्रदान केलेली अभियांत्रिकीच्या (इंजिनियरिंगच्या) योग्य शाखेतील किमान दुसर्‍या वर्गातील पदविका किंवा शासनाने मान्यता दिलेली समकक्ष आणि अर्हता;

(ब) शिकविण्याचा किंवा व्यवसायिक किंवा दोन्ही मिळून तीन वर्षांचा अनुभव.

.

() निदेशक (यंत्रांची निगा राखणे,
मेकॅनिकल मेंटेनन्स)

(अ) महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने प्रदान केलेले माध्यमि शालांत परीक्षा प्रमाणपत्र किंवा शासनाने मान्यता दिलेली समकक्ष अर्हता;

आणि

एन.सी.व्ही.टी. (आय.टी.आय.) ने दिलेले मशिनिस्ट (कंपोझीट) / मिलराईट या ट्रेडमधील प्रमाणपत्र;

किंवा

नॅशनल अ‍ॅप्रेंटिसशिप स्कीमखाली एन.सी.व्ही.टी. मशिनिस्ट (कंपोझीट) / मिलराईट या डेझिग्नेटेड ट्रेडमध्ये दिलेले प्रमाणपत्र

निर्देशकांसाठी असलेल्या सेंट्रल ट्रेनिंग इन्स्टिट्यूटचे निदेशकाच्या प्रशिक्षणाचे प्रमाणपत्र.

(ब) शिकविण्याचा किंवा व्यवसायिक किंवा दोन्ही मिळून तीन वर्षांचा अनुभव

 

() निदेशक

(विद्युत निगा इलेक्ट्रिकल मेंटेनन्स)

(अ) महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने प्रदान केलेले माध्यमिक शिक्षण मंडळाने प्रदान केलेले माध्यमिक शालांत परीक्षा प्रमाणपत्र किंवा शासनाने मान्यता दिलेली समकक्ष अर्हता;

एन.सी.व्ही.टी. (आय.टी.आय) ने दिलेले इलेक्ट्रिशियनच्या ट्रेडमधील प्रमाणपत्र;

किंवा

नॅशनल अ‍ॅप्रेंटिसशिप स्कीममधील एन.सी.व्ही.टी. ने इलेक्ट्रिशियन या डेझिग्नेटेड ट्रेडमध्ये दिलेले प्रमाणपत्र.

आणि

निदेशकांसाठी असलेल्या सेंट्रल ट्रेनिंग इन्सिट्यूटचे निदेशकाच्या प्रशिक्षणाचे प्रमाणपत्र;

(ब) शिकविण्याचा किंवा व्यवसायिक किंवा दोन्ही मिळून तीन वर्षांचा अनुभव.

 

() निदेशक

(स्कूटर अँड मोटरसायकल सर्व्हिसिंग)

(अ) महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने प्रदान केलेले माध्यमिक शालांत परीक्षा प्रमाणपत्र किंवा शासनाने मान्यता दिलेली समकक्ष अर्हता;

आणि

एन.सी.व्ही.टी. (आय.टी.आय) ने दिलेले मोटर मेकॅनिकल ट्रेडमधील प्रमाणपत्र;

किंवा

नॅशनल अ‍ॅप्रेंटिसशिप स्कीममधील एन.सी.व्ही.टी. ने मेकॅनिक या डेझिग्नेटेड ट्रेडमध्ये दिलेले प्रमाणपत्र;

आणि

निर्देशकांसाठी असलेल्या सेंट्रल ट्रेनिंग इन्सिट्यूटचे निदेशकाच्या प्रशिक्षणाचे प्रमाणपत्र;

(ब) शिकविण्याचा किंवा व्यवसायिक किंवा दोन्ही मिळून तीन वर्षांचा अनुभव.

 

() निदेशक (जनरल काँट्रेक्टिंग)

(अ) महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने प्रदान केलेले माध्यमिक शालांत परीक्षा प्रमाणपत्र किंवा शासनाने मान्यता दिलेली समकक्ष अर्हता;

आणि

एन.सी.व्ही.टी. (आय.टी.आय) ने दिलेले ड्राफ्टस्मन (सिव्हिल) / बिल्डिंग कन्स्ट्रक्शन या ट्रेडमधील प्रमाणपत्र;

किंवा

नॅशनल अ‍ॅप्रेंटिसशिप स्कीममधील एन.सी.व्ही.टी. ने ड्राफ्टस्मन (सिव्हिल) / बिल्डिंग कन्स्ट्रक्शन या डेझिग्नेटेड ट्रेडमध्ये दिलेले प्रमाणपत्र;

आणि

निर्देशकांसाठी असलेल्या सेंट्रल ट्रेनिंग इन्सिट्यूटचे निदेशकाच्या प्रशिक्षणाचे प्रमाणपत्र;

(ब) शिकविण्याचा किंवा व्यवसायिक किंवा दोन्ही मिळून तीन वर्षांचा अनुभव.

व्यापारशास्त्र गट (कॉमर्स ग्रुप)

अनुक्रमांक

()

पदाचा प्रकार

()

अर्हता आणि अनुभव

()

.

पूर्ण वेळ शिक्षक

(अ) सांविधिक विद्यापीठाची संबंधित विषयातील किंवा फॅकल्टिमधील किमान दुसर्‍या वर्गाची पदव्युत्तर पदवी किंवा शासनाने मान्यता दिलेली समकक्ष अर्हता;

आणि

(ब) शिकविण्याचा किंवा व्यवसायिक किंवा दोन्ही मिळून तीन वर्षाचा अनुभव.

.

निदेशक

(अ) सांविधिक विद्यापीठाची संबंधित विषयातील किंवा फॅकल्टिमधील किमान दुसर्‍या वर्गाची पदव्युत्तर पदवी किंवा शासनाने मान्यता दिलेली समकक्ष अर्हता;

आणि

(ब) शिकविण्याचा किंवा व्यवसायिक किंवा दोन्ही मिळून तीन वर्षाचा अनुभव.

इलेक्ट्रॉनिक्स गट

अनुक्रमांक

()

पदाचा प्रकार

()

अर्हता आणि अनुभव

()

.

पूर्ण वेळ शिक्षक

(अ) तंत्रपरीक्षा मंडळ, मुंबई, यांनी प्रदान केलेली इंडस्ट्रियल इलेक्ट्रॉनिक्समधील किंवा इलेक्ट्रॉनिक्स व रेडिओ इंजिनियरिंगमधील किमान दुसर्‍या वर्गाची पदविका;

किंवा

सांविधिक विद्यापीठाची भौतिकशास्त्र (फिजिक्स) हा विषय घेऊन त्यात इलेक्ट्रॉनिक्समधील विशेषज्ञता असलेली सायन्स फॅकल्टिमधील किमान दुसर्‍या वर्गांची पदव्युत्तर पदवी किंवा शासनाने मान्यता दिलेली समकक्ष अर्हता;

.

निदेशक

(अ) महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने प्रदान केलेले माध्यमिक शालांत परीक्षा प्रमाणपत्र किंवा शासनाने मान्यता दिलेली समकक्ष अर्हता;

आणि

एन.सी.व्ही.टी. (आय.टी.आय) ने दिलेले इलेक्ट्रॉनिक्स ट्रेडमधील प्रमाणपत्र;

किंवा

नॅशनल अ‍ॅप्रेंटिसशिप स्कीममधील एन.सी.व्ही.टी. ने इलेक्ट्रॉनिक्स या डेझिग्नेटेड ट्रेडमध्ये दिलेले प्रमाणपत्र;

आणि

निर्देशकांसाठी असलेल्या सेंट्रल ट्रेनिंग इन्सिट्यूटचे निदेशकाच्या प्रशिक्षणाचे प्रमाणपत्र;

(ब) शिकविण्याचा किंवा व्यवसायिक किंवा दोन्ही मिळून तीन वर्षांचा अनुभव.

कर्मशाळा सहाय्यक (वर्कशॉप असिस्टंट)

 

(अ) माध्यमिक शालांत परीक्षा प्रमाणपत्र किंवा समकक्ष परीक्षा आणि इलेक्ट्रिशियन किंवा इलेक्ट्रानिक्स ट्रेडमधील आय.टी.आय.चे प्रमाणपत्र;

किंवा

(ब) नॅशनल अ‍ॅप्रेंटिसशिप स्कीमखाली एन.सी.व्ही.टी. ने इलेक्ट्रिशियन किंवा इलेक्ट्रानिक्स मेकॅनिक या डेझिग्नेटेड ट्रेडमध्ये दिलेले प्रमाणपत्र. इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रात प्रत्यक्ष कामगिरी असलेल्या कर्मशाळेतील एक वर्षाचा अनुभव.

केमिकल प्लॅट ऑपरेशन गट

.

पूर्ण वेळ शिक्षक

 (अ) तंत्रपरीक्षा मंडळ, मुंबई, यांनी प्रदान केलेली केमिकल इंजनियरिेंगमधील किमान दुसर्‍या वर्गाची पदविका;

किंवा

सांविधिक विद्यापीठाची केमिकल टेक्नॉलॉजी मधील किमान दुसर्‍या वर्गांची पदव्युत्तर पदवी किंवा शासनाने मान्यता दिलेली समकक्ष अर्हता;

(ब) शिकविण्याचा किंवा व्यवसायिक किंवा दोन्ही मिळून तीन वर्षाचा अनुभव.

.

निदेशक

(अ) महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने प्रदान केलेले माध्यमिक शालांत परीक्षा प्रमाणपत्र किंवा शासनाने मान्यता दिलेली समकक्ष अर्हता;

आणि

नॅशनल अ‍ॅप्रेंटिसशिप स्कीमखाली एन.सी.व्ही.टी. ने केमिकल प्लॅटच्या, अटेंडंट ऑपरेटर किंवा मेकॅनिकल मेंटेनन्स या डेझिग्नेटेड ट्रेडसाठी किंवा केमिकल प्लँटच्या इंस्ट्रुमेंट मेकॅनिक डेझिग्नेटेड ट्रेडसाठी दिलेले प्रमाणपत्र;

आणि

निदेशकांसाठी असलेल्या सेंट्रल ट्रेनिंब इंन्स्टिट्यूटचे निर्देशकाच्या प्रशिक्षणाचे प्रमाणपत्र.

(ब) शिकविण्याचा किंवा व्यवसायिक किंवा दोन्ही मिळून तीन वर्षाचा अनुभव.

कर्मशाळा सहाय्यक (वर्कशॉप असिस्टंट)

 

 (अ) महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने प्रदान केलेले माध्यमिक शालांत परीक्षा प्रमाणपत्र किंवा शासनाने मान्यता दिलेली समकक्ष अर्हता;

किंवा

नॅशनल अ‍ॅप्रेंटिसशिप स्कीमखाली एन.सी.व्ही.टी. ने केमिकल प्लँट अटेंडंट ऑपरेटर किंवा मेकॅनिकल मेटेंनन्स वा डेझिग्नेटेड ट्रेडसाठी किंवा केमिकल प्लँटच्या इंस्ट्रुमेंट मेकॅनिकल या डेझिग्नेटेड ट्रेडसाठी दिलेले प्रमाणपत्र;

(ब) कर्मशाळेतील एक वर्षाचा अनुभव.

कृषी गट (एग्रीकल्चर ग्रूप)

.

पूर्ण वेळ शिक्षक

सांविधिक विद्यापीठाची संबंधित विषयातील / फॅकल्टिमधील किमान दुसर्‍या वर्गांची पदव्युत्तर पदवी किंवा शासनाने मान्यता दिलेली समकक्ष अर्हता;

आणि

(ब) शिकविण्याचा किंवा व्यवसायिक किंवा दोन्ही मिळून तीन वर्षाचा अनुभव.

किंवा

(अ) सांविधिक विद्यापीठाची कृषी (अ‍ॅग्रिकल्चर) मधील किमान दुसर्‍या वर्गाची पदव्युत्तर पदवी

आणि

(ब) (१) डेअरी फार्म मॅनेजमेंट किंवा (२) डेअरी प्लँट मॅनेजमेंट किंवा (३) अ‍ॅग्रिकल्चर एक्स्टेंशनमधील पाच वर्षाचा अनुभव.

टीप :- अ‍ॅग्रिकल्चरमधील अभ्यासक्रमांच्या हेतुसाठी संबंधित विषय/फॅकल्टिमध्ये अ‍ॅनिमल सायन्य किंवा डेअरी सायन्य किंवा व्हेटरनरी सायन्स किंवा हॉटिकल्चर किंवा अ‍ॅग्रॉनॉमीमधील एम.एस्.सी. (कृषी) चा समावेश आहे.

.

निदेशक

सांविधिक विद्यापीठाची संबंधित विषयातील / फॅकल्टिमधील कृषीमधील पदवी किंवा शासनाने मान्यता दिलेली समकक्ष अर्हता;

आणि

(ब) शिकविण्याचा किंवा व्यवसायिक किंवा दोन्ही मिळून तीन वर्षाचा अनुभव.

फूड टेक्नॉलॉजी ग्रुप (गट)

.

पूर्ण वेळ शिक्षक

(अ) सांविधिक विद्यापीठाची संबंधित विषयातील किंवा फॅकल्टिमधील किमान दुसर्‍या वर्गाची पदव्युत्तर पदवी किंवा शासनाने मान्यता दिलेली समकक्ष अर्हता;

आणि

(ब) शिकविण्याचा किंवा व्यवसायिक किंवा दोन्ही मिळून तीन वर्षाचा अनुभव.

किंवा

(अ) सांविधिक विद्यापीठाची होमसायन्समधील किमान पहिल्या वर्गाची पदव्युत्तर पदवी किंवा शासनाने मान्यता दिलेली समकक्ष अर्हता;

आणि

() डाइटेटिक्समधील पदविका;

किंवा

() डाइटेटिक्समधील पदव्युत्तर पदविकेसह हॉटेल मॅनेजमेंट व कॅटरिंग टेक्नॉलॉजीमधील पदविका;

किंवा

() केंनिंग अँड फूड प्रिझर्व्हेशनमधील पदविका;

(ब) शिकविण्याचा किंवा व्यवसायिक किंवा दोन्ही मिळून पांच वर्षांचा अनुभव.

टीप :- फूड टेक्नॉलॉजीगटातील अभ्यासक्रमांच्या हेतुसाठी संबंधित विषयातील किंवा फॅकल्टिमधील किंवा इंन्स्टिट्यूशनल मॅनेजमेंट किंवा मायक्राबायलॉजी किंवा फूड व न्युट्रिशनमधील एम.एस.सी. चा समावेश आहे.

.

निदेशक

(अ) सांविधिक विद्यापीठाची होमसायन्समधील किमान दुसर्‍या वर्गाची पदव्युत्तर पदवी;

आणि

() डाइटेटिक्समधील पदविका;

किंवा

() डाइटेटिक्समधील पदव्युत्तर पदविकेसह हॉटेल मॅनेजमेंट व कॅटरिंग टेक्नॉलॉजीमधील पदविका;

किंवा

() केंनिंग अँड फूड प्रिझर्व्हेशनमधील पदविका;

फिशरी ग्रुप (मत्स्यव्यवसाय गट)

.

पूर्ण वेळ शिक्षक

 (अ) सांविधिक विद्यापीठाची संबंधित विषयातील / फॅकल्टिमधील किमान दुसर्‍या वर्गांची पदव्युत्तर पदवी किंवा शासनाने मान्यता दिलेली समकक्ष अर्हता;

आणि

(ब) शिकविण्याचा किंवा व्यवसायिक किंवा दोन्ही मिळून तीन वर्षाचा अनुभव.

टीप:- फिशरी ग्रुपमधील अभ्यासक्रमांच्या हेतुसाठी संबंधित विषय / फॅकल्टिमध्ये मरीन झुऑलॉजी किंवा फिशरीज मधील एम.एस्.जी. (झुऑलॉजी) आणि पदवीस्तरावर केमिस्ट्री दुय्यम विषय घेतलेल्यांना अग्रक्रमाने समाविष्ट केलेले आहे.

.

निदेशक

(अ) सांविधिक विद्यापीठाची झुऑलॉजीच्या विषयासह सायन्समधील पदवी किंवा शासनाने मान्यता दिलेली समकक्ष अर्हता;

आणि

(ब) शिकविण्याचा किंवा व्यवसायिक किंवा दोन्ही मिळून तीन वर्षाचा अनुभव.

पॅरा मेडिकल ग्रुप

(अ) एलेमेंटरी लेबॉरेटरी टेक्नॉलॉजी

व्याख्याता किवा पूर्ण वेळ शिक्षक

 

 (अ) सांविधिक विद्यापीठाची संबंधित विषयातील / फॅकल्टिमधील वैयक्तिक. पदवी (ए.बी.बी.एस.) किंवा शासनाने मान्यता दिलेली समकक्ष अर्हता;

आणि

(ब) शिकविण्याचा किंवा व्यवसायिक किंवा दोन्ही मिळून तीन वर्षाचा अनुभव.

.

प्रयोगशाळा तंत्रज्ञ (पूर्ण वेळ)

 

 (अ) सांविधिक विद्यापीठाची सायन्समधील पदवी आणि हाफकिन इंन्सिट्यूट किंवा ह्याकरिता शासनामान्य अशा कोणत्याही संस्थेने प्रदान केलेली मेडिकल लेबॉरेटरी टेक्नॉलॉजीमधील पदवीका;

आणि

(ब) शिकविण्याचा किंवा व्यवसायिक किंवा दोन्ही मिळून तीन वर्षाचा अनुभव.

किंवा

(अ) सांविधिक विद्यापीठाची सायन्समधील पदवी अधिक ह्याकरिता शासनामान्य केलेल्या संस्थेने प्रदान केलेली मेडिकल टेक्नॉलॉजीमधील शासकीय प्रमाणपत्र;

आणि

(ब) शिकविण्याचा किंवा व्यवसायिक किंवा दोन्ही मिळून सात वर्षाचा अनुभव.

(ब) मल्टिपर्पज हेल्थ वर्कर्स कोर्स (बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी अभ्यासक्रम)

.

पूर्ण वेळ शिक्षक

 

 (अ) सांविधिक विद्यापीठाची संबंधित विषय फॅकल्टिमधील वैद्यकाची पदवी (ए.बी.बी.एस.) किंवा महाराष्ट्र शासनाने मान्यता दिलेली समकक्ष अर्हता आणि ह्याकरिता शासनामान्य अशा कोणत्याही संस्थेने प्रदान केलेली सार्वजनिक आरोग्याची पदवीका;

(ब) शिकविण्याचा किंवा व्यवसायिक किंवा दोन्ही मिळून काही अनुभव.

.

निदेशक सार्वजनिक आरोग्य
(इन्स्ट्रक्टर पब्लिक हेल्थ)

 

 (अ) सायन्समधील पदवी आणि ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ हायजिन इन पब्लिक हेल्थ, कलकत्ता या संस्थेने प्रदान केलेली हेल्थ एज्युकेशनमधील पदवीका;

(ब) शिकविण्याचा किंवा व्यवसायिक किंवा दोन्ही मिळून तीन वर्षाचा अनुभव.

किंवा

(अ) सांविधिक विद्यापीठाची सायन्समधील पदवी किंवा शासनामान्य समकक्ष अर्हता आणि सार्वजनिक आरोग्य (क्षेत्रातील) १० वर्षाचा अनुभव.

आरोग्य (क्षेत्रातील) १० वर्षाचा अनुभव

सर्व गटासाठी समान

.

अभ्यागत शिक्षण

 

योग्य त्या गटांखाली वर नमूद केलेल्या अनुक्रमांक १ प्रमाणे;

किंवा

संबंधित क्षेत्रातील पाच वर्षांचा व्यवसायिक अनुभव.

(चार) शाळेतील शिक्षकेत्तर पदांसाठी अर्हता

.

कनिष्ठ लिपिक

जी व्यक्ती निदान मॅट्रिक्युलेशनची किंवा माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण झाली असेल अथवा त्यांच्याशी समतूल्य आहे अशी शासनाने घोषित केलेली अर्हता धारण करीत असलेले, अशी व्यक्ती.

.

वरिष्ठ लिपिक

वरिष्ठता-नि-गुणवत्ता यांच्या आधारे कनिष्ठ लिपिकाचे पद धारण करणार्‍या व्यक्तींमध्ये एखाद्याला पदोन्नती देऊन.

.

प्रमुख लिपिक

वरिष्ठता-नि-गुणवत्ता यांच्या आधारे वरिष्ठ लिपिकाचे पद धारण करणार्‍या व्यक्तींमध्ये एखाद्याला पदोन्नती देऊन.

.

अधिक्षक

वरिष्ठता-नि-गुणवत्ता यांच्या आधारे प्रमुख लिपिकाचे पद धारण करणार्‍या व्यक्तींमध्ये एखाद्याला पदोन्नती देऊन.

(वरील पदे उतरत्या क्रमाने दर्शविण्यात आली आहेत; आणि वरिष्ठ पदे ही संबंधित शाळेतील हजेरी पटाच्या आधारे माध्यमिक शाळांतील व अध्यापक विद्यालयातील उपलब्ध असलेली पदोन्नतींची पदे आहेत)

टीप :- जेष्ठता-नि-गुणवत्ता या कसोटीचे काटेकाररितीने पालन करून कर्मचारीवर्गामध्ये पदोन्नतीची पदे भरण्याच्या प्रयोजनास्तव, अनुसूची “फ” मध्ये निर्दिष्ट केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांच्या आधारे “ज्येष्ठता” निश्‍चित करण्यात येईल; आणि नियम ३ च्या पोट-नियम (६) खालील स्पष्टीकरण्यातील “गुणवत्ता” या शब्दाच्या अर्थांतर्गत, सेवा अभिलेखानुसार ती निश्‍चित करण्यात येईल.

.

ग्रंथपाल

जी व्यक्ती निदान मॅट्रिक्युलेशन अथवा माध्यमिक शाळा प्रमाणापत्र परीक्षा उत्तीर्ण झाली असेल आणि ग्रंथालय संचालनालयाकडून देण्यात येणारे ग्रांथालया प्रशिक्षण प्रमाणपत्र धारण करीत असेल अशी व्यक्ती.

.

प्रयोगशाळा सहाय्यक

जी व्यक्ती भौतिकशास्त्र व रसायनशास्त्र, सामान्य विज्ञान हे विषय घेऊन मॅट्रिक्युलेशन किंवा माध्यमिक शाळा प्रमाणापत्र परीक्षा उत्तीर्ण झाली अशी व्यक्ती.

.

प्रयोगशाळा परिचर

(वेतन श्रेणी रू. २५०-४३५)

जी व्यक्ती भौतिकशास्त्र व रसायनशास्त्र अथवा सामान्य विज्ञान हे विषय घेऊन माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षापूर्व वर्गापर्यंत शिकलेली आहे अशी व्यक्ती.

.

प्रयोगशाळा परिचर आणि नाईक, चपराशी, पहारेकरी, चौकीदार, सफाईदार, स्त्री सेवक (कॉल वूमन), कामाठी इत्यादीं सारखे निम्नश्रेणीतील कर्मचारी.

साक्षर व्यक्ती

*(पाच) कनिष्ठ महाविद्यालयात व्यवसायिक विषय अभ्यासक्रमांच्या अशिक्षकी पदांसाठी अर्हता

.

कर्मशाळा सहाय्यक (वर्कशॉप असिस्टंट) पॅरा मेडिकल ग्रप वगळून इतर गटांसाठी.

(अ) माध्यमिक शालांत परीक्षा प्रमाणपत्र किंवा त्याची समकक्ष परीक्षा आणि संबंधित ट्रेडमधील आय.टी.आय.चे व्यवसाय प्रमाणपत्र; आणि (ब) कर्मशाळेमधील तीन वर्षांचा अनुभव.

.

प्रयोगशाळा सहाय्यक
(लेबोरेटरी असिस्टंट)

(अ) माध्यमिक शालांत परीक्षा प्रमाणपत्र किंवा त्याची समकक्ष परीक्षा आणि

(ब) प्रयोगशाळेतील कामचा काही अनुभव.

.

स्टोअर कीपर

 

(अ) माध्यमिक शालांत परीक्षा प्रमाणपत्र किंवा त्याची समकक्ष परीक्षा आणि

(ब) स्टोअर परिरक्षणाच्या (मेंटेनन्सच्या) कामचा काही अनुभव.

.

हेल्पर/शिपाई/पहारेकरी (वॉचमन)/लाईव्हस्टॉक/अटेंडंट/बुलकमन /फिल्डमन इत्यादी.

कोणत्याही विशिष्ठ अर्हता नाही.

 


*अधिसूचना क्रमांक खाशान्या १०८३/१९४/माशि ३ कक्ष, दिनांक २० डिसेंबर १९८४ अन्वये सुधारल्याप्रमाणे

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र खाजगी शाळा कर्मचारी (सेवेच्या शर्ती) नियमावली, १९८१- व्याख्या

अनुसूची “ज” - कर्मचार्‍यांची कर्तव्ये - महाराष्ट्र खाजगी शाळा कर्मचारी (सेवेच्या शर्ती) नियमावली, १९८१

१६. रजा - महाराष्ट्र खाजगी शाळा कर्मचारी (सेवेच्या शर्ती) नियमावली, १९८१